Home सामाजिक White Coffee मुळे आरोग्याला होणारे फायदे
सामाजिक

White Coffee मुळे आरोग्याला होणारे फायदे

8
White Coffee
White Coffee

आपल्यापैकी बहुतांश लोकांची सकाळ ही कॉफी किंवा चहाने होते. पण चहानंतर सर्वाधिक पसंद केली जाणारी गोष्ट म्हणजे कॉफीच. हेच कारण आहे की, जगभरातील देशांमध्ये कॅफे आणि कॉफी शॉप्स आपल्याला पहायला मिळतात. कोल्ड कॉफी असो किंवा हॉट, कॉफीच्या एका कपच्या स्वादानंतर आनंदीत वाटते. एक्सप्रेसो ते कॅपेचीनो पर्यंत कॉफीचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे मिळतात. मात्र फार कमी जणांना व्हाइट कॉफी बद्दल माहिती आहे. कॉफीच्या विविध प्रकारांमध्ये आता ही कॉफी सध्या पसंद पडत आहे. (White Coffee)

ही कॉफी अगदी वेगळी आणि युनिक असते. परंतु गेल्या काही काळात व्हाइट कॉफी ही लोकांमध्ये फार प्रसिद्ध झाली आहे. ट्रेडिशनल कॉफी ऐवजी याला कमी रोस्ट केले जाते, त्यामुळे त्याची टेस्ट ही वेगळीच असते. आपल्याकडे ही कॉफी फार कमी ठिकाणी मिळत असावी. कारण आपल्याकडे रेग्युलर कॉफी किंवा कॉफीचे विविध प्रकारच ट्राय केले जातात.

असे म्हटले जाते की, व्हाइट कॉफी ही मूलत: मलेशियातील आहे. ही कॉफी तेथील लोकांच्या खाण्यापिण्याच्या हिस्सा राहिली आहे. व्हाइट कॉफीला लाइट अरेबिका बिन्सचा वापर करुन तयार केली जाते. अरेबिका बिन्स केवळ १५ मिनिटेच रोस्ट केले जातात. तर रेग्युलर कॉफीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिन्सला रोस्ट करण्यापेक्षा यासाठी फार कमी वेळ लागतो.

आरोग्यासाठी किती फायदेशीर
ट्रेडिशनल कॉफी प्रमाणेच व्हाइट कॉफी मध्ये सुद्धा कॅफेन असते. जर तुम्हाला एनर्जी वाढवायची असेल तर व्हाइट कॉफीचा ऑप्शन उत्तम ठरु शकतो. व्हाइट कॉफी लाइट रोस्ट केलेल्या बीन्स पासूनच तयार केली जाते. त्यामुळे यामधील अँन्टीऑक्सिडेंट नष्ट होत नाही. अशातच ट्रेडिशनल कॉफीच्या तुलनेत अधिक अँन्टिऑक्सिडंट असतात. (White Coffee)

हे देखील वाचा- लंगड्या आंब्याचा इतिहास…

अँन्टिऑक्सिडंट सुज कमी करण्यासाठी आणि शरीराला पेशींच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ओळखले जातात. ज्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. जर नियमित कॉफीमुळे तु्म्हाला अॅसिडिटी होते. त्यामुळे तुम्ही त्याऐवजी व्हाइट कॉफीचा पर्याय निवडू शकता. ती कमी अॅसेडिट असण्यासह आपल्याला पचनासाठी सुद्धा हलकी असते.

एका दिवसात किती वेळा कॉफी प्यावी?
बहुतांश डाएटीशन दिवसभरात दोन कप कॉफी पिणे अनुकल मानतात. याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो असे ते मानतात. परंतु अधिकाधिक सेवनाची वेळ येते तेव्हा तीन वेळा तरीही कॉफी प्यावी. परंतु त्यापेक्षा अधिक वेळा कॉफी अथवा चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...

Varanasi
सामाजिक

Varanasi : देव दिवाळीचे महत्त्व !

दरवर्षी दिवाळीनंतर १५ दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान...

Mathura
सामाजिक

Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड

भारतातील मंदिरं कायम त्यांच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांसाठी, त्यांच्या अभूतपूर्व बांधकामासाठी, इतर अनेक कारणांसाठी...