Home लाईफ स्टाईल Environment Day : हरित भविष्यासाठी जागरूक व्हा पर्यावरणाला वाचवा
लाईफ स्टाईल

Environment Day : हरित भविष्यासाठी जागरूक व्हा पर्यावरणाला वाचवा

11
Environment Day

सध्या आपण पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करत आहोत. नैसर्गिक आपत्ती, प्रदूषण आदी गंभीर समस्यांचे मूळ हे पर्यावरणाचा ढासळणार समतोल हेच आहे. पर्यावरण आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपले वैयक्तिक, सार्वजनिक आयुष्य या पर्यावरणाला खराब करत आहे. पर्यावरणाबद्दल आपण लवकर जागरूक होणे खूपच आवश्यक आहे. जर पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिला तर या पृथ्वीचा अंत निश्चित आहे. याच पर्यावरणाबद्दल लोकांना जागे करणे आणि त्याबद्दल त्यांना जागरूक करणे खूपच गरजेचे आहे. पर्यावरण आपल्यावर नाही तर आपण पर्यावरणावर अवलंबून आहोत. हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत पर्यावरणाचा मनुष्याकडून होणार ऱ्हास थांबणार नाही. (Environment Day)

याच पर्यावरणाचे माणसांच्या जीवनातील महत्व समजून सांगण्यासाठी दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने १९७२ पासून दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभरात पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्लास्टिकचा वापर, वाहतूक व्यवस्था आदी अनेक घटक गोष्टींमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. (Top Marathi News)

पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीचा परिणाम हवामानातं होणारे बदल, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण आदी गोष्टींवर होऊन या गंभीर समस्या उद्भवत आहेत. पर्यावरण दिनाच्या माध्यामातून या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधले जाते. जनतेच्या मनात पर्यावरणाबद्दल आणि पर्यावरणाप्रती आपल्या कर्तव्यांबद्दल जगजागृती केली जाते. (Top Stories)

Environment Day

दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक खास थीम ठेवली जाते. या टीमला अनुसरून त्यावर्षीचा पर्यावरण दिन साजरा केला जातो. यंदा २०२५ सालाची पर्यावरण दिनाची थीम आहे, ‘एंड प्लॅस्टिक पोल्युशन’ (End Plastic Pollution) अशी आहे. या वर्षी दक्षिण कोरिया हा यजमान देश आहे. प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. माणसांसोबत प्राणी आणि पक्ष्यांसाठीही प्लॅस्टिक खूपच घातक आहे. त्यामुळे ‘प्लॅस्टिक प्रदूषण संपवा’, अशी जागतिक पर्यावरण दिनाची यंदाची थीम आहे. (Todays Top Headline)

दरवर्षी कोट्यवधी टन प्लॅस्टिकचा वापर केला जातो. पण या प्लॅस्टिकचा पुनर्वापर होण्याचं प्रमाण कमी आहे. प्लॅस्टिक नष्ट करणं देखील खूप कठीण आहे. त्यामुळे प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण वेगाने वाढत आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक गोळा झाले आहे. त्यामुळे समुद्रातील जीवसृष्टी सुद्धा मोठ्या संकटात आहे. प्लॅस्टिकमुळे केवळ प्राणी नाही तर मनुष्य देखील धोक्यात आहे. म्हणूनच प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणणे खूपच आवश्यक आहे. यंदाच्या या थीमचा उद्देश प्लास्टिकच्या वापरात कपात करून पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे आणि प्लास्टिकच्या पुनर्वापरास प्रोत्साहन देणे आहे. (Social Updates)

दरवर्षी जगभरात ४३० दशलक्ष टनांहून अधिक प्लॅस्टिक उत्पादन होते. त्यापैकी दोन-तृतीयांश प्लास्टिक हे मायक्रोप्लास्टिक असते. ते लवकरच कचऱ्यात रूपांतरित होते आणि त्यामुळे जंगलांमध्ये, नद्यांमध्ये, महासागरांमध्ये प्रदूषण वाढते आणि प्लॅस्टिक मानवाच्या अन्न साखळीत प्रवेश करते. सहज वापरण्याजोगे आणि टिकाऊ असल्यामुळे प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु याचा नाश होत नसल्यामुळे पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. प्लॅस्टिक हे एक असे पदार्थ आहे जे सहज विघटित होत नाही. ते माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढवते. प्लॅस्टिकचा वापर सोपा आणि स्वस्त असला तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. एकदा वापरलेले प्लास्टिक शेकडो वर्षे विघटित होत नाही. (Marathi Latest News)

Environment Day

आजच्या घडीला अनेक स्वयंसेवी संस्था NGO, पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या संस्था लोकांना प्लॅस्टिक वापराबद्दल जागरूक करत आहे. प्लॅस्टिक वापरण्याचे दुष्परिणाम आणि संपूर्ण सजीव सृष्टीला होणारा त्रास याबद्दल लोकांना समजावून सांगत प्लॅस्टिकचा वापर न करण्यास प्रोत्साहित करत आहे. याचा परिणाम देखील हळूहळू दिसून येत असून अनेक लोकं प्लॅस्टिकचा वापर न करता नैसर्गिक गोष्टी वापरावर भर देताना दिसत आहे. मात्र ही लढाई इतक्या लवकर संपणारी नाही. आता तर खरी प्लॅस्टिक विरोधात या लढाईची सुरुवात झाली आहे. अजून आपल्या सर्वांना खूप मोठा आणि लांबचा पल्ला गाठायचा आहे. यासाठी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच प्लॅस्टिक न वापरण्याचा निर्धार करू आणि या पृथ्वीला प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. (Top Marathi Headline)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....