Home आंतरराष्ट्रीय Saudi Arabia : वाळवंटी देशाला वाळू आयात करण्याची वेळ
आंतरराष्ट्रीय

Saudi Arabia : वाळवंटी देशाला वाळू आयात करण्याची वेळ

0

सौदी अरेबियामध्ये ९५ टक्के भाग हा वाळवंटानं व्यापला आहे. यामध्येच  जगातील सर्वात मोठे वाळूचे वाळवंट, रुब अल-खाली याचा समावेश आहे. अल-रुब अल खाली हे वाळवंट सौदी अरेबियाच्या आग्नेय भागात असून अंदाजे ४३०,००० चौरस किलोमीटर क्षेत्रात त्याचा विस्तार झाला आहे. त्यापाठोपाठ अन-नाफुद आणि अद-दहना सारखे वाळवंटी प्रदेश सौदी अरेबियामध्ये आहेत. या वाळवंटात लाखो टन वाळू आहे. पण या वाळूचा सौदी अरेबियाच्या विकासकामांमध्ये काहीही उपयोग होत नाही, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. म्हणूनच जगातील सर्वात मोठं वाळवंटी क्षेत्र असलेल्या सौदी अरेबियामध्ये बांधकामाला लागणारी वाळू आयात करण्यात येत आहे. सौदी अरेबिया आणि युएई सारख्या देशांमध्ये वाळवंटी क्षेत्र भरपूर असतांनाही त्यांना परदेशातून वाळू आयात करावी लागले. त्याला कारण ठरलं आहे, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली विकासकामे. येथे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक मोठ्या बांधकाम प्रकल्पामध्ये करण्यात आली आहे. या कॉंक्रीटीकरणासाठी ज्या पद्धतीची वाळू लागले, ती वाळू सौदीमधील वाळवंटात नाही. या सर्वात सौदी अरेबियाचे व्हिजन २०३० हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात सिमेंटला पक्की धरुन रहाणारी वाळू हवी आहे, ही वाळू ऑस्ट्रेलिया आणि चीनकडून सौदी आयात करत आहे. ( Saudi Arabia )

Saudi Arabia
Saudi Arabia

ज्या देशातील वाळवंट बघण्यासाठी जगभरातून पर्यटक जातात, त्या देशाला बांधकामासाठी अन्य देशातून वाळू आयात करावी लागते, हे सांगितले तर आश्चर्य वाटले. पण हे वास्तव आहे. सौदी अरेबिया आणि युएई या देशांमध्ये चालू असलेल्या बांधकामासाठी ऑस्ट्रेलिया, चीन आणि बेल्जियम या देशांमधून रोज मोठ्या प्रमाणात वाळू आयात करण्यात येत आहे. ज्या देशात नजर पडेल तिथे वाळूचे डोंगर दिसतात, त्या सौदी अरेबियाला वाळू आयात करण्याची वेळ का आली, हा प्रश्न विचारण्यात येतो. कारण वाळवंटातील वाळू गुळगुळीत असते. अशी वाळू ही काँक्रीट बनवण्यासाठी कुचकामी असते. या वाळूमध्ये सिमेंट आणि पाणी मिसळल्यास त्याचे होणारे मिश्रण हे काळानं पोकळ होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सौदी अरेबियामधील वाळवंट ही वाळूनं भरली असली तरी ती वाळू या बांधकामासाठी उपयोगी नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच सौदीनं त्यांच्या नवीन प्रकल्पासाठी ऑस्ट्रेलियामधून मोठ्या प्रमाणात वाळू आयात करायला सुरुवात केली आहे. ( Saudi Arabia )

सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा सौदी व्हिजन २०३० हा ड्रिम प्रोजक्ट आहे. या अंतर्गत, सौदी अरेबियाचे तेलावरील अवलंबित्व कमी करुन तेथील अर्थव्यवस्थेत विविधता येत आहे. यामध्ये रेड सी प्रोजेक्ट आणि किद्दिया, मुरब्बाह आणि जेद्दाह टॉवर सारख्या अनेक इमारती आणि शहरे यांचा समावेश आहे. हा सर्व प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी दिले आहे. यात NEOM सारखी भविष्यकालीन शहरे आणि रियाध, जेद्दाह सारख्या शहरांचा पुनर्विकास हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. भविष्यकालीन तंत्रज्ञानावर आधारित १७० किमी लांबीचे रेषीय शहर, हे जगातील अद्भूत चमत्कार ठरणार आहे. शिवाय मुकाब ही रियाधच्या मध्यभागी असलेली एक भव्य घन-आकाराची इमारतही लक्ष वेधून घेणारी आहे. ( Saudi Arabia )

=======

हे देखील वाचा : Bangladesh News : बांगलादेशात पत्रकारांचे जगणं झालंय कठीण

=======

जगातील सर्वात मोठ्या इमारतींपैकी एक असलेल्या या इमारतीमध्ये  हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन सुविधा आहेत. यासोबत जेद्दाह टॉवर ही सुद्धा जगातील सर्वात उंच इमारत सौदीमधील निओम शहरात बांधण्यात येत आहे. या सर्वात सौदीच्या समुद्रकीना-यावर ५० हून अधिक लक्झरी रिसॉर्टसचे काम चालू आहे. किद्दिया नावाचे भव्य मनोरंजन, क्रीडा आणि कला केंद्र उभारण्यात येत आहे. सौदीमध्ये पर्यटनाचा विकास कऱण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. हे सर्व बांधकाम पर्यावरण पूरक व्हावे आणि पुढील १०० वर्ष या बांधकामाला धक्का लागू नये, यासाठी प्रिन्स मोहम्मद यांचा आग्रह आहे. यातूनच या बांधकामात वापरण्यात येणा-या प्रत्येक वस्तूचे शास्त्रीय परिक्षण करण्यात येत आहे. या सर्वात सौदीच्या वाळवंटातील वाळूचे परिक्षण कऱण्यात आले. यातून ही वाळू कॉक्रिटीकरणासाठी फायद्याची नसल्याचे स्पष्ट झाले. गगनचुंबी इमारतींमध्ये या वाळूचा वापर करुन तयार केलेले कॉक्रींटीकरण भक्कम रहाणार नाही, असे सिद्ध झाल्यावर आता ऑस्ट्रेलियामधून वाळू मागवण्याचा निर्णय सौदीमध्ये घेण्यात आला, आणि वाळूभरलेल्या देशात अन्य देशातून वाळू आयात सुरु झाली. ( Saudi Arabia )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!