आज 1 एप्रिल 2026. आजपासून 2026 सालातल्या चौथ्या महिन्याची आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. आजपासून २०२६-२७ या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असतानाच सोबत देशात अनेक मोठे आर्थिक आणि नियामक बदल लागू केले जात आहे. या नवीन नियमांचा आणि बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे. या बदलांमध्ये आयकर आणि आयटीआर भरण्याच्या नियमांमधील सुधारणा, पॅन अर्ज प्रक्रियेतील बदल, एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये सुधारणा आणि रेल्वे तिकीट बुकिंग प्रणालीतील बदलांचा समावेश असणार आहे. शिवाय पगार, इनकम टॅक्स, बँक, फास्ट टॅगसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक नियमांमध्ये 1 एप्रिलपासून बदल होणार आहेत. बँकिंग, करप्रणाली आणि डिजिटल व्यवहारांशी संबंधित काही मोठे निर्णय लागू बुधवारपासून लागू होत आहेत. जाणून घेऊया याच सर्व नियमांबद्दल. (April 2026)
ATM नियमांमध्ये बदल
आता ATM मधून पैसे काढणे थोडे महागडे ठरू शकते. HDFC सारख्या बँका आता UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याची विनामूल्य मर्यादा म्हणून मोजतील. 5 ट्रान्झॅक्शननंतर प्रत्येक वेळी 23 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, बंधन बँकेत कमी शिल्लक राहिल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये दंड आकारला जाईल. पीएनबीने निवडक कार्डांसाठी कमाल दैनिक पैसे काढण्याची मर्यादा ₹1 लाखावरून ₹50000 पर्यंत कमी केली आहे, जी 1 एप्रिलपासून लागू होईल.
नवीन आयकर कायदा
सर्वात मोठा बदल १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन आयकर कायदा, २०२५ मुळे होईल. हा नवीन कायदा अनेक दशके जुन्या १९६१ च्या आयकर कायद्याची जागा घेईल. परिणामी, मध्यमवर्गीय आणि पगारदार व्यक्तींना जुन्या आणि नवीन करप्रणालींपैकी निवड करण्यासाठी त्यांच्या कर गणनेचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. सरकारने सवलतीच्या मर्यादेत केलेल्या बदलांमुळे जुन्या करप्रणालीला नवीन ओळख मिळाली आहे.

क्रेडिट कार्ड
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारे नवीन नियम तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. आयकर कायदा २०२५ अंतर्गत प्रस्तावित असलेल्या या बदलांचा उद्देश क्रेडिट कार्डचा वापर अधिक पारदर्शक करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे हा आहे. विशेषतः, पॅन लिंकिंग आणि मोठ्या व्यवहारांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाईल. जरी याचा सर्वसामान्य वापरकर्त्यांवर फारसा परिणाम होणार नाही, तरी याचा जास्त खर्च करणाऱ्यांवर आणि परदेश प्रवास करणाऱ्या लोकांवर थेट परिणाम होऊ शकतो. (Finicial Year)
FASTag नियमांमध्ये बदल
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 2026–27 या आर्थिक वर्षासाठी FASTag वार्षिक पासच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता अधिक खर्च करावा लागू शकतो. (Top Trending News)
डिजिटल पेमेंटसाठी 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, सर्व डिजिटल व्यवहारांसाठी 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य राहणार आहे. OTP आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरूच राहणार असून हे नियम 1 एप्रिल 2026 पासून अधिक काटेकोरपणे लागू केले जातील. (Marathi)
पॅन कार्डसाठी नवीन नियम
आतापर्यंत पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार पुरेसा होता, परंतु ही सुविधा १ एप्रिल २०२६ पासून बंद केली जाईल. नवीन नियमांनुसार, पॅन मिळवण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असेल. नवीन नियमांमुळे पॅन प्रक्रिया अधिक कडक आणि सुरक्षित होईल. (TOdays Marathi Headline)
रेल्वे तिकीट रद्द करणे महाग
भारतीय रेल्वेने १ एप्रिल २०२६ पासून तिकीट रद्द करणे आणि परतावा देण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तिकीट काही तास आधी रद्द केल्यास किती परतावा दिला जाईल, हे ठरवण्यासाठी एक नवीन प्रणाली लागू केली जाईल. या नवीन नियमांमुळे, ऐनवेळी तिकीट रद्द करणे प्रवाशांसाठी महागडे ठरू शकते. (Top Marathi News)
पेट्रोलमध्ये इथेनॉलची भेसळ
१ एप्रिल २०२६ पासून देशभरात पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल (E20) मिसळणे अनिवार्य असेल. यामुळे पेट्रोलचा दर्जा सुधारेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. कच्च्या तेलाची आयात कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. तथापि, या बदलामुळे काही जुन्या वाहनांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे मायलेज ३-७% ने कमी होईल. (Latest Marathi HEadline)
========
Donald Trump’s Special Gold Coin : आता सोन्याच्या नाण्यावर ट्रम्प
========
नवीन कामगार संहिता
नवीन कामगार संहिता 1 एप्रिलपासून देशभरात लागू होत असून, त्यानुसार मूळ वेतनाच्या 50% रक्कम देणे आवश्यक असेल. परिणामी, पीएफ (PF) योगदानात वाढ होऊ शकते आणि तुमचा हातात येणारा पगार कमी होऊ शकतो. (Top Stories)
एलपीजीच्या किंमतीत वाढ
मार्च महिन्यात, मध्य-पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, घरगुती आणि व्यावसायिक एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ₹60 ने आणि व्यावसायिक एलपीजीची किंमत ₹115 ने वाढवण्यात आली होती. तणाव कायम असल्याने, एलपीजीच्या किमतींमध्ये आणखी एक सुधारणा होण्याची शक्यता आहे.
RuPay डेबिट कार्डवरील नवीन नियम
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) RuPay डेबिट कार्डधारकांसाठी लाउंज अॅक्सेसच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत. 1 एप्रिल 2026 पासून विमानतळ आणि रेल्वे लाउंजमध्ये प्रवेश करण्याची पद्धत बदलणार असून काही मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics