Home लाईफ स्टाईल Winter Trip : जाणून घ्या हिवाळी ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणे
लाईफ स्टाईल

Winter Trip : जाणून घ्या हिवाळी ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणे

1

बाहेर फिरण्यासाठी आणि नवनवीन फिरण्याची ठिकाणं एक्सप्लोर करण्यासाठी हिवाळा हा अतिशय उत्तम ऋतू आहे. त्यामुळे अनेक लोकं हिवाळा सुरु झाला की, फिरण्याचे प्लॅनिंग करायला सुरुवात करतात. आता सगळ्याच लोकांना महाराष्ट्राबाहेर किंवा भारताबाहेर फिरायला जाणे शक्य होते असे नाही. अशाच लोकांसाठी आज आम्ही महाराष्ट्रातील हिवाळ्यात फिरण्याची काही प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणं सांगणार आहोत. जे तुमच्या बजेटमध्ये तर असतील सोबतच जवळ देखील असतील. (Winter Trip)

पाचगणी
महाबळेश्वर पासून जवळच वीस किलोमीटर अंतरावर असलेले पाचगणी हे अतिशय शांत आणि मनमोहक असे हिल स्टेशन आहे. पाचगणी येथे थंड हवामान, घनदाट जंगले, आणि निसर्गरम्य वातावरण हे ठिकाण खास बनवतात. पाचगणी येथील मुख्य आकर्षण वाय टेबल, १२ डोळे आणि बाबा ब्राह्मण मंदिर हे आहेत. पाचगणी येथे तुम्ही पिकनिक आणि ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. (Marathi News)

Winter Trip

माथेरान
मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानचं निसर्ग सौंदर्य आणि येथील जंगल नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नसलेल्या वाहनविरहित पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. इथली शांतता आणि विविध स्पॉट पाहून नक्कीच हिवाळ्याचा आनंद द्विगुणित होईल. (Todays Marathi Headline)

Winter Trip

भीमाशंकर
भीमाशंकर मंदिर हे हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर भीमाशंकर आहे. भीमाशंकर हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. भव्य जंगले आणि डोंगरांनी भीमाशंकरला वेढलेले आहे. हिवाळ्यात येथील तापमान इतर ठिकाणापेक्षा कमी असते. भीमाशंकरच्या जंगलामध्ये तुम्ही ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकतात जो खूप रोमांचक असतो. (Marathi News)

Winter Trip

इगतपुरी
मुंबई नाशिक महामार्गावर असलेले इगतपुरी हे ठिकाण विकेंड ट्रीपसाठी अतिशय उत्तम आणि सोयीस्कर पर्याय आहे. या इगतपुरी तालुक्याला निसर्गाने सौंदर्याचे भरपूर वरदान दिले आहे. इथे भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात इथे भरपूर हिरवळ आणि प्रचंड थंडी अनुभवायला मिळते. शिवाय जवळच भावली धरण, घाटनदेवी परिसर, दारणा, वैतरणा या धरणांचा परिसर, कावनई अशी अनेक ठिकाणं पाहता येतात. इगतपुरी जवळच भंडारदरा, कळसूबाई, अलंग, कुरूंगवाडी, त्र्यंबकेश्वर येथेही भेट देता येते. (Top Marathi Headline)

Winter Trip

महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे. हे सुंदर हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून ४ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेले आहे. ढगांनी आच्छादलेले उंच पर्वत, घनदाट जंगले, गवताळ प्रदेश आणि तलाव आणि धबधबे महाबळेश्वरच्या सौंदर्यात भर घालतात. हिवाळ्यात अनेक लोक पिकनिक आणि ट्रेकिंगसाठी येतात. महाबळेश्वरमध्ये तुम्ही मॅप्रो गार्डन, वेण्णा लेक, महाबळेश्वर मंदिर आणि विल्सन पॉइंट सारखी अद्भुत ठिकाणे पाहू शकता. (Latest Marathi News)

Winter Trip

तोरणमाळ
नंदुरबार जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ. हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. दुर्गम भागात असल्याने या तोरमाळ ठिकाणच्या आजूबाजूला कोणतेही मोठे शहर नाही. त्यामुळे येथे फार लोक जात नाहीत. जास्त गर्दी नसल्याने हे ठिकाण शांत आणि प्रदूषणविरहित आहे. येथे यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथांची गुहा, गोरक्षनाथांची यात्रा, सीताखाई पॉईंट, ट्रेकिंग स्पॉट आणि अनेक धबधबे देखील आहे. (Top trending News)

Winter Trip

=========

Winter Trip : हिवाळ्यातील पर्यटनासाठी ‘ही’ आहेत भारतातील बेस्ट

=========

गगनबावडा
गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. गगनगड आणि श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम हे या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी मोरजाई पठारही जवळच आहे. येथे असणाऱ्या जंगलांत मोठ्या प्रमाणावर जैवविविधता बघायला मिळते. अनेक प्रकारचे पक्षी, झाडे, फुलपाखरे, प्राणी तसेच औषधी वनस्पती ह्या जंगलात आहेत. (Social News)

Winter Trip

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!