Home आंतरराष्ट्रीय Ethiopia : ज्वालामुखीचा देश !
आंतरराष्ट्रीय

Ethiopia : ज्वालामुखीचा देश !

1

इथिओपिया या देशात आता सर्वत्र राख आणि भीतीचे वातावरण आहे.  पूर्व अफ्रिकेतील या देशाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  ज्वालामुखीच्या मुखावर असलेल्या या देशात आता हैली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला असला तरी या देशात असे अन्यही ज्वालामुखी आहेत.  शिवाय इथियोपिया हा देश आणखीही एका गोष्टीमुळे चर्चेत राहिला आहे.  कारण हा देश अद्यापही काळाच्या मागे आहे,  या देशात अद्यापही २०१८ हे वर्ष चालू आहे.  जगभरात जे कॅलेंडर वापरले जाते, त्याला ग्रेगोरियन कॅलेंडरचे म्हणतात.  मात्र हा अफ्रिकन देश या ग्रेगोरियन कॅलेंडरचे पालन करत नाही, तर त्यांच्या देशातल्या संस्कृतीवर आधीरित कॅलेंडर त्यांनी तयार केले आहे.  याच कॅलेंडरचे तिथे पालन केले जाते.  मजेशीर गोष्ट म्हणजे, जगभरात वर्षाचे १२ महिने असले तरी, इथिओपियामध्ये एका वर्षात १३ महिने आहेत.  असा हा देश आता हैली गुब्बी ज्वालामुखीच्या लाव्हा आणि राख यामुळे व्यापून गेला आहे. (Ethiopia)

इथिओपियामध्ये हैली गुब्बी या १० हजार वर्ष शांत असलेल्या ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला, आणि सर्व जगभरात खळबळ उडाली.  इथिओपियाच्या दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या हैली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक उद्रेक हा जगासाठी एक मोठा इशारा ठरला आहे. सुमारे १०,००० ते १२,००० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या या ज्वालामुखीची राख हजारो किलोमीटर अंतरावर, अगदी भारतापर्यंत पोहोचली असून आता हे राखेचे ढग चीनच्या दिशेने वाहू लागले आहेत. (International News)

यावरुन या इथियोपियामध्ये सध्या काय परिस्थिती असेल, याचा अंदाज येऊ शकतो.  या घटनेवरून जमिनीखाली गाडलेले अनेक ज्वालामुखी सुप्त दिसू शकतात, परंतु त्यांचा अचानक उद्रेक जगाचे हवामान, भूगोल आणि लोकांचे जीवन बदलू शकतो, हे स्पष्ट झाले आहे.  इथिओपियामध्ये असे काही अन्यही ज्वालामुखी असून आता हैली गुब्बीच्या उद्रेकानंतर या देशाचे भवितव्य अंधारात गेले आहे.  कारण पुढचे किती दिवस हैली गुब्बीचा उद्रेक सुरु रहाणार याबद्दल कुणालाही माहिती नाही.  या ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात लाव्हा बाहेर पडत असून त्याच्या राखेमध्ये काचेचे सुक्ष्म कणही असल्याची माहिती पुढे आली आहे.  त्यामुळेच हा उद्रेक शांत झाल्यावर या देशात जगभरातील भूकंपशास्त्रज्ञ भेट देण्याच्या तयारीत आहेत. (Ethiopia)

इथिओपिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे, जो सोमालिया आणि सुदानजवळ आहे. इथिओपिया हा देश त्याची संस्कृती, आणि वांशिक विविधतेमुळे यामुळेही चर्चेत असतो. मुख्य म्हणजे, इथिओपिया हा जगातील एकमेव देश आहे जो अजूनही येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ७-८ वर्षांपूर्वीच्या कॅलेंडरचे पालन करतो.  या देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरचे पालन करण्यात येत नाही.  इथिओपियाचे स्वतःचे कॅलेंडर आहे. या कॅलेंडरमध्ये सध्या २०१८ हे वर्ष चालू आहे. इथिओपियामध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅलेंडरला इथिओपियन किंवा गियाझ कॅलेंडर म्हणतात. या कॅलेंडरमध्ये १३ महिने असून प्रत्येक महिन्यात ३० दिवस असतात.  पहिल्या १२ महिन्यांत ३६० दिवस असतात.  उर्वरित ५ दिवस एका वेगळ्या महिन्यात असतात.  या महिन्याला पॅगुमेन म्हणतात. इथियोपियाच्या लीप वर्षात, १३ व्या महिन्यात ६ दिवस असतात.

या वेगळ्या कॅलेंडरप्रमाणेच इथिओपियामध्ये अनेक वांशिक गट आहेत.  येथे ८० हून अधिक वांशिक गट आहेत.  या  प्रत्येकाची स्वतःची भाषा आहे. अशा २०० हून अधिक भाषा या देशात बोलल्या जातात.  ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ख्रिश्चन आहे.  असे असले तरी इथियोपियाने कधीही युरोपियन वसाहती स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे इथियोपियाने त्यांच्या संस्कृतीवर, गीझ लिपीवर, संगीतावर आणि राहणीमानावरही पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव कमी आहे.  (Ethiopia)

========

Alaska : या देशात सूर्यदर्शन आता ६५ दिवसांनी होणार… !

========

याशिवाय इथिओपिया त्याच्यामधील अन्य ज्वालामुखींसाठी आणि तिथल्या विषम हवामानासाठी ओळखला जातो.  ब्लू नाईल नदी ही या देशातील एक महत्त्वपूर्ण नदी आहे.  येथील ताना सरोवरातून या नदीचा उगम होतो.  इथिओपियामधील हवामान विषम असले, तरी या हवामानाचे सौंदर्य वेगळे आहे.  पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि सर्वात अद्वितीय ठिकाणांपैकी एक म्हणून इथिओपियाला ओळखले जाते.  यात अनेक रंगीबेरंगी खनिज झरे आणि लाव्हा तलाव आहेत,  हा अद्भूत नजारा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या देशाला भेट देतात.  आता हाच देश ज्वालामुखीच्या राखेने व्यापून गेला आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!