आजच्या आधुनिक काळात कोणतीही पार्टी किंवा कोणतेही सेलिब्रेशन हे बियर किंवा दारूशिवाय अपूर्ण ठरते. अनेकांना तर दारू पिण्यासाठी कोणत्याही खास कारणाची गरज नसते. सुट्टीचा दिवस हाच त्यांचा सेलिब्रेशनचा दिवस असतो. दारू पिणे ही आता खूपच सामान्य गोष्ट बनली आहे. दारू पिणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कितीही वाईट किंवा हानिकारक असले तरी दारू पिण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. घरात हॉटेलमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर दारू रिचवणारे लोकं आपल्याला पाहायला मिळतात. आता दारू चांगली की वाईट या वादात न पडता. आज आम्ही तुम्हाला दारूबद्दल एक वेगळीच आणि खास बाब सांगणार आहोत. (Beer)
दारू पिणारे लोकं असो किंवा न पिणारे कोणाच्याही ही गोष्ट आजवर लक्षात आली नसावी. आपण अनेकदा टीव्हीवर, घरात, हॉटेलमध्ये दारूच्या बाटल्या पाहिल्या आहेत. त्या सर्वच बाटल्या या एकसारख्या रंगाच्या असतात. बिअर कधीच पारदर्शक काचेच्या बॉटलमध्ये ठेवली जात नाही. या बाटल्यांचा रंग हा हिरवा किंवा ब्राउन अर्थात तपकीरीच का असतो? फक्त याच रंगाची दारूची बाटली का येते? किंवा बिअरच्या बाटलीचा रंग असा का असतो? असा आपण कधी विचार केलाय का? बिअरची बाटली हिरवी किंवा तपकिरी होण्यामागे एक खास कारण आहे. हिरव्या आणि तपकिरी रंगाचा संदर्भ हा बिअरची चव, तिची गुणवत्ता याच्याशी आहे. (Marathi)
सगळ्यात आधी बिअर ही इजिप्तमध्ये बनवण्यात आली होती. इथे सगळ्यात आधी तर बियरला ट्रान्सपरेंट बॉटेलमध्ये देण्यात येत होती. पण त्यानंतर अचानक बिअर खराब होऊ लागली. सुरुवातीच्या काळात बिअरच्या बाटलीला खास असा रंग नव्हता, ती ट्रांसपरंट होती. मात्र नंतर हळूहळू हे लक्षात येऊ लागले की सुर्याची किरणं जेव्हा थेट या बाटलीवर पडतात तेव्हा त्यामधील ऍसिड खराब होते. सुर्याच्या अल्ट्रा वायलेट रेजमुळे दारू पटकन रिजेक्ट होत होती. यामुळे ती प्यायल्याने आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ लागले आणि त्यामुळे लोकांनी बियर पिणं सोडून दिले. त्यानंतर दारू कशी टिकवावी याचा विचार होऊ लागला. (Todays Marathi HEadline)

जेव्हा बिअर कंपन्यांना त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. पण एकही उपाय प्रभावी ठरला नाही. अशा परिस्थितीत त्याने बाटल्यांवर तपकिरी रंगाचे कोट देऊ लागले. हा उपाय कामी आला. तपकिरी बाटल्यांमध्ये ठेवलेली बिअर खराब झाली नाही. म्हणजेच या रंगामुळे बाटलीत असलेल्या द्रवापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकला नाही. पण यानंतर लगेचच दुसरे महायुद्ध झाले, तेव्हा बिअर कंपन्यांसमोर आणखी एक समस्या आली. त्यावेळी तपकिरी बाटल्यांचा दुष्काळ पडला होता. या रंगाच्या बाटल्या मिळणे बंद झाले. अशा स्थितीत पुन्हा नव्या रंगाची बाटली बनवावी लागली. सूर्यप्रकाश तपकिरीशिवाय हिरवा रंग बिअरपर्यंत पोहोचू देत नव्हता. त्यामुळेच त्याची निवड करण्यात आली. तेव्हापासून, बिअरची बाटली फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगात उपलब्ध आहे. (Top Trending News)
========
Kanjeevaram : खरी कांजीवरम कशी ओळखायची?
========
हिरवा रंग प्रीमियम बियरच्या बाटलींसाठी वापरला जातो. अल्कोहोलचे प्रमाण कमी असलेल्या प्रीमियम बियरसाठी हिरव्या बाटल्या वापरतात. पण हिरव्या बाटल्या अतिनील किरणांना पूर्णपणे रोखू शकत नाहीत. तरीही प्रीमियम बियर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फॅशन म्हणून हिरव्या बाटल्या वापरल्या जातात. बियरची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणून असे रंग वापरले जातात. यापैकी सर्वात सुरक्षित बियर कॅन किंवा टिन बियर आहे. टिन किंवा कॅन बियरमध्ये सूर्याचे अतिनील किरण शिरत नाहीत. म्हणूनच ते अधिक सुरक्षित आहे. पण बियर पारदर्शक काचेच्या बाटलीत असेल तर त्याची शुद्धता मोजली जाते. आता बियरच्या बाटल्यांमध्ये अनेक बदल झाले आहेत. व्हाइट बियर (गहू) ची बाटलीचा रंग थोडा हलका असतो. तो सोनेरी किंवा पिवळसर रंगाचा असतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics