Home व्यक्ती विशेष कोण आहेत ‘तेमजेन इमना अलांग’ ज्यांचे व्हिडीओ होतायत सोशल मीडियावर व्हायरल..
व्यक्ती विशेष

कोण आहेत ‘तेमजेन इमना अलांग’ ज्यांचे व्हिडीओ होतायत सोशल मीडियावर व्हायरल..

14
Temjen Imna Along
Temjen Imna Along

तेमजेन इमना अलांग (Temjen Imna Along)! हे कोण आहेत याची कल्पना आहे का? मुळात हे कोणा व्यक्तीचे नाव आहे, याचीच कल्पना येत नाही. ‘पण तेमजेन इमना अलांग’ यांचे एक भाषण काय सोशल मिडीयावर व्हायरल झाले, त्यातून तेमजेन या नावाचा सर्वाधिक शोध सध्या सोशल मीडियावर घेण्यात येतोय. 

नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले ‘तेमजेन इमना अलांग’ यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर आला. त्यात तेमजेन यांनी स्वतःवरच केलेले व्यंगात्मक वक्तव्य आणि नागालॅंडवासीयांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल व्यक्त केलेल्या भावना, तमाम देशवासीयांपर्यंत पोचल्या आहेत. त्यामुळेच तेमजेन यांच्याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.  

भारताच्या पूर्वांत्तर प्रदेशाला निसर्गांनं भरभरून आशीर्वाद दिला आहे. मिझोराम, आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड यांचा समावेश असलेल्या या पूर्वांत्तर प्रदेशाला ‘सेव्हन सिस्टर स्टेट्स’ म्हणून ओळखले जाते. ही सर्व राज्य निसर्गदेवतेने भरभरुन दिलेल्या दानानं अगदी परिपूर्ण असली तरी या भागातील लोकांना अनेकवेळा आपल्याच देशात फिरताना परकीय नागरिक असल्याची जाणीव करुन देण्यात येते.  

आपल्याच देशात येणारा हा अनुभव कष्टदायक असतो. याच सर्व अनुभवाची माहिती तेमजेन इमना अलांग यांनी एका व्याख्यानादरम्यान दिली होती. तेमजेन इमना अलंग यांच्या भाषणाचा व्हिडिओ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सोशल मिडियावर शेअर करत त्यावर माझा भाऊ इमना अलांग ‘पूर्ण फॉर्म’मध्ये आहे असा शेरा मारला. अत्यंत खुसखुशीत भाषणातून आपल्या मनातील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा तेमजेन यांचा अंदाज नेटकऱ्यांना इतका आवडला की, सध्या तेमजेन प्रचार सोडून सोशल मिडीयावरुन त्यांना मिळणाऱ्या प्रतिक्रीयांना उत्तर देण्यात मग्न झालेत.  

नागालॅंडमध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणूका होत आहेत. त्या निवडणुकांसाठी तयारी सुरु झाली असून, तेमजेन आपल्या पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. त्यापैकीच एका सभेमध्ये त्यांचे भाषण झाले आणि तेमजेन स्टार झाले. तेमजेन हे नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री असून भारतीय जनता पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत.  

41 वर्षीय तेमजेन 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीत ‘अलंग टाकी’ मतदारसंघातून निवडून आले होते. 2018 पासून ते नागालॅंड सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत. तेमजेन यांची हिंदी आणि इंग्रजी भाषांवर उत्तम पकड आहे. याशिवाय तेमजेन सोशल मिडीयावरही खूप सक्रिय आहेत. गुबगुबीत चेहरा, छोटे डोळे आणि डोक्यावर केसांचा छोटासा आंबाडा असे दिसणारे तेमजेन इमना अलोंग  सोशल मिडीयावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वकृत्व शैलीप्रमाणेच त्यांचे ट्विटही खूप बोलके असते.  

11 जुलै 2022 रोजी एका कार्यक्रमात तेमजेन यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलेल्या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांना खूप हसवले. पण त्यासोबत इशान्य भारतातील नागरिकांना आपल्याच देशात फिरताना येणाऱ्या अनुभवांचे कथनही केले. या व्याख्यानाची सुरुवात ‘तेमजेन इमना अलांग’ यांनी आपल्या छोट्या डोळ्यांवरुन केली. 

