Home आरोग्य Hair Care : हिवाळ्यामधील केस गळती थांबवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
आरोग्य

Hair Care : हिवाळ्यामधील केस गळती थांबवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

1
Hair Care
Hair Care

हिवाळ्यामध्ये केस गाळण्याची समस्या तशी खूपच सामान्य आहे. कारण या ऋतूमध्ये हवा एकदम कोरडी असते. त्यामुळे आपली त्वचा आणि केस कोरडे होतात. यासाठीच आपण हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेत असतो तिला वेळोवेळी मॉइश्चरायज करत असतो. पण त्यासोबतच हिवाळ्यात आपण आपल्या केसांची काळजी घेणे देखील खूपच आवश्यक आहे. कारण हिवाळ्यामध्ये आपले केस ड्राय आणि निस्तेज दिसायला लागतात. कोंडा पण भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे केस गळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. (Hair Care)

बाहेरील कोरड्या हवेमुळे टाळूची आर्द्रताही सुकते, त्यामुळे केस पातळ होऊ लागतात आणि कोरड्या टाळूला कोंडा होतो केस गळण्याचे हे एक प्रमुख कारण असू शकते. हवामानातील बदलांमुळे केस गळणे, स्प्लिट एंड्स आणि स्कॅल्प इन्फेक्शन सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. याशिवाय प्रदूषणामुळे केसांचेही नुकसान होते. यासाठी सतत पार्लरमध्ये न जात काही घरगुती सोपे उपाय करणे नक्कीच लाभदायक असते. हिवाळ्यातील केस गळती थांबवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील चला जाणून घेऊया. (Winter Care)

तेल मालिश
हवामान बदलाचा पहिला परिणाम टाळूवर दिसतो, त्यामुळे केस कमकुवत होऊ शकतात. आपले केस मजबूत ठेवण्यासाठी, आपण आपल्या टाळूची काळजी घेणे आणि तेल मालिश करणे गरजेचे आहे. खोबरेल तेल, बदाम तेल आणि ऑलिव्ह तेल केसांना लावल्याने टाळूचे पोषण होते आणि केसांची मुळे मजबूत होतात. हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा शॅम्पू करण्यापूर्वी १ तास आधी कोमट तेलाने मालिश करा, ज्यामुळे टाळू आणि केसांना योग्य पोषण मिळेल. (Marathi News)

घरगुती हेअर मास्क
कढीपत्ता आणि दह्याचा हेअर मास्क केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. हा हेयर मास्क बनवण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करुन घ्या. त्यात २ चमचे दही घाला. ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांपासून संपूर्णस केसावर लावा आणि २० मिनिटे राहू द्या. यानंतर केस कोमट पाण्याने किंवा सौम्य शाम्पूने धुवा. हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा वापरु शकता. यामुळे कोंड्याची समस्या पूर्णपणे दूर होईल. (Social Updates)

Hair Care

कांद्याचा रस
कांद्याचा रस केस गळती नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यात सल्फर असते, जे केस मजबूत आणि जाड बनवण्यास मदत करते. तसेच, त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. जे टाळूवर जमा झालेले हानिकारक बॅक्टेरिया आणि कोंडा काढून टाकण्यास मदत करतात. कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती कमी होते आणि केसांची वाढ होण्यास देखील मदत होते. यासाठी कांदा बारीक करा. नंतर तो कापडात पिळून त्याचा रस काढा. आता कापसाच्या मदतीने कांद्याचा रस टाळूवर लावा. तो किमान अर्धा तास लावा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा ते वापरू शकता. (Todays Marathi Headline)

मेथी दाणे
जर तुमचे केस पावसाळ्यात खूप गळत असतील तर तुम्ही मेथीदाणे वापरू शकता. त्यात प्रथिने, लोह, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे अनेक पोषक घटक असतात, जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. मेथीमध्ये निकोटिनिक अॅसिड देखील आढळते, जे केस मजबूत आणि जाड बनवण्यास मदत करते. यासाठी, अर्धा कप मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी ते मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. आता ते तुमच्या टाळू आणि केसांना लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून किमान एकदा तरी ते वापरा. (Marathi Trending HEadline)

आवळा, मेथी आणि कढीपत्ता हेअर मास्क
आवळा, मेथी आणि कढीपत्ता हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यानंतर आवळा पावडर, मेथीची पावडर आणि कांद्याचा रस घाला. हे सर्व मिसळून पेस्ट बनवून ती केसांवर 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. लक्षात ठेवा की केस धुताना कोणत्याही प्रकारचे शॅम्पू वापरू नका. हा एअर पॅक आठवड्यातून दोनदा वापरल्यानंतरच तुम्हांला फरक दिसू लागेल. (Top Marathi News)

भरपूर पाणी प्या 
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे. चांगल्या हायड्रेशनसोबतच चांगला आहार देखील आवश्यक आहे. प्रथिने, लोह, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई केसांसाठी आवश्यक आहेत. अंडी, मसूर, बदाम आणि हिरव्या भाज्या खा. (Latest Marathi Headline)

नारळ
केसांना पोषण देण्यात नारळ खूप उपयोगी आहे. नारळाचे तेल कोमट करून केसांच्या मुळात मसाज केल्याने पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात. तेल कमीत कमी एक तास तरी केसांमध्ये लावून ठेवावे. याव्यतिरिक्त नाराळाचे दूध केसांमध्ये लावून मसाज करून एक तासानंतर केस धुतल्याने फायदा होतो. (Top Stories)

========

Winter : हिवाळ्यात झपाट्याने वाढणारे वजन कंट्रोल करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Joint Pains: हिवाळ्यात वाढते सांधेदुखीचे त्रास जाणून घ्या कारणं आणि घरच्या घरी मिळवा आराम

========

जास्वंद
जास्वंदाचे लाल फूल केसांसाठी वरदान आहे. हे पिसून नारळाच्या तेलात मिसळून केसांना १ तास तरी लावून ठेवावे. नंतर केस धुऊन याका. याने डैंड्रफपासून मुक्ती मिळते आणि केस चमकदार होतात. (Top trending News)

अंडी
अंडी प्रोटीनने भरपूर असतात, याव्यतिरिक्त यात झिंक, मिनरल आणि सल्फर असते. हे सर्व पोषक तत्व मिळून केसांना मजबूती प्रदान करतात आणि केस गळतीवर फायदा करतात. अंडीचा पांढरा भाग जैतूनच्या तेलात मिसळून डोक्याची मसाज करावी. अर्ध्या तासाने केस धुउन टाकावे. (Social News)

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!