Home लाईफ स्टाईल iphone : आयफोनच्या कॅमेराजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या डॉटचा अर्थ काय?
लाईफ स्टाईल

iphone : आयफोनच्या कॅमेराजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या डॉटचा अर्थ काय?

1

आजकाल मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांच्याच हातात आपल्याला मोबाइल दिसतो. या स्मार्ट फोनच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्मार्ट होताना दिसत आहे. मोबाइलने आपले संपूर्ण जीवनच एका टचने बदलून टाकले आहे. आता मोबाइल म्हटले की लगेच डोक्यात येतो आयफोन. मोबाइल आणि आयफोन या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. आजकाल सर्वच लोकं ॲपलचे आयफोन वापरताना दिसतात. या आयफोनची क्रेझ इतकी जबरदस्त आहे की, कंपनी जर नवीन फोन लाँच करणार असेल तर तो घेण्यासाठी दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा असतात. (iphone)

आयफोन हे एवढे लोकप्रिय असण्याचे अनेक कारणं आहेत. यातलेच एक महत्त्वाचे आणि मोठे कारण म्हणजे, आयफोनच्या मोबाइलची कॅमेरा क्वालिटी. आयफोनचे कॅमेरे त्यांच्या उत्कृष्ट दर्जा, अचूक रंग आणि उत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी ओळखले जातात. आयफोनच्या नवीन मॉडेल्समध्ये तर ४८ मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आहे, जो फोटोमध्ये अधिक स्पष्टता देतो. शिवाय आयफोनचे फोटो अधिक वास्तववादी आणि नैसर्गिक रंगांचे असतात, जे सोशल मीडियासाठी योग्य असतात. (Marathi)

त्यामुळेच हे फोन जास्त लोकप्रिय आहेत. पण तुम्ही कधी iPhone चा ‘Pro’ मॉडेल मोबाइल नीट पाहिला आहे का? या फोनमध्ये मागच्या बाजूला कॅमेऱ्याजवळ एक काळ्या रंगाचा डॉट आहे. बहुतकरून लोकांना या डॉटबद्दल माहिती नसेल आणि त्यांनी कधी याबद्दल जाणून देखील घेतले नसेल. आज आम्ही तुम्हाला याच डॉटबद्दल माहिती देणार आहोत. (Todays Marathi News)

iphone

कॅमेराच्या लेन्सच्या शेजारी एक छोटासा काळा ठिपका असतो. अनेकांना वाटते की हा डिझाइनचा भाग असेल मात्र असे नाहीये. हा साधा दिसणारा काळा ठिपका प्रत्यक्षात आयफोनमधील सर्वात प्रगत तंत्रज्ञानापैकी एक आहे. आयफोनच्या प्रो आयफोन 17 प्रो, 16 प्रो आदी मॉडेल्समध्ये फ्लॅशलाइटच्या खाली असलेला काळा ठिपका म्हणजे LiDAR (Light Detection and Ranging) सेन्सर आहे. हे तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की याचा वापर नासा आणि सेल्फ ड्रायविंग कार्समध्ये देखील केला जातो. ॲपलने २०२० मध्ये आयफोन 12 प्रो पासून याची सुरुवात केली आणि आता तो प्रो मॉडेल्सचा अविभाज्य भाग बनला आहे. (Latest Marathi Headline)

हा छोटासा सेन्सर तुमच्या फोनमध्ये बॅकग्राउंडला अनेक महत्त्वाची कामे करत असतो. तुम्ही याला मॅन्युअली ऑन किंवा ऑफ करता येत नाही. अंधारातही जबरदस्त फोटोग्राफी: कमी प्रकाशात फोटो काढताना कॅमेऱ्याला फोकस करणे कठीण जाते. अशा वेळी LiDAR सेन्सर प्रकाश लहरी फेकून वस्तूचे अंतर मोजतो आणि कॅमेऱ्याला सेकंदाच्या काही भागात अचूक फोकस मिळवून देतो. यामुळेच आयफोनचे नाईट मोड पोर्ट्रेट फोटो इतके स्पष्ट येतात. (Top Stories)

========

Tourism : एकीकडे बर्फाच्छादित डोंगर, दुसरीकडे उकळत्या पाण्याची नदी; ‘हे’ आहे भारतातील अनोखे पर्यटन स्थळ

========

या सेन्सरमध्ये एक लाइट एमिटर आणि एक रिसीव्हर असतो. एमिटरकडून लाईट ऑब्जेक्टच्या दिशेला जाते आणि परत येऊन रिसिव्हरवर रिसिव्ह होते. यामुळे अल्गोरिथमला कॅमेरा आणि वस्तूमधील अंतर निश्चित करण्याची परवानगी मिळते. कमी प्रकाशाच्या परिस्थितीत फोटो काढताना आणि AR ऍप वापरताना हे अधिकतर उपयुक्त ठरते. सेन्सरवरील काळा डॉट हा एक प्रोटेक्टिव लेयर आहे जो दृश्यमान प्रकाश शोषून घेतो परंतु नियर-इंफ्रारेड लाइट यातून पास होते. हा सेन्सर आपल्या आसपास कोणती वस्तू आहे किंवा माणसे उभी आहेत का, याचा पत्ता लावू शकतो. दृष्टी नसलेल्या अंध लोकांसाठी हे एक महत्त्वाचे ‘एक्सेसिबिलिटी’ फीचर म्हणून काम करते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!