Home लाईफ स्टाईल GK : उंच इमारती काचेच्याच का असतात?
लाईफ स्टाईल

GK : उंच इमारती काचेच्याच का असतात?

14

आजच्या आधुनिक काळात शहरं, गावं, झपाट्याने बदलत असून, त्याचाच चांगला कायापालट होत आहे. सगळ्याच बाबतीत आता आधुनिकरण होत असून, अनेक मोठ्या शहरांमध्ये डोळे दिपवणारा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. कालानुरूप प्रत्येक गोष्टींमध्ये होणारे बदल आपण बघत आलो आहोत. आधुनिकरणाची ओळख म्हणजे त्या विशिष्ट शहरामध्ये, गावामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या बिल्डिंग. कोणत्याही नवीन ठिकाणी आपण गेलो की, उंचच्या उंच बिल्डिंग आपले लक्ष वेधून घेतात. सर्वच मोठ्या बिल्डिंग आपण नीट पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की, या बिल्डिंगला बाहेरून भिंती नसतात तर काचा लावलेल्या असतात. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, या इमारतींना काचा का लावल्या जातात? (GK)

अनेकांना असे वाटते की, इमारतींना सुंदर बनवण्यासाठी असे केले जाते किंवा ही स्टाइल असेल मात्र यामागचे खरे कारण हे नाहीये. उंच इमारती काचेपासून बनवण्याचे कारण फक्त सौंदर्य असे वाटते. पण, प्रत्यक्षात तसे नाही. उंच इमारतींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काचेचा वापर करण्यामागे अनेक मोठी आणि वेगळी कारणे आहेत. नैसर्गिक प्रकाश आणि विजेची मोठी बचतकाचेच्या इमारती बनवण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ‘डे-लाईट हार्वेस्टिंग’. काचेच्या भिंतींमुळे सूर्यप्रकाश थेट इमारतीच्या आतपर्यंत पोहोचतो. यामुळे दिवसाच्या वेळी कार्यालयांमध्ये कृत्रिम दिवे लावण्याची गरज भासत नाही. परिणामी, विजेच्या वापरात मोठी घट होते आणि पर्यावरणाचं रक्षणही होते. (Marathi)

GK

काचेच्या या इमारती अशाप्रकारे बनवल्या जातात की त्या, जोरदार वारा, भूकंप किंवा इतर दाबांनाही सहज तोंड देऊ शकतात. या इमारती कोणत्याही हवामानाचा सामना करु शकतात आणि ओलाव्यामुळे खराब होण्याची काळजीही यात नसते. या इमारतींमध्ये सामान्य काच नाही तर एक विशेष प्रकारच्या इन्सुलेटेड काचांचा वापर केलेला असतो. ही काच बाहेरून येणारी उष्णता किंवा थंडी आत येऊ देत नाही, ज्यामुळे एअर कंडिशनर (एसी) किंवा हीटर वापरण्याची गरज कमी होते. यामुळे ऊर्जेची बचत होते. काचेच्या इमारती सुंदर, आधुनिक आणि व्यावसायिक दिसतात. कॉर्पोरेट कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्या ब्रँडची उपस्थिती आणि प्रभाव वाढवणाऱ्या ऑफिस स्पेस पसंत करतात. (Top Stories)

आधुनिक काचेच्या टेक्नोलॉजीमुळे काचेपासून बनलेल्या इमारती भूकंप, वादळाला तोंड देण्यासाठी सक्षम असतात. ओलावा आणि हवामानामुळे यांचे कोणतेही नुकसान होत नाही. इमारत काचेची असल्याने आगीपासून तुम्हाला सुरक्षित ठेवते. जरी काही कारणास्तव आग लागली तरी काचेच्या रचनेमुळे धूर आणि उष्णता लवकर बाहेर पडते. ज्यामुळे आत अडकलेल्यांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळतो. काचेच्या भिंती कमी धूळ आणि घाण जमा करतात. याशिवाय, त्यांना साफ करणं वीट किंवा दगडी भिंतींपेक्षा सोपं जाते. त्यामुळे उंच इमारती काचेच्या असतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!