Home लाईफ स्टाईल Badrinath : भगवान विष्णूचा वास असलेल्या बद्रीनाथ धामची ‘ही’ रहस्ये माहिती आहे का?
लाईफ स्टाईल

Badrinath : भगवान विष्णूचा वास असलेल्या बद्रीनाथ धामची ‘ही’ रहस्ये माहिती आहे का?

0

चार धाम यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि कठीण तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. या यात्रेत उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात वसलेल्या यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. मोक्षप्राप्ती, पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी ही यात्रा केली जाते असे सांगितले जाते. मात्र ही यात्रा वर्षभर सुरु नसते. वर्षातल्या नोव्हेंबर ते एप्रिल या काळात येथे अतिजास्त स्वरूपात बर्फवृष्टी होत असल्याने या काळात ही यात्रा बंद असते. यंदा अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी अर्थात आजपासूनच या यात्रेचा श्रीगणेशा होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री या पहिल्या दोन धामांचे दरवाजे उघडले जातात, ज्यामुळे अधिकृतपणे चारधाम यात्रेला सुरुवात होते. त्यानंतर 22 एप्रिल 2026 रोजी 8:00 वाजता केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. आणि यानंतर सर्वात शेवटी म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले केले जातील. (Badrinath)

अक्षय्य तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवसाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. कारण या दिवशी केलेल्या खरेदीचा कधी क्षय होत नाही ती कायम अक्षय राहते. याच शुभ दिनाचे धार्मिकदृष्ट्या देखील मोठे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच भगवान विष्णूचे अवतार असलेल्या नर-नारायण यांनी पृथ्वीवर अवतार घेतला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आज नर-नारायण यांची पूजा करण्याची देखील प्रथा आहे. आता नर आणि नारायण यांचे मुख्य ठिकाण म्हणजे चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धाम. बद्रीनारायण किंवा बद्रीनाथ हे उत्तराखंडमधील अलकनंदा नदीच्या काठी वसलेले भगवान विष्णूंचे पवित्र धाम आहे. नर-नारायण हे विष्णूचेच दोन अवतार असून, त्यांनी बद्रीनाथ येथे तपश्चर्या केली होती. बद्रीनारायण मंदिर हे चार धामांपैकी एक असून, येथे नर-नारायणाची जोडी पूजली जाते, जे अर्जुना (नर) आणि कृष्णाचे (नारायण) रूप मानले जातात. आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपण याच बद्रीनाथ धमाचे वैशिष्ट्ये जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Badrinath

एकदा भगवान विष्णू ध्यान मुद्रेत तल्लीन होते. त्याचवेळी बर्फवृष्टी सुरू झाली. ते पूर्णपणे बर्फात झाकले गेले, हे पाहून देवी लक्ष्मी चिंतेत पडल्या. त्यांनी रक्षणासाठी बदरी वृक्षाचे रूप घेतले. यानंतर जेव्हा श्रीहरींचे तप पूर्ण झाले. तेव्हा त्यांनी आईला झाडाने झाकलेले पाहिले. ‘तू माझी रक्षा बद्री वृक्षाच्या रूपात केलीस, म्हणून आजपासून हे स्थान बद्रीनाथ या नावाने ओळखले जाईल.’ अशा प्रकारे भगवान विष्णूंचे नाव बद्रीनाथ पडले. या मंदिरात अनेक अद्वितीय रहस्ये आहेत. अशीच एक रहस्यमय गोष्ट म्हणजे येथे पूजेदरम्यान शंख वाजवण्यास मनाई आहे. शंख हा भगवान विष्णूंसाठी अतिशय प्रिय असताना देखील या मंदिरात शंखनाद होत नाही. बद्रीनाथ धामच्या आजूबाजूचा परिसर हा अलकनंदा नदीच्या काठावर वसलेला आहे. हा परिसर भगवान नारायणाच्या तपश्चर्येचे ठिकाण मानले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, बद्रीनाथ धामजवळ साप राहतात असे मानले जाते. शंखाचा आवाज सापांसाठी वेदनादायक मानला जातो. असे मानले जाते की शंख वाजवल्याने सापांना राग येऊ शकतो ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा त्या परिसरात अडथळे येऊ शकतात. या कारणास्तव येथे शंख वाजवण्यास मनाई आहे. (Top Trending News)

बद्रीनाथमध्ये शंख का वाजवला जात नाही यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. हिवाळ्यात बद्रीनाथमध्ये बर्फ पडतो. अशा परिस्थितीत जर शंख वाजवला तर त्याचा ध्वनी डोंगरावर आदळतो. यामुळे अनुनाद निर्माण होतो. या अनुनादामुळे बर्फात भेगा पडू शकतात. तसेच यामुळे हिमवादळांचा देखील धोका वाढू शकतो. या कारणास्तव तिथे शंख वाजवत नाही असे म्हणतात. बद्रीनाथमध्ये शंख न वाजवण्याची एक कथा शास्त्रांमध्ये आढळते. एकदा देवी लक्ष्मीजी बद्रीनाथच्या तुलसी भवनात ध्यान करत होत्या. त्यावेळी भगवान विष्णूने शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला. हिंदू धर्मात विजय झाल्यावर शंख वाजवला जातो परंतु विष्णूजींना लक्ष्मीजींच्या ध्यानात अडथळा आणायचा नव्हता म्हणून त्यांनी शंख वाजवला नाही. (Top Stories)

========

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेचा खास उपाय! देवघरात ठेवा ‘या’ 5 वस्तू

========

पौराणिक कथेनुसार, अगस्त्य ऋषी केदारनाथमध्ये राक्षसांचा वध करत होते. त्यावेळी अतापी आणि वातापी हे दोन राक्षस पळून गेले. अतापीने आपला जीव वाचवण्यासाठी मंदाकिनी नदीची मदत घेतली. तर वातापीने शंखाची मदत घेतली आणि तो शंखात जाऊन लपला. असे मानले जाते की जर कोणी त्या वेळी शंख वाजवला तर राक्षस बाहेर येऊन पळून जाईल. यामुळेच बद्रीनाथमध्ये शंख वाजवला जात नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की येथे हिवाळ्यात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यापूर्वी एक दिवा लावला जातो, जो ६ महिन्यांनंतरही तसाच जळतो राहतो. बद्रीनाथ धाम नर-नारायण पर्वताच्या मध्यभागी वसलेले आहे. असे म्हटले जाते की जेव्हा हे दोन पर्वत एकमेकांना मिळतील, तेव्हा बद्रीनाथचा मार्ग बंद होईल. भक्त दर्शन घेऊ शकणार नाहीत. त्यानंतर एका नवीन तीर्थाचा उद्गम होईल. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:
🏏 Live Cricket Score
⏳ लोड होत आहे...

Related Articles

लाईफ स्टाईल

Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘या’ देवतांनी घेतला होता पृथ्वीवर अवतार

येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस...

लाईफ स्टाईल

Parshuram Jayanti : विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांची आज जयंती

हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. आज संपूर्ण...

लाईफ स्टाईल

Akshay Tritiya : धनप्राप्तीसाठी या अक्षय तृतीयेला करा हे सोपे उपाय

येत्या रविवारी साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा अक्षय्य...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!