५ एप्रिल २००१, दुपारी साधारण १.४५ ची वेळ, उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यात अनिल गोपाल या माणसाने पोलिसात पहिली तक्रार नोंदवली. ती तक्रार अशी होती की, आदल्या दिवशी रात्री अनिल आपल्या घरच्या छतावर झोपायला गेला. त्याला गाढ झोप लागली होती. दुपारी २ च्या आसपास त्याची झोप मोडली. त्याला जाणवलं की, कोणीतरी त्याच्यावर हल्ला करतंय आणि त्याच्या हातापायांवर मोठ्या खरचटलेल्या जखमा होत्या. जो त्याच्यावर हल्ला करत होता. त्याला पळवून लावायला त्याने खूप प्रयत्न केले, पण अंधार इतका होता की, त्याला काहीच दिसत नव्हतं. ज्याने त्याच्यावर हल्ला केला, तो पुढच्या क्षणात अंधारात गायब झाला. मग दोनच आठवड्यांनी म्हणजे १८ एप्रिलला अशीच सेम घटना पुन्हा एकदा घडली. या दोन्ही तक्रारी जेव्हा नोंदवल्या गेल्या त्यात एक गोष्ट विचित्र होती, दोन्ही घटनेत तो हल्लेखोर जेव्हा गायब झाला तेव्हा त्याची आकृती माकडासारखी दिसली होती. हा हल्ला इतका भयानक होता की, त्या जखमा बऱ्या व्हायला २१ दिवसांपेक्षा जास्त वेळ लगात होता. (Top Stories)
मग प्रश्न असा होता, की तो प्राणी होता की नक्की काय होतं ? कोणाला काहीच कळलं नाही. या घटना उत्तर प्रदेश आणि दिल्लीत सारख्याच घडायला लागल्या आणि या घटना इतक्या भयंकर होत्या की, त्या माकडासारखी आकृती दिसणाऱ्या हल्लेखोराला लोकांनी ‘मंकी मॅन’ नाव दिलं. कारण काहींचं म्हणणं होतं की, तो अर्धा माकड आहे आणि अर्धा माणूस आहे. या मंकी मॅनच्या रहस्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये बराच काळ दहशत राहिली. (Top Stories)

पुढे बरेच दिवस मंकी मॅनने हल्ला केलेल्या बऱ्याच तक्रारी यायला लागल्या. २००१ मध्ये पोलिसांना किमान १०० एक कॉल्स आले. सुरुवातीचे हल्ले गाझियाबादमध्ये झाले, पण नंतर पूर्व दिल्ली, नोएडा आणि दिल्लीच्या इतर भागांतूनही तक्रारी येऊ लागल्या. असे जवळपास ६५ ठिकाणाहून कॉल्स आले. प्रत्येक वेळेस हल्ल्याची स्टाइल सेम होती. रात्री लोकं झोपली असताना मंकी मॅन यायचा आणि लोकांवर वार करून जायचा. पण कधीच त्याचे पुरावे सापडले नाहीत. मंकी मॅनच्या दहशतीने लोकं इतकी घाबरायला लागली की, रात्री लोकांनी अक्षरशः घराबाहेर पडणं बंद केलं. जेव्हा गल्लीत “काला बंदर आ गया! मंकी मॅन आ गया!” असं कोणी ओरडलं की, लोकं जीव मुठीत धरून पळत सुटायची आणि अशाच धावपळीत २ माणसं मेली. एक गरोदर बाई पायरीवर घसरून पडली आणि एक माणूस छपरावरून खाली पडला आणि दोघेही मेले.
