Home लाईफ स्टाईल Gardning Tips : झाडांच्या उत्तम वाढीसाठी ताक घातल्याने होतात अनेक फायदे
लाईफ स्टाईल

Gardning Tips : झाडांच्या उत्तम वाढीसाठी ताक घातल्याने होतात अनेक फायदे

0
Chaturthi

झाडं कायम मनुष्यासाठी फायदेशीरच ठरले आहेत. झाडांशिवाय मानवी जीवन शक्यच नाही. त्यामुळे कायम सर्वच लोकं झाडं वाचवा आणि झाडं जगवा असा संदेश देतात. अशातच मधल्या काही काळापासून लोकांमध्ये झाडांबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण होताना दिसत आहे. यामुळेच अनेकांनी आपल्या घरांमध्ये, बागेत, अंगणात लहान मोठी बरीच झाडे लावल्याचे चित्र आहे. अनेकदा झाडांची काळजी घेताना नवीन लोकांना काही गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे काही चुका देखील होतात. आता झाडांना ताक घालणे ही गोष्ट देखील अशीच आहे. अनेकांचे ऐकून बरेच लोकं झाडांना ताक घालतात. मात्र ताक नक्की कोणत्या झाडांना घालावे? कसे घालावे?, ताक घालण्याचे नक्की फायदे कोणते? याची त्यांना माहितीच नसते. आज आम्ही तुम्हाला याच मुद्द्यांवर माहिती देणार आहोत. (Gardening tips)

झाडांना ताक घालणे हे गार्डनिंगमधील एक जुने आणि प्रभावी तंत्र आहे, परंतु त्याचा चुकीचा वापर झाडांना त्रासदायक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते ताकामध्ये असणारे ‘गुड बॅक्टेरिया’ आणि सूक्ष्म पोषक घटक झाडांची वाढ झपाट्याने करतात. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स, लैक्टिक आम्ल आणि खनिजे मातीला पोषण देतात, कीटकांना दूर ठेवतात आणि वनस्पतींमुळे मजबूत करतात. ताक हा एक स्वस्त, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक खत पर्याय आहे जो बागकाम सोपे आणि पौधे निरोगी बनवतो. उन्हाळ्यात विशेषतः आम्लयुक्त माती आणि कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. (Marathi)

उन्हाळा आता सुरू झाला आहे. या ऋतूत बागेतील रोपे पाण्यावाचून आणि पोषणावाचून सुकतात आणि माना टाकतात. त्यामुळे या ऋतूत रोपांच्या वाढीसाठी तुम्ही ताकाचा वापर करू शकता. ताकामध्ये आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम यासह अनेक खनिजे वनस्पतींचे मुळांपासून पानांपर्यंत पोषण करण्यास मदत करतात. ताक हे केवळ खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणूनही काम करते. जर तुमच्या गुलाबाच्या झाडाला कळ्या येत नसतील किंवा कढीपत्त्याची वाढ खुंटली असेल, तर ताकाचा वापर करा. कढीपत्ता आणि फुलझाडांच्या वाढीसाठी ताक जास्त फायदेशीर ठरते. (Social Updates)

Gardning Tips

ताकाचे खत बनवण्याची पद्धत
ताकाचे खत बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका भांड्यात एक ग्लास ताक घ्या, तसेच एक ग्लास नारळाचे पाणी, एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग , थोडा फळांचा रस आणि एक लिटर पाणी यांचे मिश्रण करा. त्यानंतर हे मिश्रण रोपांवर वापरा. तुम्ही तुमच्या अंगणात किंवा घरामध्ये छोटी मोठी रोपे लावली असतील तर त्यावर या ताकाच्या खताचा चांगला परिणाम दिसून येईल. तसेच तुम्ही लावलेले रोपे कधीही पिवळी पडणार नाही. ताकामध्ये अनेक पोषक तत्वे असतात त्यामुळे झाडांना नवीन ऊर्जा मिळते.

ताक हे निसर्गातः आम्लीय अर्थात ऍसिडिक असते, त्यामुळे ते कधीही थेट झाडांच्या मुळाशी टाकू नका. एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, ताक नेहमी पाण्यात मिसळून पातळ करावे. याचे योग्य प्रमाण १:५ असे असावे. म्हणजेच ताक ५ पट अधिक पाण्यात मिसळून पातळ करा. म्हणजेच, जर तुम्ही १ ग्लास ताक घेतले असेल तर त्यात ५ ग्लास साधे पाणी मिसळा. आता हे ताक व पाण्याचे एकत्रित मिश्रण झाडांसाठी सुरक्षित आणि अधिक प्रभावी ठरते. (Latest Marathi News)

ताकामध्ये सौम्य लैक्टिक आम्ल असते जे मातीचा pH संतुलित करते, विशेषतः अल्कधर्मी मातीत. यामुळे पौधे पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतात. ताकामधील प्रोबायोटिक्स (लैक्टिक आम्ल जीवाणू) मातीतील फायदेशीर सूक्ष्मजीवांना वाढवतात. हे सेंद्रिय खतासारखे काम करून मातीची सुपीकता वाढवते. शिवाय ताकामध्ये बुरशी आणि बुरशीजन्य बीजाणू नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे बुरशी, पावडरी मिल्ड्यूसारख्या समस्या कमी होतात. सोबतच ताकामध्ये कॅल्शियम, जीवनसत्व B12 आणि प्रथिने असतात, जी पौध्यांची वाढ आणि फुले-फळांची गुणवत्ता सुधारतात. ताक मातीत मिसळून मुळांभोवतीचे वातावरण मऊ करते, ज्यामुळे मूळ व्यवस्था मजबूत होते आणि पौधा चांगला वाढतो. (Marathi News)

=========

Railway : भारतातील असे राज्य जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही

=========

गुलाब, जास्वंद आणि अपराजिता यांसारख्या फुलांच्या झाडांसाठी ताकाचे पाणी उत्तम टॉनिक आहे. हे मातीचा ‘pH’ स्तर संतुलित करते, ज्यामुळे झाडाला जास्त कळ्या येतात आणि फुलांचा आकारही मोठा होतो. जर गुलाबाला फुले येत नसतील, तर १५ दिवसांतून एकदा हे मिश्रण घालून पहा, तुम्हाला लवकरच फरक जाणवेल. कढीपत्त्याच्या झाडासाठी ताक हे अतिशय महत्त्वच ठरते. यामुळे कढीपत्त्याचा सुगंध वाढतो आणि पाने मोठी व चमकदार होतात आणि कीड पडण्यापासून संरक्षण होते. तसेच टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या भाज्यांच्या रोपांना ताक घातल्यास त्यांची वाढ वेगाने होते आणि झाडाला नवीन फांद्या फुटण्यास मदत होते.  (Top Stories)

झाडांना ताक नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर द्यावे. दुपारच्या कडक उन्हात रोपांना ताकाचे पाणी टाकणे टाळावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, झाडांसाठी वापरल्या जाणाऱ्या ताकामध्ये मीठ किंवा साखर नसावे. नुसते ताक झाडाला घातल्यास मुळांना बुरशी लागण्याची भीती असते, त्यामुळे ते नेहमी पाण्यात मिसळूनच वापरा. महिन्यातून दोनदा हा प्रयोग केल्यास तुमची बाग नक्कीच हिरवीगार होईल आणि फुलांनी बहरेल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!