Home लाईफ स्टाईल Narmada River : नर्मदा परिक्रमेची इत्यंभूत माहिती
लाईफ स्टाईल

Narmada River : नर्मदा परिक्रमेची इत्यंभूत माहिती

77
Nobel Prize

भारतात सर्वच नद्यांना जीवनदायिनी असे म्हटले जाते. याच नद्यांच्या किनाऱ्यावर मनुष्याने आपली प्रगती केली आहे. भारतातील नद्यांना आपण ‘आई’ म्हणून संबोधतो. देशातील प्रत्येक नद्यांना मोठे धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक नदीच्या उगमाची एक खास आख्ययिका देखील सांगितली जाते. शिवाय प्रत्येक नदीची माहिती आपल्याला आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये देखील सापडते. भारतातील सर्वात मोठ्या आणि पवित्र नद्यांपैकी एक नदी म्हणजे, नर्मदा नदी. नर्मदा नदीबद्दल म्हटले जाते की, गंगा स्नानाने पाप नष्ट होतात, तर नर्मदेच्या केवळ दर्शनाने पाप मुक्ती मिळते. नर्मदा नदी ही मध्यप्रदेशमधील अमरकंटकमधील कोटीतर्थ हे नर्मदेचे उगमस्थान आहे. येथे सुमारे 34 पांढऱ्या रंगाची मंदिरे आहेत. येथे नर्मदा उगम कुंड आहे, जिथून नर्मदा नदी उगम पावते आणि वाहते. (Narmada River)

नर्मदा ही नदी मध्यप्रदेश आणि गुजरात मधून वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदेचा प्रवाह हा शिवाच्या ऊर्जेचे आणि तपश्चर्येचे प्रतीक आहे. नर्मदा नदीला हिंदू धर्मात जीवित देवी असे मानले जाते. नर्मदा नदीचे महत्त्व स्कंद पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये आढळते. नर्मदेत स्नान आणि दर्शन घेतल्याने पाप नष्ट होतात असे सांगितले जाते. याच कारणामुळे नर्मदा परिक्रमा ही जन्म- मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याची साधना मानली गेली आहे. हिंदू धर्मामध्ये नर्मदा परिक्रमा अतिशय महत्त्वाची आणि पुण्यफल देणारी मानली गेली आहे. अनेक भाविक नर्मदा परिक्रमा करतात. या परिक्रमेचे मोठे फळ मिळत असल्याने नर्मदा परिक्रमा अतिशय प्रसिद्ध आहे. नर्मदा नदी ही अमरकंटक येथे उगम पावते तर गुजरातमधील खंभातच्या आखातात विलीन होते. नर्मदा नदीच्या काठावर अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि शहरे आहेत. हिंदू पुराणात तिला रेवा नदी म्हणतात. त्याची परिक्रमा अत्यंत महत्त्वाची आहे. (Marathi)

Narmada River

नर्मदा परिक्रमा कधी असते?
नर्मदा परिक्रमा दोन प्रकारे होते. पहिली दरमहा नर्मदा पंचक्रोशी यात्रा होते आणि दुर्गम नर्मदा परिक्रमा होते. दर महिन्यात होणार्‍या पंचक्रोशी यात्रेची तिथी कॅलेंडर मध्ये दिलेली असते. ही यात्रा तीर्थ नगरी अमरकंटक, ओंकारेश्वर आणि उज्जैन हून प्रारंभ होते. ज्या ठिकाणाहून प्रारंभ होते तेथेच संपते. तसेच दुसरीकडे परंपरेनुसार हे चक्र दर वर्षी चातुर्मासच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रबोधिनी एकादशीनंतर सुरु होते. नर्मदा परिक्रमेचा मार्ग हा अमरकंटक, माई की बगिया हून नर्मदा कुंड, मंडळा, जबलपुर, भेडाघाट, बरमानघाट, पतईघाट, मगरोल, जोशीपुर, छपानेर, नेमावर, नर्मदासागर, पामाखेडा, धावडीकुंड, ओंकारेश्‍वर, बालकेश्‍वर, इंदूर, मंडलेश्‍वर, महेश्‍वर, खलघाट, चिखलरा, धर्मराय, कातरखेडा, शूलपाडी की झाड़ी, हस्तीसंगम, छापेश्वर, सरदार सरोवर, गरुडेश्वर, चंदोद, भरूच. यानंतर परतताना पोंडी होत बिमलेश्वर, कोटेश्वर, गोल्डन ब्रिज, बुलबुलकंड, रामकुंड, बडवानी, ओंकारेश्वर, खंडवा, होशंगाबाद, साडिया, बरमान, बरगी, त्रिवेणी संगम, महाराजपुर, मंडला, डिंडोरी आणि नंतर अमरकंटक असा आहे. (Top Trending Headline)