आता मंकी मॅन कसा दिसतो याचे पुरावे सापडले नाही. कारण ज्या ज्या लोकांनी त्याला पाहिलं, त्यांना तो नीट दिसलाच नाही. त्यांचं म्हणणं यायला लागलं की, आम्हाला फक्त त्याची एक झलक दिसली ती पण अंधारात. याचे ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून या मंकी मॅन बद्दल वेगवेगळ्या भाकड कथा तयार व्हायला लागल्या. एकाने सांगितलं की, “मंकीमॅन माकडापेक्षा माणसासारखाच जास्त दिसत होता! गोरा रंग, निळ्या डोळ्यांचा, मोठं नाक, नेपाळी चेहरा होता!” दूसरा म्हणाला की, “त्याची हाइट आठ फुट होती.” कोणी म्हणालं की, तो चार-पाच फूट उंच होता!, कोणी म्हणायला लागलं “तो मांजरीएवढा होता.” लोकं अक्षरशः त्याला तो एलियन असणार असं बोलायला लागले किंवा तो रोबोट आहे असंही बोलायला लागले. सगळ्या भाकडकथामध्ये सर्वात फेमस झालेली स्टोरी म्हणजे, मंकीमॅन हेल्मेट घालायचा, त्याच्या टी-शर्टवर तीन बटणं होती! पहिलं बटण त्याला माकड बनवायचं, दुसरं त्याला पॉवर द्यायचं आणि तिसरं त्याला गायब करायचं! त्याच्या पायात स्प्रिंग्स होत्या म्हणून तो २०-२० फुट उड्या मारायचा!”(Top Stories)
ही मंकी मॅनची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. बऱ्याच लोकांनी तो खरा कोण? हे शोधायला फोटोस आणि व्हिडिओज् काढायचा प्रयत्न केला. पण एकही पुरावा सापडला नाही. लोकांमध्ये याची इतकी भीती तयार झाली की, लोकं रात्री झोपायची नाहीत, छोट्या गोष्टीवरून, सावली बघून घाबरायला लागली. भीतीपोटी ते रात्री हातात लाठीकाठी घेऊन तयारच असायचे, कधी मंकी मॅन त्यांच्या तावडीत सापडला की, त्याला बेदम मारायचा, असा प्लान गावकऱ्यांंनी केला होता. एकदा १००-१५० लोकांनी एक Random माणसावर हल्ला केला कारण त्यांना वाटलं की तो मंकी मॅन आहे. अशा घटना सारख्याच घडायला लागल्या. हा गोंधळ इतका वाढायला लागला की, पोलिसांना आता काहीतरी करावं लागणार होतं. पोलिस दिवसरात्र पेट्रोलिंग करायला लागले. लोकांकडून वर्णन घेऊन मंकी मॅनचे स्केचेस काढण्यात आले. ते स्केचेस पेपर मध्ये पब्लिश केले. मंकी मॅनला पकडण्यासाठी ५०००० रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं. बरेच प्रयत्न करूनसुद्धा मंकीमॅनचा पत्ता लागला नाही. काही महिन्यानंतर या घटना अचानक कमी व्हायला लागल्या. पोलिसांनी खोट्या कॉल्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली. त्यांनी जाहीर केलं, “खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना तुरुंगात टाकू! काही लोकं या घटनेनंतर मुद्दाम मंकी मॅन बनून इतर लोकांना त्रास द्यायला लागले. पोलिसांनी त्यांनाही अटक केली.
===============
हे देखील वाचा : Temple : जगाच्या अंताचे रहस्य असलेल्या ‘या’ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जावे लागते ९० फूट खोल गुहेत
===============
पण खरा प्रश्न हाच होता की, हे मंकी मॅन नेमकं काय प्रकरण होतं? लोकं जे या घटनेमुळे घाबरले होते, ते असंही म्हणत होते की, “यात अमेरिका, चीन किंवा पाकिस्तानचा हात आहे.” कोणी म्हणालं, “हा एलियन होता, आता परत गेला!” काहींनी तर सांगितलं, “हा आसामला गेला!” पण सायकोलॉजिस्ट या सगळ्याचा अभ्यास करून म्हणाले की, मंकी मॅन हा “मास हिस्टेरिया” नावाचा आजार आहे. या आजारात सामूहिक भ्रम तयार होतो, जिथे गोष्ट तर्क नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि तेच खरं मानतात. मंकी मॅन हे मास हिस्टेरियाचं उत्तम उदाहरण आहे. यात एक अफवा लोकांच्या मनात एवढी खोल जाते की सगळे तेच अनुभवायला लागतात. मग कोणी खरं सांगो किंवा खोटं, ती भीती एकदा का तयार झाली की, अंधारतली सावली सुद्धा लोकांना मंकी मॅन वाटायला लागली. यासोबतच न्यूजवाल्यांनी ही बातमी इतकी उचलली आणि मोठी करून सांगितली की, सगळ्यांना हे खरं वाटायला लागलं आणि याच गोष्टीमुळे मास हिस्टेरिया जास्त पसरतो असं सायकोलॉजिस्टचं म्हणणं आलं.(Top Stories)
पण मग त्या जखमांचं काय? तर डॉक्टरांनी जखमा तपासल्या आणि त्यांना आढळलं की, त्या जखमा खऱ्या होत्या, पण त्या मंकीमॅनच्या नव्हत्या! बहुतेक जखमा उंदीर किंवा कुत्र्यांने केलेल्या होत्या किंवा लोक पळताना कुठे तरी आपटले, त्यामुळे त्यांना जखमा झाल्या. असंही म्हंटलं गेलं की, काही जखमा लोकांनी स्वतः केल्या, कारण त्यांना मीडियात लक्ष हवं होतं! मंकी मॅन कोणता प्राणी नव्हता तर ती अफवा होती, जिचं रूपांतर भयानक घटनेत झालं. तुम्हाला या मंकी मॅनबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- delhi encounter
- delhi encounters
- delhi fear
- delhi fears
- delhi scare
- delhi superstitions
- delhi terror
- delhi urban myth
- fear folklore
- fear in delhi
- fearmongering delhi
- fearmongering myths
- fearmongering stories
- fearmongering tales
- history
- india
- local superstitions
- monkey urban legend
- mystery chronicles
- mystery legends
- night terror
- night terrors
- nighttime fears
- psychological phenomenon
- sleep terrors
- terror folklore
- terror in delhi
- urban terror