Home लाईफ स्टाईल Hindu Village : मुस्लिम राष्ट्रात असूनही ‘हे’ आहे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव
लाईफ स्टाईल

Hindu Village : मुस्लिम राष्ट्रात असूनही ‘हे’ आहे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव

1

भारताचे जगभरात नाव खूपच आदराने घेतले जाते. जगभरात लोकं भारताबद्दल प्रेम व्यक्त करत भरभरून बोलतात. हिंदू राष्ट्र म्हणून कायमच भारताचे नाव अग्रणी आहे. असे असले तरी जशा नाण्याला दोन बाजू असतात, तसेच जसे भारताचे कौतुक होते तसेच भारताला अनेक गोष्टींसाठी नावं देखील ठेवले जातात. यातलेच एक बाब म्हणजे, भारतातील अस्वच्छता. या एका गोष्टीसाठी भारत जगभरात कुप्रसिद्ध आहे. अनेकदा माहेरच्या देशातील पर्यटक देखील भारतातील अस्वच्छतेचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. यासाठी कायमच भारतीयांची मान कायम खाली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका हिंदू गावाबद्दल सांगणार आहोत जे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. आणि मुख्य बाब म्हणजे ते गाव भारतातील नाहीये. (Marathi News)

गाव भारतातील नाही म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले असेल. कारण हिंदू गाव असून देखील भारतात नाही हे जरा ऐकायला विचित्र वाटते. मात्र हे खरे आहे. भारताच्या जवळ असलेल्या एका मुस्लिम राष्ट्रांमध्ये हे स्वच्छ असणारे हिंदू गाव आहे. या गावाचे नाव आहे, ‘पेंगलीपुरण’. जगातील सर्वात स्वच्छ असणारे ‘पेंगलीपुरण’ हे हिंदू गाव इंडोनेशियामध्ये आहे. इंडोनेशिया हा देश मुस्लिम असूनही, या देशामध्ये जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव असणे आपल्या लोकांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. इंडोनेशियातील बाली बेटावर पेंगलीपुरण गाव वसलेले आहे. या गावाची जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव म्हणून ख्याती आहे. हे गाव जगातील तीन सर्वात स्वच्छ गावांपैकी एक आहे. पेंगलीपुरण गाव बालीच्या बांगली जिल्ह्यात आहे. डोंगरांमध्ये वसलेले हे गाव त्याच्या स्वच्छ रस्त्यांसाठी, सुंदर बागा, हिरवळीसाठी तसेच त्याच्या पारंपारिक घरांसाठी प्रसिद्ध आहे. (Top Marathi News)

Hindu Village

पेंगलीपुरण गावाचे सौंदर्य आणि स्वच्छता हीच या गावाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या गावात कुठेही कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. येथे फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच कचरा टाकला जातो. शिवाय धूम्रपान करण्यासाठी देखील एक खास तयार केली आहे, तिथेच फक्त धूम्रपान करण्याची परवानगी आहे. तुम्ही इतरत्र कुठेही कचरा टाकू शकत नाही आणि धम्रपान करू शकत नाही. एवढेच नाही ते या गावामध्ये मद्यपान करण्यास देखील सक्त मनाई आहे. (Latest Marathi News)

पेंगलीपुरण गावातील जवळजवळ सर्व घरे पारंपरिक बांबू वापरून बांधली जातात. या गावातील महिला गावाच्या स्वच्छतेत देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. दर महिन्याला महिला गावातील सर्व कचरा गोळा करतात. त्यानंतर सेंद्रिय कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित केला जातो, तर प्लास्टिक आणि इतर जैवविघटनशील कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो. इंडोनेशियामध्ये असूनही पेंगलीपुराण हे गाव १००% हिंदू लोकांनी व्यापलेले आहे. शिवाय, या गावात अनेक जुनी आकर्षक मंदिरं देखील आहे. प्रत्येक घरात एक वेगळे कुटुंब आणि वेगळे मंदिर देखील आहे. हे गाव अंदाजे ७०० वर्षे जुने आहे. ते जुने असूनही, तिथे अद्यापपर्यंत एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. या गावातील घरे देखील एका परिपूर्ण रांगेत बांधलेली आहेत. या गावात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना देखील परवानगी नाही. (Social News)

========

Trip : यंदाच्या हिवाळ्यात ‘या’ हिल्स स्टेशनला भेट देऊन लुटा थंडीचा पुरेपूर आनंद

========

जर तुम्हाला देखील बालीला गेल्यानंतर या गावाला भेट द्यायची इच्छा असेल तर पेंगलीपुरण गाव बालीच्या बांगली जिल्ह्यात आहे, जे देनपासारपासून अंदाजे ४५ किलोमीटर आणि बांगली शहरापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खाजगी कार. मात्र यासोबतच पर्याय म्हणून, तुम्ही ग्रॅब आणि गौजेक सारख्या राइड-शेअरिंग अॅप्सचा वापर करू शकता. हे गाव वर्षभर पर्यटकांसाठी सकाळी ८.१५ ते संध्याकाळी ६.३० पर्यंत खुले असते. या गावाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ एप्रिल ते ऑक्टोबर आहे. गावात वेगवेगळ्या दरांसह होमस्टे देखील उपलब्ध आहेत. होमस्टेमध्ये घरी बनवलेले जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. (Top Stories)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!