प्रत्येक धर्मामध्ये, देशामध्ये अंत्यसंस्काराची पद्धत वेगळी असते. भारतात हिंदू धर्मात मृतदेहावर अत्यंसंस्कार करतांना त्याला अग्निच्या हवाली करण्यात येते. तर मुस्लिम धर्मात जमिनीमध्ये या मृतदेहाला पुरण्यात येते. चीनमध्येही अत्यंसंस्काराची वेगळी पद्धत आहे. चीनमध्ये अंत्यसंस्कार करतांना मृतदेहावर पांढरे कपडे घालण्यात येतात. नंतर त्याच्याशेजारी धूप लावण्यात येतो. काहीवेळा संबंधित व्यक्तिला आवडणारे संगितही लावण्यात येते.
याचवेळी त्या व्यक्तीला आवडणा-या वस्तूंच्या कागदाच्या प्रतिमा जाळण्यात येतात. यातून व्यक्ती मृत्यूनंतर दुस-या जगात गेल्यावर या जाळलेल्या कागदाच्या वस्तू त्याला साथ देतात, अशी समजूत आहे. यातून दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यात येत असल्याचीही मान्यता आहे. मात्र चीनमधील ही वर्षानुवर्ष चालत आलेली अंत्यसंस्काराची परंपरा आता कमी होत चालली आहे. कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्याच अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत. चीनमधील अनेक कुटंबात अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे नातेवाईक वा मित्रमंडळी येतील, अशी परिस्थिती राहिलेली नाही. ( Chinese Funerals )

म्हणून काही व्यक्ती आपल्या मृत्यूनंतरच्या विधींची तरतूद आधीच करुन ठेवत आहेत. यासाठी चीनमध्ये अनेक कार्पोरेट कंपन्या चालू झाल्या आहेत. या कंपन्यांनी चीनमधील परंपरागत अंत्यंसस्कार विधीला आधुनिक रुप दिले आहे. मृत व्यक्तिबरोबर जिथे त्याच्या गरजेच्या वस्तूंच्या प्रतिकृती जाळण्यात येत होत्या, तिथे आता, प्राडा बॅग्ज, रोलेक्स घड्याळांच्या कागदाच्या प्रतिकृती जाळण्यात येत आहेत.
चीन या देशाबद्दल रोज काही नवीन माहिती समोर येत आहे. त्यातच आता चीनमध्ये अंत्यसंस्कार कसे होतात, याची माहिती चर्चेत आली आहे. चीनी संस्कृतीमध्ये अंत्यसंस्कार विधी हा मोठा असतो. मात्र अलिकडे एवढा वेळ कोणालाही नसल्यामुळे हा विधी कऱण्यासाठीही काही कंपन्या पुढे आल्या आहेत. या कंपन्यांमुळे अंत्यसंस्कार विधीला कॉर्पोरेट स्वरुप प्राप्त झाले आहे. या कंपन्यांनी आपल्याकडे येणारे काम वाढले पाहिजे, यासाठी अधिक आकर्षक ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. ( Chinese Funerals )
आता मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतांना काय आकर्षक ऑफर, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर त्या मृतदेहासोबत ज्या वस्तू जाळण्यात येतात, त्यांची यादी नक्कीच पहा. चीनमध्ये मृतदेहासोबत त्या व्यक्तीच्या नित्याच्या आणि गरजेच्या वस्तूंची कागदी प्रतिमा करुन जाळण्यात येते. मात्र आता कंपन्याच अंत्यसंस्कार करीत असल्यामुळे येथे या कागदी वस्तूही ब्रॅण्डेड स्वरुपात उपलब्ध झाल्या आहेत. कारण अलिकडच्या काही वर्षात चीनमधील अंत्यसंस्कार विधीमध्ये प्राडा बॅग्ज, रोलेक्स घड्याळे, मर्सिडीज-बेंझ कार यासह अनेक लक्झरी कागदी वस्तू जाळल्या जात आहेत. यातून चीनमधील अंत्यसंस्कार विधी किती बदलले आहेत, याची कल्पना येते.
याला कारण ठरल्या आहेत, चीनची राजधानी बीजिंगमधील अंत्यसंस्कार करुन देणा-या कंपन्या. चीनमध्ये गेल्या काही वर्षात अशा स्वरुपाच्या अनेक कंपन्या वाढल्या आहेत. या कंपन्या आपल्याकडे अधिक संख्येनं काम यावे, अर्थात अधिक मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम मिळावे, म्हणून आकर्षक ऑफर देत आहेत. त्यातूनच या कागदाच्या वस्तूही ब्रॅण्डच्या ख-या वस्तूंप्रमाणे बनवून घेतल्या जात आहेत. बीजिंगमधील ग्रेटरूम बरियल गारमेंट्स कंपनी सध्या पारंपारिक अंत्यसंस्कार विधींचे आधुनिकीकरण करत आहे. ( Chinese Funerals )
=======
हे देखील वाचा : Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !
=======
ही कंपनी मृतदेहासोबत गरजेच्या वस्तूंसह बॅग्ज, घड्याळे, कार, कपडे, चप्पला आदी वस्तूंही कागदाच्या करुन जाळत आहे. असे मानले जाते की, या प्रतीकात्मक वस्तू अंत्यसंस्कारादरम्यान जाळल्या जातात, जेणेकरून मृत व्यक्ती त्यांचा मृत्यूनंतरच्या जीवनात वापर करू शकेल. अशावेळी या वस्तू किती गरजेच्या आहेत, याचे मार्केटींगही कंपनीतर्फे करण्यात येत आहे. या कंपनीचे संस्थापक गाओ गुची यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार मृत्यूबद्दल विचार करणे किंवा त्याबद्दल बोलणे आजही चीनमध्ये अशुभ मानले जाते.
म्हणूनच, जेव्हा कुटुंबात मृत्यू होतो तेव्हा लोक मानसिकदृष्ट्या तयार नसतात आणि गोंधळ आणि भीतीतून निर्णय घेतात. अंत्यसंस्कार विधीकडे आदराने, समजूतदारपणे आणि तयारीने पाहिले पाहिजे. तेच काम ग्रेटरुम बरियल गारमेंटस कंपनी करत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण काय, चीनमध्ये आता अंत्यसंस्कार विधींना नवे स्वरुप आले आहे. ( Chinese Funerals )
सई बने
- afterlife beliefs
- ancestor worship
- Beijing funeral companies
- branded paper offerings
- changing Chinese culture.
- Chinese funeral rituals
- corporate funeral services
- family support decline
- funeral ceremonies China
- funeral industry modernization
- funeral music
- Gao Guchi
- Greateroom Burial Garments
- incense burning
- joss paper offerings
- luxury funeral offerings
- marketing funeral packages
- Mercedes paper car
- paper replicas burning
- Prada paper bag
- pre-planned funerals
- Rolex paper watch
- traditional funeral customs
- ward off evil spirits
- white mourning clothes