Home लाईफ स्टाईल Acne vs Pimples : एक्ने आणि पिंपल्समध्ये आहे खूप मोठा फरक, बहुतांश लोकांना नाही माहिती
लाईफ स्टाईल

Acne vs Pimples : एक्ने आणि पिंपल्समध्ये आहे खूप मोठा फरक, बहुतांश लोकांना नाही माहिती

0
Acne on face
Acne on face

Acne vs Pimples : चेहऱ्यावर दाणे येणे ही समस्या जवळजवळ प्रत्येकाला कधीतरी भेडसावते. पण दाणे दिसताच प्रत्येकजण त्यांना पिंपल म्हणतो, तर काही जण *एक्ने* समजतात. मात्र त्वचारोग तज्ज्ञांच्या मते हे दोघे एकसारखे नाहीत. नावात साम्य असलं तरी एक्ने आणि पिंपल हे दोन वेगवेगळे स्किन कंडिशन्स आहेत आणि त्यांचे कारणही वेगळे असते. एवढेच नाही तर उपचार पद्धतीही बदलतात. त्यामुळे या फरकाची योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे.(Acne vs Pimples)

एक्ने म्हणजे काय? (What is Acne) एक्ने ही चेहऱ्यावरील तेल ग्रंथी (Sebaceous Glands) आणि पोर्स ब्लॉक होण्यामुळे निर्माण होणारी स्किन कंडिशन आहे. त्वचेवर जास्त प्रमाणात ऑईल तयार झाल्यास, मृत त्वचा आणि धुळीबरोबर मिसळून पोर्स पूर्णपणे ब्लॉक होतात. यामध्ये त्वचेवर व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स, सिस्ट, नोड्यूल्स, दाणे होऊ शकतात.एक्ने दीर्घकाळ टिकते, पुन्हा येते आणि कधी-कधी त्वचेवर डाग व खड्डेही निर्माण करते. म्हणून एक्ने ही केवळ काही दिवसांची समस्या नसून एक  स्किन डिसऑर्डर मानली जाते. (Acne vs Pimples)

Acne vs Pimples
Acne vs Pimples

पिंपल म्हणजे काय? (What is Pimple) पिंपल हा एक्नेचा एक भाग आहे. त्वचेवर एक-दोन दाणे किंवा सूजलेला छोटासा लाल दाणा दिसला तर त्याला साधारणत पिंपल म्हणतात.पिंपल एकवेळचा दाणा असतो आणि योग्य काळजी घेतल्यास काही दिवसांत बरा होतो. पिंपल येण्याचे प्रमुख कारण म्हणजे घाम, धूळ, जास्त ऑयली फूड, हार्मोनल बदल किंवा स्वच्छतेची कमतरता. (Acne vs Pimples)

फरक समजून घ्या (Major Difference)

 Acne | Pimple

 स्वरूप  स्किन कंडिशन  दाणा  सूज 
 कालावधी  दीर्घकाळ राहते  काही दिवसांत जाते 
 संख्या  अनेक दाणे, ब्लॅकहेड्स, सिस्ट 1 ते 2 दाणे 
 परिणाम  डाग व खड्डे पडू शकतात  क्वचित डाग 
 उपचार विशेष स्किन ट्रीटमेंट आवश्यक  घरगुती/साधी काळजी पुरेशी 

=========================

हे देखिल वाचा :

Oily Food : ऑयली फूड खाल्ल्याने खरोखर पिंपल्स वाढतात का? जाणून घ्या संपूर्ण सत्य

Pickle Oil : हिवाळ्यात लोणच्याचे तेल का सुकते? जाणून घ्या ते पुन्हा पूर्वीसारखे मऊ आणि वापरण्यायोग्य कसे कराल

Skin Care : स्किनकेअर रूटीन करूनही मिळत नाही रिजल्ट? या चुका ठरतायत मोठी कारणं!

==========================

उपचार आणि काळजी कशी घ्यावी? एक्ने आणि पिंपलचे उपचार वेगळे असतात. एक्ने साठी औषधं, स्किन ट्रीटमेंट, रेटिनॉइड्स, केमिकल पीलिंग उपयोगी.
पिंपल साठी टी ट्री ऑईल, बर्फ लावणे, नॉन-ऑयली प्रॉडक्ट्स आणि हेल्दी डाएट पुरेसे. दाणे फोडणे किंवा खाजवणे टाळा, अन्यथा डाग होतात. भरपूर पाणी प्या आणि चेहरा दिवसातून 2 वेळा स्वच्छ धुवा. तेलकट, जंक फूड आणि साखर कमी करा.त्वचारोग तज्ज्ञांच्या मते प्रत्येक पिंपल एक्ने नसतो, पण प्रत्येक एक्नेची सुरुवात पिंपलपासूनच होते.म्हणून जर दाणे वारंवार येत असतील आणि महिन्योनमहिने बरे होत नसतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण लवकर उपचार सुरू केले तर डाग व खड्डे होण्यापासून बचाव होतो. (Acne vs Pimples)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:
🏏 Live Cricket Score
⏳ लोड होत आहे...

Related Articles

लाईफ स्टाईल

Akshay Tritiya : धनप्राप्तीसाठी या अक्षय तृतीयेला करा हे सोपे उपाय

येत्या रविवारी साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा अक्षय्य...

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Amavasya : पितृदोष दूर करण्यासाठी वैशाख अमावस्येला करा ‘हे’ उपाय

हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथी पूर्वजांच्या आत्म्यास शांती...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!