नर्मदा तटावर अनेक तीर्थ स्थित आहे ज्यापैकी काही प्रमुख तीर्थ – अमरकंटक, मंडला, भेडाघाट, होशंगाबाद, नेमावर, ओंकारेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर, शुक्लेश्वर, बावन गज, शूलपानी , गरुडेश्वर, शुक्रतीर्थ, अंकेश्वर, करनाली, चंदोद, शुकेश्वर, व्यसतीर्थ, अनसुयामाई तप स्थल, कंजेठा शकुंतला पुत्र भारत स्थल, सिनोर, अंगारेश्वर, धायडी कुंड आणि भृगु-कच्छ किंवा भृगु-तीर्थ आणि विमलेश्वर महादेव तीर्थ. (Top Marathi News)

नर्मदा परिक्रमेचे नियम
– जेथून परिक्रमा सुरू होते त्याचठिकाणी संपते. मात्र, परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला जल अर्पण करणे बंधनकारक आहे.
– कोणत्याही परिस्थितीत नर्मदा नदीला ओलांडता येत नाही.
– नर्मदा परिक्रमा ही नेहमी दिवसा केली जाते. सूर्यास्तानंतर परिक्रमा केली जात नाही.
– संकल्प पूजनावेळी घेतलेल्या नियमांचे कडक पालन केले जाते.
– सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्नान, पूजा आणि आरती करावी. (Latest Marathi Headline)
– परिक्रमेदरम्यान कोणाकडूनही साहित्य मागितले जात नाही. जे मिळेल ते घेऊन काम केले जाते.
– परिक्रमेदरम्यान नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे आणि जमिनीवर झोपावे.
– परिक्रमा नेहमी नर्मदा नदीच्या डाव्या तीरापासून सुरू होते.
– परिक्रमा करणारे फक्त नर्मदा काठ, आश्रम, मंदिरे किंवा धर्मशाळांमध्ये राहू शकतात.
– साधू, संतांना यांना तीन चातुर्मास पाळावे लागतात.
– पायी चालत नर्मदेची प्रदक्षिणा 3 वर्षे 3 महिने 13 दिवसांत पूर्ण होते. (Top Stories)
– दक्षिण तीराची प्रदक्षिणा नर्मदेच्या काठापासून पाच मैलांपेक्षा जास्त अंतरावरून करू नये आणि उत्तर तीराची प्रदक्षिणा साडेसात मैलांपेक्षा जास्त अंतरावरून करू नये
– नर्मदा कुठेही ओलांडू नका. नर्मदेत बेटे असलेल्या ठिकाणी जाऊ नका, परंतु जर नर्मदेला जोडणाऱ्या उपनद्या ओलांडायच्या असतील तर त्या फक्त एकदाच ओलांडा

नर्मदा नदी उत्पत्ती कथा
नर्मदा नदीला शंकरकन्या किंवा शिवप्रिया असे ही म्हणतात. नर्मदा नदीबद्दल स्कंद पुराणात “शिवस्य कण्ठात् प्रवृत्ता नर्मदा लोकपावनी।” असे म्हटले आहे. नर्मदा नदीची उत्पत्ती कथा हिंदू धर्मातील एक रहस्यमय कथांपैकी एक आहे. नर्मदेला केवळ नदी नाही तर जीवित देवी आणि शिवाची कन्या मानले जाते. तिची कथा तप आणि करुणेतून निर्माण झाली आहे. पौराणिक कथेनुसार, नर्मदा मातेचा जन्म भगवान शिवाच्या घामाच्या थेंबातून झाला होता, जेव्हा ते कठोर तपश्चर्येत लीन होते. म्हणूनच नर्मदेला शिवाची कन्या आणि पवित्र आणि मोक्ष देणारी असे म्हणतात. शंभो महादेवाने हजारो वर्षे गहन तप केले. तपश्चर्ये दरम्यान त्यांच्या शरीरातून घामाचे थेंब खाली पडले. त्या थेंबापासून नर्मदा नदीचा अवतार झाला. म्हणून तर “गंगा स्नानेन मुच्यते, नर्मदा दर्शनात्।” अर्थात गंगेत स्नान केल्याने पाप धुतात, पण नर्मदेच्या दर्शनानेच पाप नष्ट होतात असे म्हणतात.शास्त्रात नर्मदा नदीच्या परिक्रमेलाही अत्यंत पुण्यकारक मानले जाते, म्हणून आज ही भक्तगण “नर्मदे हर, नर्मदे हर” म्हणत अपार श्रद्धेने नर्मदा परिक्रमा करतात. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!