Home लाईफ स्टाईल Antarctica : जाणून घ्या अंटार्टिकाच्या बर्फातून वाहणाऱ्या रक्तासारख्या लाल रंगाच्या धबधब्यामागील रहस्य
लाईफ स्टाईल

Antarctica : जाणून घ्या अंटार्टिकाच्या बर्फातून वाहणाऱ्या रक्तासारख्या लाल रंगाच्या धबधब्यामागील रहस्य

1

पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जी पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. ही ठिकाणं पाहून आपला नक्कीच निसर्गावर असलेला विश्वास अधिकच दृढ होईल. आज आम्ही तुम्हाला या पृथ्वीवरील अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पडेल. पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणते असा कोणी प्रश्न विचारला तर आपले उत्तर असेल ‘अंटार्टिका’. पृथ्वीवरील सुमारे ९०% बर्फ येथे आढळतो. त्यामुळे हे ठिकाण कायम बर्फाच्छादित असते. आता कायम बर्फ असल्याने इथे सर्वत्र पांढराशुभ्र बर्फ आणि बर्फच आपल्याला चहूकडे दिसतो. (Antarctica )

मात्र याच बर्फामध्ये अचानक लाल भडक पाण्याचा धबधबा आपल्या नजरेत पडला तर नक्कीच आश्चर्यात टाकेल आणि एवढ्या बर्फात हा लाल बुंद पाण्याचा धबधबा कसा? असा प्रश्न आपल्याला पडेल. पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या मधून वाहणारा हा रक्तासारखा लाल धबधबा थक्क करणारा आहे. मॅकमर्डो ड्राय व्हॅलीजमधील टेलर ग्लेशियरमधून खाली कोसळणारा एक झरा अगदी रक्तासारखा गडद लाल दिसतो. या विलक्षण दृश्यामुळेच या झऱ्याला ‘ब्लड फॉल्स’ (Blood Falls) असे नाव देण्यात आले आहे. हा झरा नेमका लाल का दिसतो, याचे गूढ अनेक वर्षे शास्त्रज्ञांसाठी कोडेच होते. पण आता संशोधकांना याचे उत्तर सापडले आहे. (Marathi)

अंटार्क्टिकातील टेलर ग्लेशियरवर एक अनोखा धबधबा आहे, ज्याच्या पाण्याचा रंग निळा किंवा हिरवा नसून लाल आहे. ११० वर्षांपूर्वी याचा शोध लागला असला, तरी याचं रहस्य आता उघड झाले आहे. अंटार्क्टिकाच्या बोनी सरोवरात हा टेलर नावाच्या हिमनदीचा धबधबा पडतो. असे म्हणतात की शंभर वर्षांपूर्वी या धबधब्याचा शोध लागला. या धबधब्याचा शोध १९११ मध्ये ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ ग्रिफीथ टेलर यांनी लावला होता. सुरुवातीला लाल रंगाच्या शेवाळामुळे या धबधब्याचे पाणी लाल असल्याचे संशोधकांना वाटले. पण सुमारे एक शतकानंतर सत्य उघड झाले. (Todays Marathi HEadline)

Antarctica

टेलर ग्लेशियरच्या अंदाजे ४०० मीटर खाली एक विशाल खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर १५ ते ४० लाख वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे. या सरोवरातील पाण्यात लोहाचे प्रमाण खूप जास्त आहे. जोपर्यंत हे पाणी बर्फाखाली असते, तोपर्यंत त्याचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क येत नाही. जेव्हा हे लोहयुक्त पाणी बर्फाच्या भेगांमधून बाहेर येते आणि वातावरणातील ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा त्याचे ‘ऑक्सिडायझेशन’ (Oxidation) होते. लोखंडाला गंज लागल्यावर जसा रंग येतो, तसाच गडद लाल रंग या पाण्याला प्राप्त होतो. (Top Marathi NEws)

११० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ थॉमस ग्रिफिथ टेलर यांनी याचा शोध लावला. १९११ मध्ये त्यांच्या टीमने अंटार्क्टिकातील एका दरीत, डोंगराच्या माथ्यावरच्या बर्फाळ तोंडातून लाल रंगाचे पाणी वाहत असल्याचे पाहिले. आज हे ग्लेशियर आणि सरोवर टेलर नावाने ओळखले जातात. या बर्फाच्छादित पांढऱ्या ठिकाणी या अशा पाण्याचा रंग लाल कसा झाला, याचे रहस्य अनेक दशके शास्त्रज्ञांना पडले होते. अनेक काळापासून यावर उत्तर शोधण्याचे काम देखील चालू होते. सुरुवातीला, अनेक संशोधकांचा असा विश्वास होता की लाल रंगाचं कारण लाल शेवाळ आहे, पण सुमारे १०० वर्षानंतर आता याचे खरे सत्य उघड झाले आहे. २००३ मध्ये अलास्का फेअरबँक्स विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका गटाने या लाल पाण्याचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi Headline)

========

Beer : बिअरच्या बॉटल नेहमी हिरव्या, तपकिरी रंगाच्याच का असतात?

========

टेलर ग्लेशियरच्या अंदाजे ४०० मीटर खाली एक विशाल खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर १५ ते ४० लाख वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे. या सरोवरातील पाण्यात लोहाचे प्रमाण खूप जास्त आहे. जोपर्यंत हे पाणी बर्फाखाली असते, तोपर्यंत त्याचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क येत नाही. जेव्हा हे लोहयुक्त पाणी बर्फाच्या भेगांमधून बाहेर येते आणि वातावरणातील ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा त्याचे ‘ऑक्सिडायझेशन’ होते. लोखंडाला गंज लागल्यावर जसा रंग येतो, तसाच गडद लाल रंग या पाण्याला प्राप्त होतो. (Top Stories)

अंटार्क्टिका हे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे. अंटार्क्टिकाचे तापमान नेहमी शून्याखाली असते, तरीही हे धबधब्याचे पाणी कधीही गोठत नाही. याचे कारण या पाण्याची क्षारता असल्याचे सांगितले जाते. हे पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा ३ ते ४ पट जास्त खारट आहे. प्रचंड क्षारतेमुळे या पाण्याचा गोठणबिंदू खूप कमी होतो. याच कारणामुळे हे पाणी वाहत राहते. अद्भुत नैसर्गिक चमत्कारामुळे ब्लड फॉल्स केवळ पर्यटनासाठी किंवा फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध नाही, तर वैज्ञानिकांसाठी संशोधनाचे केंद्र आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:
🏏 Live Cricket Score
⏳ लोड होत आहे...

Related Articles

लाईफ स्टाईल

Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘या’ देवतांनी घेतला होता पृथ्वीवर अवतार

येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस...

लाईफ स्टाईल

Badrinath : भगवान विष्णूचा वास असलेल्या बद्रीनाथ धामची ‘ही’ रहस्ये माहिती आहे का?

चार धाम यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि कठीण तीर्थयात्रांपैकी एक...

लाईफ स्टाईल

Parshuram Jayanti : विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांची आज जयंती

हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. आज संपूर्ण...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!