Home लाईफ स्टाईल Whatsapp : WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केले हे ओळखण्यासाठी टिप्स
लाईफ स्टाईल

Whatsapp : WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केले हे ओळखण्यासाठी टिप्स

72

आजच्या आधुनिक काळात व्हॉट्सअप हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे. व्हॉट्सअप शिवाय कोणाचेही पान हालत नाही. इन्स्टंट मेसेज अँप म्हणून व्हॉट्सअपची संपूर्ण जगात ओळख आहे. व्हॉट्सअॅपचा जगभरात कोट्यवधी लोक वापर करतात. तसेच व्हॉट्सअॅप सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लागोपाठ नवीन फीचर्स येत आहेत. यापैकीच एक फीचर म्हणजे समोरील व्यक्तीला ब्लॉक करणे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही आपली प्रायव्हसी मेन्टेन ठेवू शकता. व्हॉट्सअपकडून ग्राहकांना विविध फीचर्स देण्यात येतात. यामध्ये चॅटिंग, वॉईस कॉलिंग, व्हिॉडिओ कॉलिंग असे अनेक फीचर्स आहेत. (Whatsapp)

व्हॉट्सअपचा वापर अधिक सोयीस्कर करण्यासाठी कंपनीकडून नेहमीच विविध फीचर्स यात दिले जातात. ग्राहकांची प्रायव्हसी आणि सेफ्टी लक्षात घेतात कंपनीने प्रायव्हसी फीचर्स सुद्धा उपलब्ध करुन दिले आहे. यामधीलच एक फिचर म्हणजे ब्लॉक. खरंतर तुम्हाला एखाद्याने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले असेल तर तुम्हाला पटकन कळत नाही. कारण तुम्हाला ब्लॉक करण्याचे अधिकार हे युजर्सचे असतात त्यामध्ये समोरचा व्यक्ती काहीही करु शकत नाही. अशातच तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलेय हे शोधून काढण्यासाठी पुढील काही ट्रिक्स तुमच्या कामी येणार आहेत. (Todays Marathi Headline)

​लास्ट सीन किंवा ऑनलाइन चेक करा
व्हॉट्सअॅपवरचा हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपमधील विंडोच्या वर दिलेल्या युजरचे लास्ट सीन किंवा तो ऑनलाइन आहे की नाही, हे चेक करू शकता. युजर आपली प्रायव्हसी सेटिंग बदलू पण शकतो. परंतु, हे इंडिकेटर आहे. ज्यातून तुम्हाला संकेत मिळू शकतात. व्हॉट्सअॅपवर दिवसभरात हजारो मेसेज धडाधड पडत असतात. काही अनोळखी लोक सुद्धा मेसेज पाठवत असतात. आपल्याला कुणी ब्लॉक केले हे लवकर समजत नाही. (Marathi News)

Whatsapp

व्हॉट्सअॅप ग्रुप करा
जर तुम्हाला वाटत असेल की, समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे तर एक ग्रुप बनवा. जर तुम्हाला खरंच त्याने ब्लॉक केले असेल तर तुम्ही त्याला ग्रुप मध्ये अॅड करु शकत नाहीत. (Marathi)

मेसेज पाठवून पहा
समोरच्या व्यक्तीला मेसेज पाठवा आणि जर डबल टिक मार्क न आल्यास याचा अर्थ असा होतो की, तुमचा मेसेज डिलिव्हर झालेला नाही. काही तासांसाठी किंवा २-३ दिवसांपर्यंत मेसेज पोहचलाच नाही तर समजून जा समोरच्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे. (Top Marathi News)

​बदलेला प्रोफाईल पिक्चर दिसणार नाही
जर तुम्हाला एखाद्या युजरने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले तर तुम्ही त्या युजरच्या प्रोफाईलवर जाऊन त्याची प्रोफाईल पिक्चर बदलली आहे का हे तपासू शकता. जर तुम्हाला त्या युजरने ब्लॉक केले असेल तर तुम्हाला त्या युजरची प्रोफाईल पिक्चर बदललेली दिसणार नाही. तुम्हाला त्याची प्रोफाईल पिक्चर तीच दिसेल जी त्याने शेवटी तुमच्यासोबत चॅट केली होती. जर खूप दिवसांपर्यंत प्रोफाईल पिक्चर बदललेली दिसली नाही की शक्यता आहे. तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केले असल्याची. (Latest Marathi Headline)

​डबल चेक मार्क
जर एखाद्या नंबरने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर तुम्ही पाठवलेल्या मेसेजनंतर तुम्हाला केवळ एक चेक मार्क दिसेल. याचाच अर्थ असा होतो की, त्या युजरने तुम्हाला ब्लॉक केले आहे. कारण, तुमचा मेसेज त्या युजर पर्यंत पोहोचलाच नाही. ब्लॉक केल्यानंतर कितीही मेसेज पाठवले तरी ते मेसेज त्या व्यक्तीपर्यंत जात नाही. त्यामुळे नेहमी केवळ एकच चेक मार्क दिसते. मेसेज पाठवल्यानंतर काही तासांनंतर सुद्धा तुम्हाला केवळ एक चेक मार्क दिसत असेल तर समजून जा तुम्हाला त्या युजरने ब्लॉक केले आहे. (Top Stories)

=======

पैशाची चिंता सोडा! श्रीमंत व्हायचं असेल तर ‘Financial Literacy’ समजून घ्या

=======

​व्हॉट्सअॅप कॉल जाणार नाही
जर तुम्हाला एखाद्या कॉन्टक्ट नंबरने ब्लॉक केले असेल तर तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल करू शकणार नाहीत. इंटरनेटवरून व्हॉट्सअॅप कॉल करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या युजर पर्यंत तुमचा कॉल जाणार नाही. व्हॉट्सअॅप जात नसेल तर समजून जा की, त्या युजरने तुम्हाला त्याच्या फोनमध्ये ब्लॉक केले आहे. रिचार्ज व्हाऊचर्स संपल्यानंतर अनेक जण आपल्या फोन यादीतील अनेक जणांना पर्याय म्हणून व्हॉट्सअॅप कॉल करत असतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!