Home लाईफ स्टाईल Navratri : जाणून घ्या शाकंभरी नवरात्राच्या पूजेचा विधी
लाईफ स्टाईल

Navratri : जाणून घ्या शाकंभरी नवरात्राच्या पूजेचा विधी

1

पौष महिन्यात येणाऱ्या शाकंभरी नवरात्राची लवकरच सुरुवात होत आहे. वर्षात येणाऱ्या चार नवरात्रींपैकी शाकंभरी नवरात्र एक असते. दरवर्षी पौष महिन्यात हे नवरात्र येते. यंदा हे नवरात्र येत्या रविवारी २८ डिसेंबर २०२५ पासून अर्थात पौष शुक्ल अष्टमी, ज्याला बाणदा अष्टमी म्हणतात या दिवसापासून सुरु होत आहे. हे नवरात्र 3 जानेवारी 2026 पौष पूर्णिमा, शाकंभरी जयंती किंवा शाकंभरी पूर्णिमा या दिवशी समाप्त होईल. या नवरात्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे नवरात्र इतर नवरात्रांपेक्षा वेगळे असते, कारण ते शुक्ल प्रतिपदेपासून नव्हे तर अष्टमीपासून सुरू होते. यावेळी शाकंभरी नवरात्र नऊ दिवस नसून आठ दिवस असणार आहे. (Navratri)

पौष महिन्यातील अष्टमीपासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीची सांगता पौर्णिमेला होते. ही पौर्णिमा अन्न आणि जलसंकटातून मुक्ती देणारी आणि अन्नपूर्णा देवीचे रूप मानली जाते. या दिवशी गरजू लोकांना धान्य, फळे आणि भाज्या दान केल्याने देवी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि अनेक ठिकाणी यात्रा व उत्सव आयोजित केले जातात. (Shakambhari Navratri)

देवी शाकंभरी ही देवी दुर्गेचाच एक अवतार आहे. शाकंभरी देवी ही पोषण, अन्न आणि नैसर्गिक संसाधनांची देवता आहेत, ज्यांना महादेवीचा अर्थात दुर्गा देवीचा अवतार मानले जाते. दुष्काळग्रस्त पृथ्वीवर अन्न पुरवण्यासाठी ही देवी शाक म्हणजेच भाज्यांच्या रूपात प्रकट झाली होती, म्हणूनच या देवीला ‘शाकंभरी’ म्हणतात. तसेच देवीला शताक्षी अर्थात शंभर डोळे असलेली आणि वनशंकरी म्हणूनही ओळखले जाते. देवी कायमच आपल्या भक्तांचे संकट दूर करते. (Todays Marathi Headline)

Navratri

‘शाक’ म्हणजे वनस्पती/भाजी आणि ‘अंभरी’ म्हणजे धारण करणारी, म्हणजेच शाकंभरी म्हणजे शाक धारण करणारी, अन्न पुरवणारी देवी. त्या आदिशक्ती आणि दुर्गा देवीचाच एक अवतार आहेत, ज्यांनी पृथ्वीला अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या दुर्गमासुराचा नाश केला. राजस्थान, उत्तर प्रदेश, आणि दक्षिण कर्नाटकातील बदामी येथे शाकंभरी देवीची मंदिरे आहेत, जिथे मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. (Top Stories)

शाकंभरी नवरात्र पूजाविधी
सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी किंवा गंगाजल मिसळून स्नान करावे. यादिवशी बाणशंकरी प्रतः स्मरण मंत्राचा जप करावा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करावी जसे आपण चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्रीत करतो त्या पद्धतीने करावे. शाकंभरी देवीच्या मूर्तीची स्थापना करावी किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून देवी दुर्गाची प्रतिमा ठेवावी. देवीला लाल रंगांचे वस्त्र अर्पण करून १६ श्रृंगार अर्पण करावा. या पूजेने घरात अन्न-समृद्धी, आरोग्य, सुख-शांती येते. शेतकरी चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात. अनेक ठिकाणी या नवरात्रामध्ये देखील अखंड तेलाचा तर काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो. मात्र काही घरांमध्ये तेल आणि तुपाचा अखंड दिवा लावतात. (Marathi News)

देवी शाकंभरीची मूर्ती किंवा फोटोला हंगामी भाज्या आणि फळांने सजवावे. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन करावे. देवीला नैवेद्य दाखवावा. कुटुंबासह देवीची पूजा आणि आरती करावी. सर्व भक्तांना सात्विक आहार प्रसाद म्हणून वितरित करावा. व्रत करणार्‍यांनी कथा नक्की करावी. शाकंभरी देवीच्या पूजेच्या वेळी ओम ही श्रीं क्ली भगवती शाकंभरी देव्यै नमः या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. दुर्गा सप्तशतीचे पठण करून आरती करावी. अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष हवन आणि पूजा केली जाते. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी व्रताची समाप्ती होते. या नवरात्रीच्या काळात गरीब आणि गरजूवंतांना माझी फळ आणि अन्नधान्यांचे दान करावे. यामुळे पैशाची कमतरता दूर होते. (Latest Marathi News)

या मंत्रांचा करा जप 
ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा
ॐ महानारायण्यै च विदमहे महादुर्गायै धीमहि तन्नो शाकम्भरी: प्रचोदयात्॥
ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य: सुतान्वित:। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:
शाकैः पालितविष्टपा शतदृशा शाकोल्लसद्विग्रहा । शङ्कर्यष्टफलप्रदा भगवती शाकम्भरी पातु माम् ॥ (Top Trending Headline)

========

Shakambhari Navratra : पौष महिन्यात सुरु होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचे महत्त्व

========

पौराणिक कथा
देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. पार्वतीने शिव मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त भाज्या आणि भाज्या खाल्ल्या होत्या. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले. एका कथेनुसार, जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही, पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला, तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला. तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. तेव्हा देवीने आपले शरीर भाज्या, फळे, फुले यांनी सुशोभित करून पृथ्वीवर प्रकट झाली आणि प्रजेला अन्न दिले, म्हणून तिचे नाव शाकंभरी पडले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे. भाज्यांनी परिपूर्ण असल्यामुळे ती ‘शाकंभरी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!