१३ डिसेंबर २००३ रोजी इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांना एका गुप्त बंकरमधून अमेरिकन सैन्याने पकडले. हे ऑपरेशन रेड डॉन झाल्यावर सद्दाम हुसेन यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा खटला चालवण्यात आला. ३० डिसेंबर २००६ रोजी माजी यांना फाशी देण्यात आली. सद्दाम हुसेन यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आणखी एका देशाचे राष्ट्राध्यक्ष याच वाटेनं जात आहेत. अमेरिकेसोबत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या कुटुंबावर नवीन निर्बंध लादले आहेत. (America VS Venezuela)

मादुरो यांच्या कुटुंबातील अनेकांच्या तेलाच्या जहाजांवर अमेरिकेनं कारवाई केली आहे. आता हा पाश अमेरिकने व्हेनेझुएलाच्या सरकारवर आवळत घेतला असून लवकरच निकोलस मादुरोंवरही थेट कारवाई होणार असल्याची अटकळ आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सद्दाम हुसेन यांच्याप्रमाणेच खटला चालवला जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला मधील तणाव आता चिंताजनक वाढला आहे. अमेरिकन प्रशासनानं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तेल कंपन्यांवर नवीन निर्बंध लादले आहेत. यामुळे अमेरिकेवर एकाधिकारशाहीचा आरोप लावण्यात आला आहे. असेच निर्बंध अमेरिकेनं इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या कुटुंबियांवरही लादले होते, त्यानंतरं सद्दाम यांना अटक करुन अमेरिकेने त्यांना फाशीची शिक्षा दिली. तशीच गत मादुरो यांची होणार आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. (International News)
निकोलस मादुरो यांच्या पत्नी आणि पुतण्यांच्या संबंधिक सहा शिपिंग कंपन्या आणि तेल टँकरवर हे निर्बंध घालण्यात आल्यानं खळबळ उडाली. निर्बंध टाकतांना या कंपन्यांनी मादुरो सरकाराला आर्थिक मदत केली, आणि त्याचा मादुरो यांनी गैरवापर केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. अमेरिका आता व्हेनेझुएलाचे कच्चे तल वाहून नेणारे टँकर जप्त करीत आहे. व्हाईट हाऊसने पुष्टी केली आहे की “स्किपर” नावाचा टँकर जप्त करण्यात आला असून तो आता अमेरिकेच्या बंदरात नेला जाईल आणि त्यावरील तेल जप्त केले जाईल. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवत असताना उचलेल्या या पावलामुळे मादुरो याच्या सत्तेचे शेवटचे दिवस असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (America VS Venezuela)
त्यातच मादुरो यांच्या भ्रष्ट्राचारी राजवटीला त्यांचे दोन्ही पुतणे मदत करत असल्याचाही आरोप अमेरिकेनं ठेवला आहे. शिवाय व्हेनेझुएलाच्या तेलाची वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या पनामाचे व्यापारी रॅमन कॅरेटेरोवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. मादुरोंचे दोन पुतणे, फ्रँकी फ्लोरेस आणि एफ्रेन कॅम्पो यांना यापूर्वी ड्रग्ज तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती. २०१५ मध्ये, हैतीमध्ये ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली या दोघांनाही अटक करण्यात येऊन १८ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र मादुरो यांनी त्यांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. अखेर २०२२ मध्ये व्हेनेझुएला आणि अमेरिकेतील कैद्यांच्या देवाणघेवाणीत मादुरो यांच्या या दोन पुतण्यांची सुटका करण्यात आली. अर्थात या शिक्षेनंतरही फ्रॅंकी आणि एफ्रेन हे सुधारले नसल्याचे अमेरिकेचे मत आहेत. (International News)

मादुरो यांच्या भ्रष्ट्राचाराच्या योजना राबवण्यासाठी या दोन पुतण्यांचीची मदत अधिक होत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर निर्बंध लावण्यात आल्याचे स्पष्टीकरण अमेरिकन सरकारतर्फे देण्यात आले आहे. मात्र व्हेनेझुएलानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेल साठ्यांवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, त्यासाठीच ट्रम्प अनेक निर्बंध लावत असल्याचे मादुरो यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. यासोबत मादुरो यांनी आपल्याला अमेरिकेकडून धोका असल्याचेही सांगितले आहे. इराकच्या सद्दम हुसेन यांचा पाडाव कऱण्यासाठी अमेरिकेनं हिच निती वापरली होती. त्यामुळे मादुरो यांनी अमेरिका हल्ला करणार असल्याची शंका व्यक्त करुन आपल्या देशातील सैन्याला तयार रहाण्याच्या सूचना केल्या आहेत. (America VS Venezuela)
=======
हे देखील वाचा : Saudi Arabia : सौदीचे वाळवंट जलमय !
=======
इकडे अमेरिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून कॅरिबियनमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या जवळ आपली सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका यूएसएस जेराल्ड फोर्ड तैनात केली आहे. यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- BJP
- china
- congress
- cricket
- donald trump
- eknath shinde
- india
- International news
- Latest International News
- Latest Marathi Headline
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Marathi Headlines
- Top Stories
- Uddhav Thackery
- Venezuela
- राजकारण