Home लाईफ स्टाईल Ekadshi : षटतिला एकादशीच्या दिवशी ‘हे’ उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ
लाईफ स्टाईल

Ekadshi : षटतिला एकादशीच्या दिवशी ‘हे’ उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

1
Tulshi Vivah

पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट्तिला एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि तिळाचे दान केले जाते. असे मानले जाते की, हे व्रत केल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी ‘षटतिला एकादशी’ असणार आहे. एकादशी ही तिथी भगवान विष्णूला समर्पित असून, या दिवशी विष्णू पूजेला मोठे महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी विष्णूची तीळाने पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी तिळाचे ६ उपाय पूजेत वापरले जातात. म्हणूनच या व्रताला षट्तिला एकादशी म्हणतात. (Ekadshi)

षटतिला एकादशीला तीळ स्नान, तीळ उटणे, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ अन्न आणि तीळ दान अशा सहा क्रिया केल्या जातात. याच सहा क्रियांमुळेच या एकादशीला षटतिला एकादशी म्हटले जाते. या दिवशी तीळ पूजा, हवन, प्रसाद, स्नान, दान, अन्न आणि तर्पण मध्ये वापरले जातात. या दिवशी तीळ दान करण्याची परंपरा असल्याने याला षटतिला एकादशी म्हणतात. पुराणात असे ही सांगितले आहे की, या दिवशी जितके तीळ तुम्ही दान कराल, तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. (Marathi)

षटतिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी नियमित व्रत केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार, षटतिला एकादशीला मनापासून उपवास आणि व्रत केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यादिवशी जर तिळाचे आणि इतरही काही खास उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्या जीवनावर सकारात्मक फायदा होतो. मग षटतिला एकादशीला कोणते उपाय करावे चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

> काही काळे तीळ पाण्यामध्ये मिसळून त्याने स्नान करा. यामुळे शरीर शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

> आंघोळीपूर्वी तिळाची पेस्ट लावा. यामुळे आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहते, तसेच अशुभ ग्रहांना शांत करण्यास मदत होते.

> पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तीळ मिसळलेले पाणी अर्पण करा. यामुळे पूर्वजांच्या शापांपासून मुक्तता मिळते. (Marathi Trending News)

> भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान हवनकुंडात काळे तीळ अर्पण करा. यामुळे घरात शांती आणि आनंद येतो.

Ekadshi

> या दिवशी तीळ आणि तिळापासून बनवलेल्या मिठाईचे दान करणे हे एक महान दान मानले जाते. असे मानले जाते की जितके जास्त तिळाचे दान कराल तितके जास्त शुभ फळे मिळतात.

> षटतिला एकादशीला तिळाचे दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि मानसिक शांतता येते. तिळाचे दान केल्याने नवग्रहांची शांती देखील होते. त्याशिवाय, माता लक्ष्मीची कृपा कायम राहते (Top Marathi News)

> षटतिला एकादशीला उबदार कपड्यांचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. यामुळे जीवनात धन-धान्याची कमतरता राहत नाही.

> गुळाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहांशी आहे. जर तुमची प्रगती होत नसेल किंवा डोळ्यांशी संबंधित काही समस्या येत असतील तर षटतिला एकादशीला गुळाचे दान करायला हवे . गुळाचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

> शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी अन्न महत्त्वाचे आहे. म्हणून षटतिला एकादशीला अन्नदान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, तसेच तुमच्या जीवनात धन-धान्याची समृद्धी राहते असे म्हणतात. (Latest Marathi HEadline)

> षटतिला एकादशीच्या दिवशी पूजेनंतर तिळाचे दान करावे. या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितकी जास्त वर्षे तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते. तिळाचे दान केल्यानं दारिद्र्य, दु:ख आणि दुर्भाग्य दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

> षटतिला एकादशीला तीळ दान करण्यासोबतच काही रुपयेही दान करावेत. यासाठी तिळाच्या लाडूमध्ये काही नाणी टाकून दान करा. हे गुप्त दान तुमचे नशीब मजबूत करेल. प्रसिद्धी आणि यश मिळेल. (Top Trending HEadline)

> जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल, राहू किंवा केतू किंवा पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही षटतिला एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करा. यामुळे तुमचा त्रास दूर होईल.

> षट्तिला एकादशी व्रताच्या दिवशी स्नान केल्यानंतर, गंगाजलात तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. असे केल्याने सुदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. (Top Stories)

=======

Ekadshi : षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची अशा पद्धतीने करा

Ekadshi : जाणून घ्या नवीन वर्षातल्या पहिल्या षटतिला एकादशीची माहिती आणि मुहूर्त

=======

> कुंडलीत ग्रह दोष दूर करण्यासाठी षट्तिला एकादशी व्रताच्या दिवशी तर्पण आणि त्यासोबत दान करावे. यामुळे कुंडलीतील शनी, राहू-केतू आणि पितृदोष दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते.

> षट्तिला एकादशी व्रताच्या दिवशी तिळाचे दान करण्याबरोबरच गुप्तधनाचे दान करावे. यासाठी तीळमध्ये काही नाणी टाकून एखाद्या गरजू व्यक्तीला गुप्त दान करा. असे केल्याने नशिबाची साथ मिळेल. यासह जीवनात प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. (Social News)

(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!