Home आरोग्य थंडीत हातपाय सूजतात का? करा हे घरगुती उपाय
आरोग्य

थंडीत हातपाय सूजतात का? करा हे घरगुती उपाय

9
Winter Health Care
Winter Health Care

हिवाळ्याचे दिवस आरामदायी वाटणारे असले तरीही या ऋतूत अनेक आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये हातापायांना सूज येणे याचा देखील समावेश आहे. खरंतर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये हिवाळ्याच्या दिवसात पुरेश्या प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. या कारणास्तव हातापायांना सूज येणे, दुखणे अशा समस्या उद्भवतात. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.आजच्या लेखात हातापायांना येणारी सूज घरगुती उपायांनी कशी कमी करू शकता याबद्दल जाणून घेणार आहोत.(Winter Health Care)

राईचे तेल
थंडीत हातापायांना येणारी सूज कमी करण्यासाठी तुम्ही कोमट तेलाने हातपायांना मसाज करू शकता.यासाठी एका वाटीत दोन मोठे चमचे कोमट राईचे तेल घ्या. कोमट राईच्या तेलाच्या मदतीने ज्या ठिकाणी सूज आली आहे तेथे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे सूजेची समस्या कमी होण्यास मदत होईल.

मीठाचे पाणी
शरीराला येणारी सूज कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर करू शकता. मीठाच्या पाण्यात पाय ठेवल्यास सूजेची समस्या कमी होऊ शकते. यासाठी एका बादलीत कोमट पाणी घ्या. त्यमध्ये एक ते दीड चमचा मीठ टाका. या मीठाच्या पाण्यात जवळजवळ 20 मिनिटे पाय बुडवून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.

Swollen Feet: Common Causes and Symptoms

काळीमिरी
काळीमिरी तुम्हाला हातापायांना येणाऱ्या समस्येपासून दूर ठेवू शकते. काळीमिरीत अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतो, जो सूज कमी करण्यास मदत करतो. यासाठी एक चमचा राईचे तेल घेऊन त्यात चिमूटभर काळीमिरीची पावडर टाका आणि पेस्ट तयार करा. राईचे तेल आणि काळीमिरीच्या पावडरची तयार करण्यात आलेली पेस्ट सूज आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे सूजेची समस्या कमी होईल. (Winter Health Care)

कोरफडीचा गर
हातापायांना येणारी सूज कमी करण्यासाठी कोरफडीचा गर वापरू शकता. कोरफडीच्या गरात अँटी-इंफ्लेमेंटरी, अँटी-व्हायरल असे गुणधर्म असतात, जे सूजेची समस्या कमी करतात. कोरफडीच्या गराचा वापर केल्यास काही दिवसातच हातापायांना येणारी सूज आणि दुखणे कमी झाल्याचे जाणवेल.

नारळाचे तेल
पायांना येणारी सूज कमी करण्यासाठी नारळाचे तेल वापरू शकता. यासाठी नारळाचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण तयार करा. सूज आलेल्या ठिकाणी नारळाचे तेल आणि कापूराचे मिश्रण लावल्यास आराम मिळेल.

(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘newsite.gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


हेही वाचा- थंडीत ‘या’ कारणास्तव होऊ शकते कोंड्याची समस्या

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...