Home लाईफ स्टाईल Cash : सरकारी नियमानुसार तुम्ही घरात किती कॅश ठेवू शकता? 
लाईफ स्टाईल

Cash : सरकारी नियमानुसार तुम्ही घरात किती कॅश ठेवू शकता? 

1

आजच्या आधुनिक काळात सर्वच लहान मोठे व्यवहार कॅशलेस पद्धतीने आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनने केले जातात. नोटबंदी झाल्यानंतर कॅशलेस व्यवहार करण्याला सर्वांनीच अधिक प्राधान्य दिले. आजच्या घडीला कॅशलेस व्यवहार करण्यामध्ये भारत जगातील टॉपचा देश आहे. मात्र कॅशलेस सुविधेमुळे आजकाल कोणीच स्वतःला जवळ जास्त कॅश बाळगत नाही. अतिशयोक्ती वाटेल पण काहींकडे साधे दहा रुपये देखील नसतात. सर्वच व्यवहार डिजिटल पद्धतीने सर्रास केले जातात. यामुळे स्वतःजवळ कोणीच जास्त कॅश ठेवत नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की आपण आपल्याजवळ किंवा घरात किती कॅश ठेवावी याचे देखील काही नियम सरकारने तयार केले आहेत. आपण किती पैसा कमावला आणि तो घरात ठेवला तर त्याचे सरकारला उत्तर द्यावे लागते.  (Cash)

अर्थात आयकर विभागाने आपण आपल्या घरात किती रोख रक्कम ठेवायची यावर मर्यादा ठेवलेली नाही. कॅश कमी असो किंवा जास्त ती घरी ठेवणे आयकर विभागाच्या दृष्टीने बेकायदेशीर नाही. मात्र, त्या रोख रक्कमेचा किंवा उत्पन्नाचा वैध स्त्रोत आपल्याला सांगता आला पाहिजे. जर, तुम्ही आयकर विभागाला समाधानकारक उत्तर देऊ शकला आणि कॅशचा वैध स्रोत सांगू शकला तर यावर काहीच बंधन नाही. जर तुम्ही घरी ठेवलेले पैसे तुमच्या पगारातील आहेत किंवा व्यवसायातून कमावलेले असतील तर ते कायदेशीर व्यवहारांचा भाग असतील. वैध स्त्रोत सांगता आल्यास कितीही मोठी रक्कम घरात ठेवता येते. जेव्हा तुम्हाला घरातील रक्कमेचा, पैशांचा योग्य स्त्रोत सांगता येत नाही तेव्हा अडचण निर्माण होते.  (Marathi News)

Cash

आयकर अधिनियम कलम ६८ ते ६९ बीममध्ये रोख आणि संपत्तीशी संबंधित नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. सेक्शन ६८ नुसार तुमच्या पासबुक आणि कॅशबुकमध्ये काही रक्कम नोंदवलेली आहे, मात्र तुम्ही त्याचा स्त्रोत सांगू शकला नाही तर ती रक्कम अनक्लेम्ड इनकम मानली जाईल. सेक्शन ६९ नुसार जर तुमच्याकडे रोख रक्कम आहे किंवा गुंतवणूक असेल आणि तुम्ही त्याचा हिशोब देऊ शकत नसाल तर ते अनडिस्क्लोज्ड इनकम मानले जाईल. सेक्शन ६९B मध्ये सांगितले आहे की, जर तुमच्याकडे घोषित उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असेल आणि तुम्ही त्याचा सोर्स सांगू शकला नाही तर टॅक्स आणि दंड आकारला जाईल.  (Todays Marathi HEadline)

अशा अनक्लेम्ड इनकमवर तुम्हाला ७८% पर्यंत कर किंवा दंड भरावा लागू शकतो. म्हणून, तुम्हाला मिळालेल्या पैशाचा आणि एखाद्याला पाठवलेल्या पैशाचा पुरावा नेहमी ठेवा. योग्य बिल मिळवणे देखील खूप महत्वाचे आहे. एवढेच नाही तर जर आयकर विभागाला करचोरीचा सं शय असल्यास खटला चालवला जाऊ शकतो.  (Top Marathi News)

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा 

– सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सनुसार, तुम्ही एकावेळी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यातून काढल्यास तुम्हाला तुमचे पॅनकार्ड दाखवावे लागते. आयकर कायद्याच्या कलम 194N अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात २० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याला TDS भरावा लागेल. तथापि, हा नियम सलग तीन वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसलेल्यांसाठी आहे. (Latest Marathi Headline)

=========

Sports : खेळाडू मैदानावर च्युइंगगम का खातात?

=========

– ITR भरलेल्या लोकांना याबाबतीत काहीसा दिलासा मिळतो. असे लोक TDS न भरता बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँक खात्यातून आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांपर्यंत कॅश काढू शकतात. या परिस्थितीत बँकेतून वर्षभरात एक कोटींहून अधिक रक्कम काढल्यास २% टीडीएस भरावा लागेल. तथापि गेल्या तीन वर्षांपासून ITR भरला नसेल तर तुम्हाला २० लाख रुपयांच्या व्यवहारांवर २% आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर ५% टीडीएस भरावा लागेल. (Top Trending News)

– क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे एका वेळी एक लाख रुपयांच्या वर व्यवहारांचे तपास केले जाऊ शकतात. याशिवाय काहीही खरेदी करण्यासाठी तुम्ही दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश देऊ शकत नाही. तुम्हाला दोन लाखांच्या वर कॅशने व्यवहार करायचे असल्यास तुम्हाला पॅन आणि आधार देखील दाखवणे अनिवार्य असेल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!