ईशान्येकडील लोकांचे डोळे लहान असतात, परंतु त्यातून सर्व काही स्पष्टपणे दिसते. लहान डोळे असण्याचेही फायदेही आहेत. पहिला फायदा म्हणजे डोळ्यात घाण कमी जाते आणि जेव्हा स्टेजवर लांबलचक भाषणं चालतात तेव्हा आपण थोडा वेळ झोपूही शकतो. आपण झोपलेले आहोत की जागे आहोत हे कोणालाच कळत नाही. तेमजेन यांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांनी त्यांना भरभरुन दाद दिली.  त्यानंतर तेमजेन यांच्या भाषणाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर झाले आहेत. त्यात त्यांच्या दिल्लीवारीचे अनुभव सांगणाराही व्हिडीओही चांगलाच प्रसिद्ध झालाय.  

या व्हिडिओमध्ये तेमजेन 1999 साली पहिल्यांदा दिल्लीला आल्यावर मिळालेला अनुभव कथन करत आहेत. तेव्हा दिल्लीतील लोकांचा नागा संस्कृती आणि नागा लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता.   तेमजेन सांगतात, “जेव्हा मी 1999 मध्ये पहिल्यांदा दिल्लीला ट्रेनने आलो आणि रेल्वे स्टेशनवर उतरलो तेव्हा माझ्या राज्याच्या (नागालँड) लोकसंख्येपेक्षा जास्त ‘नागा लोक’ दिल्लीत असल्याचे मला कळले. हे पाहून मला खूप आर्श्चय वाटले. 

आपल्या देशाच्या राजधानीतील बहुतेक लोकांना नागालॅंड राज्याची कल्पना नव्हती. स्वित्झर्लंड किंवा फिनलॅंड सारखाच नागालॅंड हा दुसरा देश असल्याचे तेव्हा लोकांना वाटायचे. त्यामुळे मला नागालॅंडला येण्यासाठी व्हिसा लागेल का, असे विचारल्याचे तेमजेन यांनी सांगितले. 

ताजमहल बघण्यासाठी गेल्यावरही भारतीयांच्या रांगेत मी उभा होतो. पण नंतर मला फॉरेनर समजून माझ्याकडे 20 डॉलरची मागणी करण्यात आली. तेव्हा त्यांना मी भारतीयच असल्याचे पटवून देण्यात माझा बराच वेळ निघून गेला.”  नागा लोकांबद्दल अनेक गैरसमज असल्याचेही तेमजेन यांनी आपल्या भाषणातून सांगितले आहे.  

=======

हे देखील वाचा – कोण होते शिंजो आबे? स्टील प्लांटमध्ये नोकरी ते देशाचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा रोमहर्षक प्रवास

======

या भाषणांमुळे तेमजेन इमना अलांग यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. यातून अविवाहित असलेल्या तेमजेन यांच्या पत्नीचाही शोध नेटकाऱ्यानी घेतल्याचे लक्षात आले. यावर तेमजेन यांनी मी अजूनही तिला शोधत आहे, असे मजेशीर उत्तर दिलं आहे. भारतीय इतिहासाचे अभ्यासक असणारे ‘तेमजेन’ सध्या त्यांच्या प्रशसकांना उत्तर देण्यात मग्न झाले आहेत. यातून ते नागालॅंड आणि नागा संस्कृतीचाही प्रचार करत आहेत. या सुंदर राज्याला भेट देण्याचे आवाहनही ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून करत आहेत.

– सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Akbar
व्यक्ती विशेष

Mughal Emperor: मुघल इतिहासातील सर्वाधिक विवाह करणारा सम्राट!

Mughal Emperor And Marriage : भारतीय इतिहासात मुघल साम्राज्य हे वैभव, सत्ता...

Premchand Roychand Jain
व्यक्ती विशेष

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजाराचा पाया रचणाऱ्या महान उद्योगपतींपैकी एक...

abdul samad khan
व्यक्ती विशेष

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान कोण होते? मुघलांशी काय होते कनेक्शन? घ्या जाणून

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान हे १८व्या शतकातील मुघल साम्राज्यातील एक...

Thailand | Top Marathi Headlines
व्यक्ती विशेष

Thailand : थायलँडमध्ये थाय मसाज देण्यासाठी डॉ. शिवगो यांनी असा लावला शोध, वाचा रंजक गोष्ट

Thailand : थायलँडमध्ये ‘थाय मसाज’ ही एक प्राचीन आणि प्रभावी उपचारपद्धत म्हणून...