प्रत्येक मुलींसाठी तिची नखं हा तिचा वीक पॉइंट असतो. त्या नेहमीच नखांची काळजी घेतात. नखं आपल्या सौंदर्याचा महत्वाचा घटक आहे. नखांचे सौंदर्य कायम आपला आत्मविश्वास वाढवते आणि चारचौघात आपले व्यक्तिमत्व अधिक खुलून येते. मात्र नखांचे सौंदर्य जपणे त्यांची काळजी घेणे खूपच आवश्यक असते. या नखांवरून देखील आपल्याला आपण किती निरोगी आहे, किंवा आपल्याला कोणत्या आरोग्याच्या समस्या आहेत हे देखील समजते. आपली नखं आपले सौंदर्य खुलवण्यासोबतच आपल्या आरोग्याबद्दल देखील खुलासा करत असतात. (NAils)
मजबूत आणि चमकदार नखं निरोगी व्यक्तीचे लक्षणं मानले जाते. आपण जर कधी आपल्या नखांचे नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की, कधी कधी आपल्या नखांवर पांढऱ्या रंगाच्या रेषा आलेल्या दिसतात. नखांचा खडबडीतपणा, वारंवार तुटणे आणि नखांचा रंग बदलणे ही अनेक आजारांची लक्षणे आहेत. नखांवर पांढरे डाग येणे हे देखील या आजाराचे लक्षण आहे. नखांवर येणाऱ्या पांढऱ्या रेषा नक्की कोणत्या आजाराचे संकेत देतात जाणून घेऊया. (Marathi News)
काही जणांना वाटतं की, शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे नखांवर पांढरे डाग पडतात; पण असे नाही. हे डाग पाडण्याचे इतरही अनेक कारणं असू शकतात. नखांवर पांढरे डाग तात्पुरत्या स्वरूपात पडतात. वैज्ञानिक भाषेत याला ल्युकोनिचिया म्हटले जाते. काही दुखापतीमुळे, कोणत्याही संसर्गामुळे किंवा बुरशीमुळे असे डाग पडू शकतात. याशिवाय काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील हे होऊ शकतं. इतकेच नाही कधी कधी काही लोकांमध्ये मधुमेह, हृदयरोग, यकृत रोग आणि एचआयव्हीमुळे देखील हे होऊ शकतं. (Latest Marathi News )

शरीरात लोह, कॅल्शियम आणि झिंकच्या कमतरतेमुळे देखील नखांवर पांढरे डाग येऊ शकतात. साधारणपणे हे डाग निरुपद्रवी असतात आणि कधीकधी त्यांना औषधांचीही आवश्यकता नसते. नखांवर पांढरे डाग जास्त दिवस तसेच असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तपासणी करून घ्यावी. जर डाग कोणत्याही आजारामुळे झाले नसतील तर कोणत्याही विशेष उपचारांची आवश्यकता नाही. हे तपासण्यासाठी रक्त तपासणी आणि बायोप्सी करता येते. (Top Stories)
एका माहितीनुसार, नखांवर पांढरे डाग पडण्यामागे अॅलर्जी, बुरशीजन्य संसर्ग आणि नखांना झालेल्या दुखापतीमुळेसुद्धा नखांवर पांढरे डाग पडतात. कधीकधी नखं खराब झाल्यावरही पांढरे डाग दिसून येतात. नखांवर पांढरे डाग पडतात आणि नखं वाढल्यानंतर ते हळूहळू निघूनही जातात. नखांच्या वाढीसह हे पांढरे डागही संपतात. नखं मोठी होत गेल्यास नखांबरोबर हे डाग पुढेपुढे सरकतात आणि दिसेनासे होतात. आपण आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश केला तर हे डाग कमी होण्यास मदत होते. कुणाला कुठला आजार झाला आहे किंवा लक्षणं आहेत, याचा अंदाज त्या व्यक्तीच्या नखांवरून घेता येतो. म्हणूनच उत्तम नखं, उत्तम आरोग्य असं म्हटलं जातं. अनेकांना सुंदर आणि मजबूत नखं हवीअसतील तर त्यांची पुरेशी काळजी घ्या. (Todays Marathi News )
=========
हे देखील वाचा : Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरात दिसतील आश्चर्यकारक फायदे
उन्हाळ्यात अन्नपदार्थ लगेच खराब होतात? असे करा स्टोअर
=========
नखांची काळजी कशी घ्यावी?
नखे मॉइस्चराइज करा. यासाठी तुम्ही नखांवर क्रीम, सीरम आणि खोबरेल तेल लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने नखांना मसाज करा. जर तुम्ही स्वयंपाकघरात बराच वेळ काम करत असाल आणि या काळात तुमचे हात बराच वेळ पाण्यात राहिल्यास तुम्ही सिलिकॉनचे हातमोजे घालून काम करू शकता. हे हातमोजे तुमची त्वचा आणि नखे दोन्ही सुरक्षित ठेवतील. (Top Marathi Headlines )
- acrylic nails
- black nails
- care
- coffin nails
- explore
- french nails
- gel nails
- glitter nails
- Health tip
- long nails
- nail
- nail addict
- nail art
- nail artist
- nail design
- nail designs
- nail snails nails
- nail tech
- nailinspo
- Nails
- nails and health
- nails care
- nails caring tip
- nails design
- nails health
- nails of the day
- nails on fleek
- nude nails
- ombre nails
- pink nails
- red nails
- short nails
- square nails
- white nails
- white spote on nails
- आरोग्य
- नखं
- नखांची काळजी कशी घ्यावी?
- नखांचे आरोग्य
- नखांवर पडणारे पांढरे डाग
- नखे आणि नखांची काळजी
- पांढरे डाग आणि नखं