Home प्रेस रिलीझ महिला दिन विशेष ‘अनन्या’चे पोस्टर रिलीज, हृता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
प्रेस रिलीझ

महिला दिन विशेष ‘अनन्या’चे पोस्टर रिलीज, हृता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

5
‘अनन्या’ चित्रपट

‘अनन्या’ म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास ‘अनन्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’, अशी सकारात्मक टॅगलाईन असलेल्या ‘अनन्या’ या चित्रपटाचे पोस्टर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे  अनन्याचे पात्र साकारते. खूप काही सांगणाऱ्या या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे, जी आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

====

हे देखील वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते प्रेक्षकांच्या भेटीला

====

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. नावाला सार्थ असणारी ‘अनन्या’ १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे म्हणते, ”आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे निर्माता रवी जाधव म्हणतात, ”आज महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या निमित्ताने आम्ही सर्व महिलांचा सन्मान करत आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.”

====
हे देखील वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चा ट्रेलर प्रदर्शित तर चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

====

निर्माता संजय छाब्रिया म्हणतात, ”जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप मह्त्वाचा आहे. ‘अनन्या’मधून आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. अनन्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...