Home लाईफ स्टाईल Tourism : घरांपासून गाड्यांपर्यंत पांढऱ्या रंगात न्हाऊन निघालेली ‘व्हाइट मार्बल सिटी’
लाईफ स्टाईल

Tourism : घरांपासून गाड्यांपर्यंत पांढऱ्या रंगात न्हाऊन निघालेली ‘व्हाइट मार्बल सिटी’

1
Ahoi Ashtami

जगभरात असंख्य शहरं आहेत. या प्रत्येक शहराचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असते. सगळ्यांनाच आपले शहर मोठ्या प्रमाणावर आवडते. मात्र असे असले तरी काही शहरांचे वैशिष्ट्ये किंवा खासियत ही त्या शहरांना जगाच्या नकाशावर ठळक करते. असे एक शहर आहे जे संपूर्ण जगातील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. जगात लोकांसाठी हे शहर बघणे त्यांच्या बकेट लिस्टमधील जणू एक इच्छाच बनली आहे. आम्ही ज्या शहराबद्दल बोलत आहोत ते संपूर्ण शहर पांढऱ्या रंगामध्ये न्हाऊन निघाले आहे. घरांपासून ते गाड्यांपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्याला या शहरात पांढरा रंग पाहायला मिळतो. (Todays Marathi HEadline)

हे सुंदर शहर आहे, तुर्कमेनिस्तानची राजधानी ‘अश्गाबात’. अश्गाबात हे संपूर्णपणे पांढऱ्या मार्बलने सजलेले शहर असल्याने हे शहर ‘व्हाइट मार्बल सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील इमारती, रस्ते आणि गाड्यांपर्यंत इथे सर्व काही पांढऱ्या रंगात नटलेले दिसून येते. या शहराची संपूर्ण रचना आणि जीवनशैली ही पांढऱ्या मार्बलभोवतीच फिरते. अश्गाबात या शहरातील बहुतांश इमारती, रस्ते आणि सरकारी स्ट्रक्चर्स हे चमकदार पांढऱ्या मार्बलने बनवण्यात आले आहे. शहरात पांढऱ्या मार्बलचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने या शहराची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. (Top Marathi News)

Tourism

अश्गाबात या शहराविषयी आणखी विशेष गोष्ट सांगायची झाल्यास येथील सर्व गाड्या पांढऱ्या रंगाच्याच आहेत. जर कोणी दुसऱ्या रंगाची गाडी घेऊन शहरात आले तर स्थानिक अधिकाऱ्यांकडून गाडी जप्त केली जाते. यासोबत वाहनमालकाला दंड देखील भरावा लागतो. जप्त केलेली कार परत मिळण्याची अट म्हणजे गाडीचा पेंट बदलून तिला पांढरा करणे. (Latest Marathi Headline)

अश्गाबात या शहरात पांढऱ्या रंगाचा नियम २०१८ सालापासून लागू करण्यात आला आहे. त्या सालचे राष्ट्राध्यक्ष बर्दीमुखामेदोव यांना पांढरा रंग अत्यंत आवडत होता, असे सांगितले जाते. ते व्यवसायाने दंतवैद्य होते. दंतवैद्य असल्याने पांढऱ्या रंगाशी त्यांचा जास्त संबंध होता. त्यामुळे शहरातील जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी केवळ आपल्याला पांढऱ्या रंगाची छटा पाहायला मिळते. संपूर्ण शहरात पांढऱ्या रंगाची झटा असल्याने सूर्यकिरणे परावर्तित होतात. त्यामुळे हवामाना ढगाळ जरी असले तरी येथील नागरिकांना सनग्लासेसचा वापर करणे भाग आहे. (Top Trending News)

२००० नंतर या शहराचे मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे काम करण्यात आले. या काळात ५५० पेक्षा जास्त मार्बलच्या इमारती उभारण्यात आल्या. संपूर्ण शहर पांढऱ्या मार्बलने झाकलेले असल्यामुळे रस्ते असोत किंवा उंच इमारती, सर्वजण सूर्यकिरणे परावर्तित करतात. त्यामुळे हवामान ढगाळ असले तरी डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून लोकांना नेहमी सनग्लासेसचा वापर करावा लागतो. (Top Stories)

========

Valentine Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? ज्यांच्या स्मरणार्थ साजरा होतो हा प्रेमदिन

========

अश्गाबात या शहरात तटस्थता स्मारक, स्वतंत्रता स्मारक आणि अनेक भव्य सरकारी इमारती आहेत. हे शहर अत्यंत स्वच्छ असून, येथील रस्ते आणि इमारती एखाद्या चित्रपटाच्या सेटसारख्या वाटतात. शहराचा नवीन भाग भव्य इमारतींनी भरलेला असला तरी, तिथे खूप कमी लोक राहतात, त्यामुळे याला अनेकदा ‘भूत शहर’ किंवा जगातील सर्वात खाली शहर म्हटले जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!