Home गाजावाजा स्पेशल WhatsApp वर चॅट्स शोधणे होणार सोप्पे, कंपनीने आणले हे नवे फीचर
गाजावाजा स्पेशल

WhatsApp वर चॅट्स शोधणे होणार सोप्पे, कंपनीने आणले हे नवे फीचर

6
WhatsApp New Feature
WhatsApp New Feature

WhatsApp New Feature : व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी चॅट फिचर आणले आहे. अशातच युजर्सला जुने संवाद शोधणे सोप्पे होणार आहे. या संदर्भातील पोस्ट कंपनीने शेअर केली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की, चॅट फिल्टरच्या मदतीने युजर्सला फार कमी वेळात मेसेज शोधण्यास मदत होणार आहे. लेटेस्ट फीचर सोशल मीडिया अॅपमध्ये खास चॅट सुरू करण्यासाठी लागणारा वेळ वाचवणार आहे.

या फिल्टर फिचरला तयार करण्याची प्रक्रिया आणि विचार अशावेळी सुरू झाली ज्यावेळी युजर्सने व्हॉट्सअॅपवर आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल काम करण्यास सुरूवात केली. फिल्टरमुळे युजर्सला संपूर्ण इनबॉक्समध्ये मेसेज शोधण्यासाठी स्क्रोल करावे लागणार नाहीये. यामुळे एखादा महत्त्वाचा मेसेजही अवघ्या काही सेकंदात अॅपमध्ये शोधून मिळणार आहे. व्हॉट्सअॅपने तीन डिफॉल्ट फिल्टर दिले आहेत.

असा करा नव्या फीचरचा वापर
-सर्वप्रथम आपल्या व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट वर्जन अपडेट करा
-त्यानंतर व्हॉट्सअॅप आपल्या आयओएस अथवा अॅन्ड्रॉइडवर सुरू करा.
-तुमच्या प्रोफाइलमध्ये दिसत असलेले चॅट्सच्या वरती तीन फिल्टर्स दिसतील. त्यावर क्लिक करा. त्यामध्ये All, Unread आणि Groups चे ऑप्शन मिळतील. (WhatsApp New Feature)

All कॅटेगरीत युदर्सला पर्सनल आणि ग्रुपचे चॅट्स एकत्रित दिसतील. याशिवाय Unread फिल्टरमध्ये युजर्सला तेच मेसेज दिसतील जे त्यांनी अद्याप पाहिलेले नाहीत. हे मेसेज सुरू केल्यानंतर युजर्सला Unread लिहिलेले दिसेल. तर Groups फिल्टरमध्ये युजर्सला ते सर्व ग्रुप्स दिसतील ज्यामध्ये ते सहभागी आहेत.

(अशाच गाजावाजासंबंधित वेगवेगळ्या माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा :
आधार कार्डच्या माध्यमातून काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रोसेस
ChatGPT मध्ये नवे फीचर येणार, कोणत्याही फोटोबद्दल लगेच माहिती मिळणार
जुने घर विक्री करताना किती टॅक्स भरावा लागतो?

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....