Home गाजावाजा Black Diamond Apple : ब्लॅक डायमंड…हिरा नव्हे सफरचंद
गाजावाजा

Black Diamond Apple : ब्लॅक डायमंड…हिरा नव्हे सफरचंद

0

भारताचे काश्मिर हे तेथील नैसर्गिक सौदर्यासाठी जसे ओळखले जाते, तशीच या काश्मिरची सफरचंदही जगभर पसंत केली जातात. काश्मीरमध्ये सुमारे ११३ सफरचंदांच्या जाती पिकवल्या जातात. अंब्री, रॉयल डेलिशियस, रेड डेलिशियस, गोल्डन डेलिशियस, शिरीन, फिरदौस या जाताची सफरचंद हातोताथ विकली जातात. रसाळ आणि अप्रतिम चवीची ही सफरचंद लालसर रंगाची असतात. या सफरचंदाची किंमत १०० पासून हजार रुपये किलोपर्यंत असते. पण या सर्वात एक अत्यंत महागडं असं सफरचंद आहे. या सफरचंदाला ब्लॅक डायमंड असे म्हटले जाते.  हायमंड म्हणजे हिरा, अगदी तसंच हे हि-यासारखं सफरचंद महागडं आहे. या ब्लॅक डायमंड जातीच्या एका सफरचंदाची किंमत ५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत आहे. काळ्या रंगाच्या या सफरचंदाकडे आरोग्याचा खजिना म्हणून बघितले जाते. हे सफरचंद तयार होते, ते तिबेटमध्ये. जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणा-या तिबेटमध्ये आता याच ब्लॅक डायमंड सफरचंदांचा सिझन चालू आहे. काळ्या रंगाचे हे सफरचंद तिबेटमध्ये ३,५०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर वाढते. बाहेरून पूर्ण काळ्या रंगाचे, आणि आतून पांढरे शुभ्र असणारे हे ब्लॅक डायमंड सफरचंद मधाच्या चवीचे असते. आरोग्याच्या दृष्टीनंही या सफरचंदाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच या ब्लॅक डायमंड सफरचंदाची किंमत अन्य सफरचंदापेक्षा अधिकची असते.  

Black Diamond Apple
Black Diamond Apple

जगाचे छप्पर म्हणून तिबेटची ओळख आहे. याच तिबेटमध्ये काही औषधी फळे तयार होतात, त्यांची किंमत हजारात असते. यामध्ये चेबुलिक मायरोबालन, बेलेरिक मायरोबालन आणि एम्बलिक मायरोबालन या भगव्या रंगाच्या फळांचा समावेश आहे. ही लहान आकाराची फळे, सर्व रोगांवर औषधासारखी उपयोगी होतात. याशिवाय तिबेटमध्ये अक्रोडचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यासोबत तिबेटमध्ये ऑक्टोबर महिना संपला की आणखी एक औषधी फळ तयार होते, ते म्हणजे, ब्लॅक डायमंड. हे फळ म्हणजे, सफरचंद आहे, त्याला ब्लॅक डायमंड हे नाव मिळालं आहे, कारण हे सफरचंद पूर्णपणे काळ्या रंगाचे असते. हे ब्लॅक डायमंड सफरचंद जगातील सर्वात महागडे सफरचंद आहे. त्यातील एका सफरचंदाची किंमत ही ७०० रुपये एवढी असते. कारण तिबेटच्या टेकड्यांमध्ये तयार होणारे हे सफरचंद फक्त चवीत नाही तर त्याच्या औषधी गुणांमधूनही कुठल्याही रत्नांपेक्षा कमी नाही.

=======

हे देखील वाचा : Angarki Chaturthi : २०२६ सालातील पहिलीच अंगारकी संकष्टी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

=======

या ब्लॅक डायमंड सफरचंदांचा हंगाम ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून सुरु होतो. तिबेटच्या टेकड्यांवर या ब्लॅक डायमंड सफरचंदांच्या बागा आहेत. त्याच्या रंगांवरुन त्यांची किंमत ठरवली जाते. जेवढा सरफचंदाचा रंग काळा तेवढी त्याची किंमत अधिक असते. तिबेटच्या न्यिंगची प्रदेशात ३,५०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर या सफरचंदाची झाडे आहेत. दिवसा तीव्र सूर्याची किरणे आणि रात्री तापमानात होणारी तीव्र घट यामुळे या सफरचंदांना त्यांचा गडद, ​​जवळजवळ काळा रंग मिळतो. यामुळेच या सफरचंदाच्या आतील भाग पांढरा होतो, आणि त्याची चवही  मधासारखी गोड होते. हे सफरचंद ‘हुआनिउ’ प्रजातीचे आहे. अन्य सफरचंदांपेक्षा हे सफरचंद खाण्यासाठी अत्यंत कुरकुरीत असते. बाजारात या एका सफरचंदाची किंमत ७०० ते १५०० रुपयांपर्यंत असू शकते. तिबेटच्या स्थानिक बाजारातही ब्लॅक डायमंड शक्यतो मिळत नाही. कारण ज्या भागात हे सफरचंद तयार होते, त्या भागातील शेतक-यांकडून आधीच त्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात येतो. अमेरिका, युरोप आणि सौदीमध्ये या ब्लॅक डायमंड सफरचंदांची मोठी मागणी आहे. त्यातून लागवड केल्यावर या सफरचंदाच्या रोपाला फळ धरण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी लागतो. तिबेटच्या हवामानात आणि डोंगर कपारीवर या सफरचंदाच्या रोपाला मोठं करण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागले. त्यामुळेही त्याची किंमत वाढते. हे सफरचंद केवळ दिसयायला चांगले नाही, तर त्यांच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याचा गडद रंग अँथोसायनिन, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंटमुळे आहे. अभ्यासानुसार, अँथोसायनिनयुक्त पदार्थ हृदयरोगांचा धोका कमी करतात आणि पेशींचे कार्य सुधारतात. ते शरीराला हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास देखील मदत करतात. शिवाय या सफरचंदामध्ये फायबरही अधिक प्रमाणात आहे. या सर्वच कारणांमुळे तिबेटच्या काळ्या सफरचंदांना ब्लॅक डायमंड हे नाव शोभून दिसते, आणि डायमंडसारखेच हे सफरचंद अत्यंत मौल्यवान आहे.  

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा

Law Awareness : गाडीवर लाल-निळा दिवा लावण्याचा अधिकार कोणाला ?

Law Awareness : अलीकडेच मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांच्या गाडीवर लाल-निळा दिवा...

गाजावाजा

Police : ‘तडीपार’ कारवाई म्हणजे नेमकं काय ? Police कशी करते अंमलबजावणी

Police :  गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यापैकीच एक...

गाजावाजा

परंपरा की वादग्रस्त प्रथा ? ‘या’ समाजात दुसऱ्याची पत्नी पळवून लग्न करण्याची विचित्र रीत

Bride Capture Traction : जगभरात विविध संस्कृती आणि परंपरा आढळतात. काही परंपरा...

गाजावाजा

Parkinsons : तरुणांमध्ये वाढतोय Parkinson’s Disease चा धोका!

Parkinsons : पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित मानला जाणारा पार्किन्सनचा आजार आता तरुणांमध्येही वाढताना...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!