Home गाजावाजा स्पेशल बॉलिवूड ते गायकांवर आपली छाप पाडणारा Abdu Rozik नक्की कोण आहे?
गाजावाजा स्पेशलव्यक्ती विशेष

बॉलिवूड ते गायकांवर आपली छाप पाडणारा Abdu Rozik नक्की कोण आहे?

10
Abdu Rozik
Abdu Rozik

सध्या सोशल मीडियात अब्दु रोजिक हा चर्चेत आहे. अब्दुचे सलमान खान ते सुप्रिद्ध गायक ए.आर. रहमान सारखे गायक ही त्याचे चाहते आहेत. अब्दुने या सर्वांवर आपली एक वेगळीच छाप पाडली असून त्याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. नुकत्याच जेव्हा सलमान खान हा दुबईत एका कार्यक्रमासाठी गेला होता त्यावेळी अब्दु याच्यासोबत त्याची भेट झाली. ऐवढेच नव्हे भेटी दरम्यान अब्दुने ‘एक लडंकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे सुद्धा गायले आणि सलमानचे मन जिंकले.याआधी सुद्धा अब्दुचा ए.आर. रहमान सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच गाजला होता. परंतु अब्दु रोजिक (Abdu Rozik) नक्की आहे तरी कोण? आणि त्याचे ऐवढे चाहते कसे? असे विविध प्रश्न आता सोशल मीडियात विचारले जात आहेत. आता तुम्हाला ही हाच प्रश्न पडला असेल ना नक्की अब्दु रोजिक कोण? अब्दु रोजिक बद्दल चला तर थोडक्यात जाणून घेऊयात.

Abdu Rozik
Abdu Rozik

कोण आहे अब्दु रोजिक?
अब्दु रोजिक हा तजाकिस्तान मध्ये राहणारा आहे. त्याचा जन्म ३ सप्टेंबर २००३ मध्ये झाला होता. १८ वर्षाचा असलेला अब्दु हा जगातील सर्वाधिक लहान गायक असल्याचे म्हटले जाते. खरंतर अब्दु रॅप सिंगर असला तरीही त्याचे गायन उत्तम आहे. तजाकिस्तानमध्ये अब्दुने रॅप गाणी गात आपले नाव प्रत्येकाच्या मनात कोरले आहे. या व्यतिरिक्त अब्दुचे एक युट्युब चॅनल Avlod Media नावाने आहे. गायक असण्यासह तो म्युजिशियन, ब्लॉगर आणि एक बॉक्सर ही आहे.

हे देखील वाचा- जस्टिन बीबर लढतोय ‘या’ आजाराशी, व्हिडिओ शेअर करुन दिली माहिती

अब्दु रोजिकची (Abdu Rozik) उंची का वाढली नाही?
हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे की, अब्दुची उंची का वाढली नाही. खरंतर अब्दु रोजिक याची उंची ३ फूट २ इंच असल्याचे सांगितले जाते. अब्दुला लहानपणापासूनच रिकेट्स नावाचा आजार झाला आहे. शरिरात कॅल्शियम आणि विटामीन डी च्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. यामुळे शरिरातील हाडं ठिसूळ होऊ लागतात. या आजारामुळेच अब्दु रोजिक याची उंची वाढली नाही. त्याचसोबत गायकाच्या परिवाराला त्याच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक चणचण ही भासली. अब्दु रोजिक याच्या घरातील मंडळी ही Panjakent येथे राहत असून ती मंडळी गार्डनिंग सेक्टरमध्ये काम करतात.

Abdu Rozik
Abdu Rozik

अब्दु रोजिक याआधी खुप चर्चेत आला होता जेव्हा त्याचे भांडण Hasbulla Magomedov सोबत झाले होते. अब्दुचे बॉलिवूडमधील खुप चाहते आहेत. तर अब्दुचे सोशल मीडियातील अकाउंट पाहता तुम्हाला सोनू सूद, टायगर श्रॉफ, आणि यो यो हनी सिंहसह काही सेलेब्स सोबतचे त्याचे फोटो तुम्हाला दिसतील.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....