Home आंतरराष्ट्रीय Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण?
आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण?

7
Operation Sindoor

७ मे च्या मध्यरात्री भारतीय वायु सेनेने ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पण या ऑपरेशनची खास गोष्ट माहितीये काय होती? या operation ची माहिती ७ मे च्या सकाळी १०:३० वाजता जगाला सांगितली भारताच्या दोन जाबाज महिला सैनिकांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह! यांनी… आणि याच्या मार्फत भारताने जगाला मोठा संदेश दिला आहे. कोण आहेत या दोन जाबाज महिला सैनिक? भारताने त्यांच्यामार्फत जगाला कोणता संदेश दिला? जाणून घ्या. (Operation Sindoor)

कर्नल सोफिया कुरेशी, या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहेत. वडोदऱ्याच्या मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातून त्या येतात. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही लष्करात होते, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच लष्करी जीवनाची ओळख होती. त्यांनी १७ व्या वर्षी भारतीय लष्करात प्रवेश केला. त्यानंतर आपल्या कर्तृत्वाने भारतीय सैन्यात त्यांनी आपली छाप सोडली. २००६ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये होत्या तिथं त्यांनी सहा वर्षांहून अधिक काळ शांतता राखण्यासाठी सेवा दिली. त्यांचं नेतृत्व, संयम आणि निर्णयक्षमता यामुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आल्या. आणि २०१६ साली त्यांनी इतिहास रचला. (Marathi Latest News)

Operation Sindoor

त्या वर्षी थायलंडमध्ये ‘एक्सरसाइज फोर्स १८’ ही बहुराष्ट्रीय लष्करी सराव मोहीम पार पडली. ज्यात अमेरिकेसकट चीन, रशिया असे १८ देश सहभागी होते, आणि यात भारताच्या ४० जणांच्या टीमचं नेतृत्व सोफिया कुरेशी यांनी केलं होतं. त्या एकमेव महिला अधिकारी होत्या ज्यांनी कोणत्याही देशाच्या लष्कराचं नेतृत्व केलं. हे केवळ सैनिकी इतिहासातच नाही तर महिलांच्या सशक्तीकरणाच्या इतिहासातही एक मैलाचा दगड ठरलं. (Marathi Top Stories)

दुसरं नाव म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंग, व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलात एक अत्यंत कुशल अधिकारी आहेत. लहानपणापासूनच त्यांना विमान उडवायचं स्वप्न होतं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी शाळेत असतानाच नॅशनल कॅडेट कॉर्प्स मध्ये सहभाग घेतला आणि तिथूनच त्यांच्या हवाई दलातील प्रवासाची सुरुवात झाली. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात प्रवेश घेतला. (Marathi Trending News)

आपल्या कुटुंबातून सशस्त्र दलात सामील होणाऱ्या त्या पहिल्या सदस्य होत्या. त्यांची हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्ती झाली आणि 18 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी फ्लायिंग ब्रँचमध्ये कायमस्वरूपी अधिकारी बनल्या.आजवर त्यांनी 2500 पेक्षा अधिक तास हेलिकॉप्टर उड्डाण केलं आहे. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात त्यांनी एक जबरदस्त रेस्क्यू मोहीम पूर्ण केली. हे ठिकाण उंच डोंगरात होतं, वातावरण पण खूपच खराब होतं. पण वयोमिका यांनी तिथंही जबरदस्त काम केलं आणि अनेकांचे प्राण वाचवले. (Marathi Top Trending News)

Operation Sindoor

पहलगाम हल्ल्यात अनेक महिलांनी आपले पती गमावले, त्यांचा सिंदूर पुसला गेला. आणि या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने त्या सगळ्या महिलांना न्याय मिळवून दिला. आता या ऑपरेशनची माहिती जगाला सांगण्यासाठी दोन महिला सैनिकांना पुढे आणून भारताने जगाला सांगितलं – आमच्या देशात महिला फक्त घर सांभाळत नाहीत, तर सीमेवरही देशाचं रक्षण करतात! सोफिया आणि व्योमिका यांच्या निवडीमागे हा मेसेज आहे की, भारतीय सैन्यात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.(Social NEws)

=======

हे देखील वाचा : Rafale : ‘ऑपरेशन सिंदूर’ला यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या राफेल विमानाची वैशिष्ट्ये

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!

Operation Sindoor : अटलजी यांच्या उत्तराने पाकिस्तानची चांगलीच तंतरली होती

=======

मग ते युद्ध असो, शांतता मिशन असो, की ऑपरेशन सिंदूरसारखी धाडसी कारवाई! याशिवाय, भारताने हा संदेशही दिलाय की, आम्ही दहशतवादाविरुद्ध लढताना कोणत्याही भेदभावाला थारा देत नाही. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या निवडीने भारताने दाखवून दिलं की, आमचं सैन्य एकतेचं प्रतीक आहे. धर्म, लिंग, किंवा इतर कोणताही भेदभाव आमच्या सैन्यात नाही. ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेत या दोघींनी अतिशय ठामपणे सांगितलं की, दहशतवादाविरुद्ध भारत कधीही माघार घेणार नाही. हा संदेश फक्त पाकिस्तानलाच नाही, तर सगळ्या जगाला आहे. (International News)

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...