Home सामाजिक श्रावणी सोमवती अमावस्या माहिती
सामाजिक

श्रावणी सोमवती अमावस्या माहिती

15
Somvati Amavasya

प्रत्येक महिन्यात ‘अमावस्या’ तिथी येते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला जरी महत्व असले तरी ती शुभ तिथी मानली जात नाही. वर्षभरात एकूण १२ अमावस्या असतात. या दिवशी कोणतेही शुभ काम केले जात नाही. मात्र असे असूनही काही अमावस्या या अपवाद आहे. अमावस्या असूनही शुभ मानल्या जातात किंवा त्यांना खास महत्व असते. यातलीच एक अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या. सोमवारी येणारी अमावस्या म्हणून तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. यंदा सोमवती अमावस्या श्रावण महिन्यात येत आहे.

यावर्षी तर सोमवती अमावास्येला जरा जास्तच महत्व आले आहे. कारण याच दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा सोमवार आला आहे. या दिवसाला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जात आहे. शास्त्रात सोमवती अमावस्येला खास महत्व दिले गेले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी दान आणि तर्पण करण्याची प्रथा असून, असे केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते.

Somvati Amavasya

2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी अमावस्या सुरू होईल आणि 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल. उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार सोमवारी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममूर्त हा सकाळी 4 वाजून 38 मिनिट ते 5 वाजून 24 मिनिटापर्यंत आहे. पूजन मुहूर्त सकाळी 6 वाजून 9मिनिट ते 7 वाजून 44 मिनिटापर्यंत असणार आहे.

सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर सूर्योदयाआधी उठावे आणि नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. या दिवशी आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करावा. अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो. अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे शंकराचे पूजन करत सातूची शिवमूठ वाहावी.

सोमवती अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्याने शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे. यंदा सोमवती अमावस्येच्या दिवशी नवीन वस्त्रे, हिरवे मूग, पन्ना, पितळेचे भांडे, कापूर आणि पुस्तकं दान करणं लाभदायक मानले जाते. केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी लसूण, तीळ, घोंगडी, कस्तुरी, उडीद इत्यादी वस्तूंचे दान करणे शुभ आहे. सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान आवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो. काळे तीळ मंदिरातही दान करू शकता. या दिवशी शिवाष्टकं स्तोत्रम् म्हणणे देखील लाभदायक असते.

प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजाम् ।
भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
गले रुण्डमालं तनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपालम् ।
जटाजूटभङ्गोत्तरङ्गैर्विशालं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
मुदामाकरं मण्डनं मण्डयन्तं महामण्डल भस्मभूषधरंतम् ।
अनादिह्यपारं महामोहहारं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
तटाधो निवासं महाट्टाट्टहासं महापापनाशं सदासुप्रकाशम् ।
गिरीशं गणेशं महेशं सुरेशं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
गिरिन्द्रात्मजासंग्रहीतार्धदेहं गिरौ संस्थितं सर्वदा सन्नगेहम् ।
परब्रह्मब्रह्मादिभिर्वन्ध्यमानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदाम्भोजनम्राय कामं ददानम् ।
बलीवर्दयानं सुराणां प्रधानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
शरच्चन्द्रगात्रं गुणानन्द पात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रम् ।

======

हे देखील वाचा :  पिठोरी अमावस्या व्रत, पूजा विधी आणि कथा

======

अपर्णाकलत्रं चरित्रं विचित्रं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
हरं सर्पहारं चिता भूविहारं भवं वेदसारं सदा निर्विकारम् ।
श्मशाने वदन्तं मनोजं दहन्तं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥
स्तवं यः प्रभाते नरः शूलपाणे पठेत् सर्वदा भर्गभावानुरक्तः ।
स पुत्रं धनं धान्यमित्रं कलत्रं विचित्रं समासाद्य मोक्षं प्रयाति ॥

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!