Home मनोरंजन ऑस्कर सोहळ्यातील ‘त्या’ घटनेमुळे जर विल स्मिथचा घटस्फोट झाला तर त्याचा परिणाम काय असेल?
मनोरंजन

ऑस्कर सोहळ्यातील ‘त्या’ घटनेमुळे जर विल स्मिथचा घटस्फोट झाला तर त्याचा परिणाम काय असेल?

7
Will Smith And Jada Smith divorce
Will Smith And Jada Smith divorce

तब्बल दोन वर्षांनी संपूर्ण जगातील चित्रपटांसाठी अतिशय मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार यावर्षी मार्च महिन्यात संपन्न झाला. चित्रपटांसाठी पंढरी असणाऱ्या या पुरस्कारांचे संपूर्ण जगातील मनोरंजनविश्वात एक वेगळेच महत्व आहे. जगातील चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रतिभेला ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार खऱ्या अर्थाने महत्वाचा आणि मानाचा होता. कोरोनानंतर हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना सोहळ्यात असे काही घडले की, ज्यामुळे पुरस्कार कोणाला मिळाला यापेक्षा जास्त चर्चा त्या घटनेची झाली. (Will Smith And Jada Smith divorce)

मार्च २०२२ मध्ये झालेल्या ९४व्या ऑस्कर अकादमी पुरस्कार सोहळा ऐनरंगात आलेला असताना हॉलिवूडस्टार विल स्मिथने या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणाऱ्या कॉमेडियन क्रिस रॉकला कानाखाली लगावली होती. झाले असे की क्रिस रॉकने सूत्रसंचालन करत असताना विल स्मिथची पत्नी असणाऱ्या जेडा पिंकेटच्या डोक्यावर केस नसलेल्या लूकवर विनोद केला होता. त्यानंतर विल स्मिथ उठून थेट स्टेजवर गेला आणि क्रिस रॉकच्या श्रीमुखात मारली. (Will Smith And Jada Smith divorce)

एवढेच नाहीतर या घटनेनंतर विल स्मिथला ‘द अकादमी’ पुरस्कारांमधून बंदी देखील घालण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण जगात त्यावर तुफान चर्चा रंगली आणि अनेकांनी विल स्मिथला ट्रोल देखील केले. विल स्मिथने सोहळा संपल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिस रॉकची माफी देखील मागितली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण जगासोबतच विल स्मिथच्या घरीदेखील उमटले आहे. याच कारणामुळे जेडा आणि विल स्मिथ यांच्या नात्यात कटुता आल्याचे सांगितले जात आहे. (Will Smith And Jada Smith divorce)

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार, जेडा आणि विल स्मिथ यांच्यात होणारे संभाषण अगदी नाहीच्या बरोबर झाले आहे. मोठ्या मुश्किलीने त्या दोघांमध्ये संवाद होत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय सोशल मीडियावर देखील नेहमीच हे दोघं एकमेकांसोबत फोटो, व्हिडिओ शेअर करायचे ते देखील आता बंद झाले आहे. आता तर त्या दोघांच्या घटस्फोटाबद्दल देखील बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. जेव्हापासून ऑस्कर २०२२मध्ये गालात मारण्याची घटना झाली तेव्हापासून त्या दोघांमध्ये खूपच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्दैवाने जर या दोघांमध्ये घटस्फोट झाला तर जेडा अर्ध्या संपत्तीची भागीदार होईल जे विल स्मिथसाठी खूपच जास्त तोट्याचे असेल. (Will Smith And Jada Smith divorce)

========

हे देखील वाचा – नॅशनल क्रश रश्मिका मंदानासोबत व्हायरल झाला रणबीर कपूरचा फोटो 

========

एवढेच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या दोघांचा घटस्फोट झाला तर हॉलिवूडपासून जगातील घटस्फोटाच्या इतिहासामध्ये या दोघांच्या सर्वात जास्त खराब घटस्फोट असेल असे सांगण्यात येत आहे. अँजेलिना जॉली आणि ब्रँड पिट यांच्या तुलनेत देखील हा घटस्फोट मोठा असेल. तत्पूर्वी विल स्मिथ ३५० मिलियन संपत्तीचा मालक असून कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार विल स्मिथला त्याची अर्धी संपत्ती पत्नी जेडा पिंकेटला द्यावी लागेल. (Will Smith And Jada Smith divorce)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...