Home लाईफ स्टाईल New Year : २०२६ चे स्वागत करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं देखील आहेत उत्तम पर्याय
लाईफ स्टाईल

New Year : २०२६ चे स्वागत करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं देखील आहेत उत्तम पर्याय

0

डिसेंबर महिना सुरु झाला की, वेध लागतात ते ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनचे. प्रत्येक जण या काळात घरापासून दूर कुठेतरी सुट्ट्यांसाठी जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र नेहमी त्याच त्याच ठिकाणी जायला सगळ्यांनाच कंटाळा येत असेल. आपल्या बजेटमध्ये, अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जर तुम्हाला नवीन वर्ष साजरे करायचे असेल तर आम्ही यासाठी उत्तम पर्याय आज सांगणार आहोत. भारतातील अतिशय आकर्षक ठिकाणं जिथे तुम्ही जल्लोषात नवीन वर्ष साजरे करू शकतात. (New Year)

बंगळुरु
ओपन स्पेस, हिरव्यागार गार्डन, मॉल्सचं विश्व आणि पार्टीची विविध ठिकाणं असं बंगळुरुचं वर्णन करता येईल. बंगळुरुमधील रेस्टॉरंट हे पर्यटकांचं आकर्षण असतात. रॉकिंग क्राऊडसोबत लाईव्ह डीजे पार्टीचा आनंद आणखी वाढवतात. (Marathi)

New Year

गोकर्ण
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कर्नाटकातील गोकर्ण हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. हे ठिकाण शांतता आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही ओम बीच, कुडले बीच आणि हाफ मून बीचवर नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. येथील सौंदर्य तुमची नवीन वर्षाची पार्टी अविस्मरणीय बनवेल. येथे तुम्हाला फोटो क्लिक करण्यासाठी एक चांगले दृश्य देखील मिळेल. तुम्ही येथे सेल्फी, ग्रुप फोटो घेऊ शकता. (Marathi News

)

New Year

राधानगर बीच, अंदमान
अंदमानच्या राधानगर बीचची गणना आशियातील सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये केली जाते. नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी येथे पांढरे वाळवंट, स्वच्छ पाणी आणि हिरवळ अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळे तुमची नवीन वर्षाची पार्टी अधिक मजेदार होणार आहे. इथे गर्दी खूप कमी दिसेल. नवीन वर्षात तुम्ही येथे अनेक वॉटर स्‍पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. (Marathi News)

New Year

केरळ
नवीन वर्षाच्या सुरवातीला केरळला जाण्याचा विचार करू शकता. येथील नैसर्गिक दृश्ये आणि नारळाची झाडे अतिशय सुंदर दिसतात. याशिवाय समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्ष साजरे करता येईल. जर तुम्हाला शांत आणि शांत वातावरण हवे असेल तर या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. (Latest Marathi Headline)

New Year

गंगटोक
भारतातील जरा हटके ठिकाणी जाऊन तुम्हाला नव्या वर्षाचे स्वागत करायचे असेल तर गंगटोक हे चांगले ठिकाण आहे. येथील बर्फ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतोच शिवाय येथील लोकल पब आणि बार हे पर्याय तर आहेतच. याशिवाय तुम्ही स्किंग आणि स्नो बोर्डिंग करुनही सेलिब्रेशन करु शकता. (Latest Marathi News)

New Year

अंजुना बीच, गोवा
अंजुना हा गोव्यातील ट्रान्स म्युझिक आणि बोहेमियन संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. नवीन वर्षाला येथे अनेक प्रसिद्ध पार्टी ठिकाणे आहेत. कर्लीज आणि शिवा व्हॅली येथे फुल मून पार्टीज किंवा न्यू इयर ट्रान्स इव्हेंट्स आयोजित केले जातात. (Top Stories)

New Year

अलिबाग 
अलिबाग बीच हे मुंबईजवळील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी मऊ वाळू, लाटांचा आवाज आणि अप्रतिम सूर्यास्त येथे कॅम्पिंग करणे एक वेगळाच आनंद देते. रात्रीच्या वेळी समुद्राच्या लाटांसोबत बोनफायर, लाईव्ह म्युझिक, बार्बेक्यू आणि तारांकित आकाशाखाली बसून गप्पा मारण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. फ्रेंड्ससोबत कुटुंबासोबत किंवा कपल्ससाठीही अलिबाग बीच कॅम्पिंग हा एक परफेक्ट वीकेंड गेटवे आहे. (Top Marathi Headline)

New Year

अलेप्पी
अलेप्पी ज्याला अलेप्पुझा म्हणूनही ओळखले जाते, हे दक्षिण भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. तुम्ही येथे पार्टी करण्यासाठी येऊ शकता. अलेप्पीमधील समुद्रकिनारे, बॅकवॉटर आणि गोंडस ब्लॉक आयलंड ही अद्भुत ठिकाणे आहे. (Latest Marathi News)

New Year

मनाली
हिवाळ्यामध्ये हिमाचल प्रदेशला भेट देणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. मनाली येथे बर्फवृष्टी होत आहे. तसेच येथील वातावरण खूप सुंदर भासते. याशिवाय तुम्ही शिमला, कसौली इत्यादी ठिकाणांनाही भेट देऊ शकता. नवीन वर्षात भेट देण्यासाठी हे खूप चांगले ठिकाण आहे. (Top Trending Headline)

New Year

=========

MPs Fight In Parliament : संसदेत खासदार भांडले तर काय होऊ शकतं? जाणून घ्या कायदा आणि विशेषाधिकार

=========

कन्याकुमारी बीच
कन्याकुमारी बीच येथे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात. यंदा तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत कन्याकुमारी येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे नेत्रसुखद दृश्य पाहून करू शकता. दरवर्षी येथे नववर्ष साजरे करण्यासाठी लोकांची गर्दी होते. (Social News)

New Year

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!