Home गाजावाजा स्पेशल मुंबईतल्या चोर बाजाराला ‘चोर बाजार’ हे नाव कधी आणि कसं पडलं? 
गाजावाजा स्पेशल

मुंबईतल्या चोर बाजाराला ‘चोर बाजार’ हे नाव कधी आणि कसं पडलं? 

7
Chor Bazaar
Chor Bazaar

मुंबई हे शहर एक नाही तर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईची लोकल, मुंबईची गर्दी, मुंबईचं नाइट लाइफ. मुंबईचा समुद्र इत्यादि. पण अजून एक गोष्ट मुंबईला वेगळेपण देते. ती गोष्ट म्हणजे मुंबईची मार्केट्स. आता तुम्ही म्हणाल बीग बाजार किंवा डी मार्ट का? ती तर कुठेही असतात, त्यात मुंबईचं काय कौतुक? तर नाही. मी बोलत आहे ती पार इंग्रजांच्या काळात नावारूपाला आलेल्या मुंबईच्या मार्केट्सबद्दल… (Chor Bazaar)

उदाहरण द्यायचं झालं तर भेंडी बाजार, नळ बाजार, क्रॉफोर्ड मार्केट आणि असे बरेच छोटे मोठे बाजार मुंबईत अस्तित्वात आहेत. या बाजारांमध्ये अजून एक हटके नाव असलेला बाजार म्हणजे ‘चोर बाजार’. तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल तो म्हणजे या बाजाराचं नाव चोर बाजार असं का पडलं असावं? या बाजारात वस्तूंची चोरी होते का? इथे सगळा चोरलेला माल विकला जातो का? इथे चोर रस्त्यावर मोकाट फिरत चोऱ्या करत असतात का? या बाजारात कोणी खरेदी करायला जाऊ नये म्हणून या बाजाराचं नाव ‘चोर बाजार’ ठेवलं आहे का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. पण यामागे सुद्धा एक भन्नाट स्टोरी आहे.(Chor Bazaar)

चोर बाजाराला ‘चोर बाजार’ म्हटलं जाण्यामागे सुद्धा एक मस्त इतिहास आहे. (Why is Chor bazaar called ‘Chor bazaar’?)

आता मुंबईत हा चोर बाजार नेमका कुठे आहे तर, भेंडी बाजारा जवळ, ग्रँट रोड जवळच्या मटण स्ट्रीटला लागून हा चोर बाजार आहे आणि तुम्हाला कदाचित सांगून पटणार नाही पण, महंमद अली रोडला लागून असलेल्या या चोर बाजाराला तब्बल १५० हून अधिक वर्ष झाली आहेत.

मुंबईची तमाम जनता या चोर बाजाराला वरचेवर भेट देत असते. शिवाय फिरायला येणारी लोकं सुद्धा इथे आवर्जून खरेदीसाठी येतात. आणि त्यांनाही कायम या बाजाराचं विशेष अप्रूप वाटत असतं. आता अनेकांना प्रश्न असा पडतो की इथे नेमकं काय मिळतं, जो प्रश्नच मुळात चुकीचा आहे. खरा प्रश्न असा पडायला हवा की, इथे काय मिळत नाही? (Why is Chor bazaar called ‘Chor bazaar’?)

पुरातन काळातल्या किंवा अँटिक गोष्टींचं बरचसं सेकंड हँड कलेक्शन या चोर बाजारात आहे. ­­इथे तुम्हाला छोट्या मोठ्या आकाराचे कंदील, छोटे मोठे तांब्या पितळ्याचे पुतळे, कॅमेरे, बॉलीवुडचे पोस्टर्स, घड्याळं, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स अशा अनेक गोष्टी मिळतात, विकत घेता येतात. बॉलीवुडच्या सेट्ससाठी सुद्धा अनेक गोष्टी इथे भाड्याने घेतल्या जातात, ज्यामुळे पैसे जास्त खर्च होत नाहीत आणि या वस्तूंमुळे सेट्सना शोभा सुद्धा येते. या बाजारात तुम्ही गेलात की ठरवलेल्या गोष्टींपेक्षा चार जास्तीच्याच गोष्टी तुम्ही विकत घेऊन येत असता.(Chor Bazaar)

====

हे देखील वाचा – Bisleri च्या ब्रँन्डचे पाणी कसे झाले लोकप्रिय? वाचा यशाची कहाणी

====

आता येऊया या मूळ प्रश्नावर. ते म्हणजे या चोर बाजाराचं नाव चोर बाजार असं कोणी ठेवलं? तर हा बाजार जवळ जवळ १५० वर्ष जुना आहे, म्हणजे पार ब्रिटिशांच्या काळापासून हा बाजार अस्तित्वात आहे. आणि तेव्हापासूनच हा बाजार कायम गजबजलेला असे. आजही इथे जितकी गर्दी असते तशीच पूर्वी सुद्धा असायची. इथे सतत गजबज, आवाज आणि कल्ला असायचा आणि म्हणूनच या बाजाराचं नाव ‘शोर बाजार’ असं ठेवण्यात आलं होतं. पण तेव्हा व्हायचं काय, तर इंग्रजांना ‘शोर’ हा शब्द उच्चारता येत नसे. ते ‘शोर’ हा शब्द ‘चोर’ असा उच्चारत असत आणि म्हणून तेव्हापासूनच ‘शोर’ या शब्दाचा अपभ्रंश ‘चोर’ असा झाला आणि हा बाजार ‘चोर बाजार’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला.

दुसरी एक अशी आख्यायिका सांगितली जाते की, त्याकाळी विक्टोरिया राणीचं बरचसं समान ती इंग्लंडला असताना हरवलं होतं आणि ते नंतर याच चोर बाजारात सापडलं आणि म्हणून तेव्हापासून या बाजाराचं नाव ‘चोर बाजार’ असं पडलं. (Why is Chor bazaar called ‘Chor bazaar’?)

आजही या बाजारात जायचं असेल तर, तुमचं सामान सांभाळून ठेवा असा एक सल्ला दिला जातो. खरं खोटं माहीत नाही, चोरीचं सुद्धा माहीत नाही, पण तुम्हाला जर का मनसोक्त खरेदी करायची असेल आणि तेही कमी पैसे खर्च करून, तर चोर बाजारासारखा दूसरा उत्तम पर्याय नाही हे नक्की.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....