Home राशीभविष्य ‘या’ राशींच्या तरुणांसाठी नवीन संधी येईल चालून…
राशीभविष्य

‘या’ राशींच्या तरुणांसाठी नवीन संधी येईल चालून…

12
Weekly Horoscope
weekly-horoscope-20-feb-to-26-feb-marathi-info

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 20 Feb to 26 Feb)

मेष – राशी स्वामी मंगळाचे धनस्थानातून तर बुधाचे दशमस्थानातून रवी शनीचे लाभस्थानातून आणि गुरु शुक्राचे व्ययस्थानातून भ्रमण होत आहे. लाभस्थानातील रवी शनी वरून चंद्रभ्रमण होत असल्यामुळे स्वकृत्वाच्या जोरावर आपली कामे मार्गी् लागतील. मित्र परिवाराच्या सहकार्याने नवीन कार्यारंभ कराल. इच्छापूर्ती होईल. धाडसी निर्णय घेतले जातील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा येईल तसेच भविष्यकाळाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यात यश येईल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल.

शुभ दिनांक – 22, 23

वृषभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या दशमस्थानातील रवी आणि शनि वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना यश लाभेल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. कोर्ट कचेरीच्या कामातून यश मिळेल. नोकरीत स्त्री अधिकारी वर्गाकडून सहकार्य लाभेल. गोड बोलून आपली कामे करून घ्याल. आपली मते इतरांवर लादू नका. उष्णतेचे विकार, नेत्र विकार, डोकेदुखी यांचा त्रास होऊ शकतो. कामानिमित्त प्रवास घडून येतील.

शुभ दिनांक – 20

मिथुन – राशीच्या भाग्यस्थानातील रवी आणि शनि वरून चंद्राचे प्रमाण होत आहे. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने या आठवड्यातील ग्रहमान आपणास अतिशय अनुकूल आहे. सकारात्मक ऊर्जा वाढेल. हाती घेतलेले काम निगुतीने पूर्ण कराल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. दशामातील गुरु, शुक्रामुळे आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कवी, कलाकार, गायक, वादक यांना श्रोत्यांकडून चांगली दाद मिळेल. अध्यात्मिक प्रगती होईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. उष्णतेचे विकार तसेच पित्त विकार यांचा त्रास जाणवू शकतो.

शुभ दिनांक – 24, 25

कर्क – अष्टमातील रवी, शनी वरून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. सरकार दरबारी रेंगाळलेले कामे तसेच कोर्टकचेरी संबंधीची कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून आर्थिक लाभ होतील. भागीदारी व्यवसायातून नवीन कामे पूर्णत्वास जातील. भाग्यस्थानातील गुरु शुक्रामुळे तीर्थस्थळांना भेटी द्याल तसेच आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. स्वकृत्वाच्या जोरावर मोठी निर्णय घेतले जातील. अनपेक्षितपणे तरुणांना नवीन संधी चालून येतील, त्या संधीचा लाभ घ्यावा. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल.

शुभ दिनांक – 22, 23

सिंह – आपल्या राशीच्या सप्तम स्थानातील रवी आणि शनि वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांना मनापसंत जोडीदार मिळेल. व्यावसायिक कामानिमित्त प्रवास घडतील. अध्यात्मिक प्रगती होईल. नोकरी व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या कुवतीपेक्षा मोठी कामे हाती घेण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. नेत्र विकार, पित्तविकाराचा त्रास होऊ शकतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ दिनांक – 20, 21

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातील रवी, शनिवारून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढती बदलीचे योग संभवतात. कामाचा व्याप वाढेल. पण त्याचबरोबर प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढतील. तेव्हा प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सप्तमातील गुरु, शुक्रामुळे विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. भागीदारी व्यवसायात चालू असलेले उपक्रम पूर्णत्वास जातील. सकारात्मक ऊर्जा वाढेल. मन प्रसन्न राहील. परदेशातून आवक होईल.

शुभ दिनांक – 24 ते 26

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातील रवी आणि शनि वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणीतांना गोड बातमीची चाहूल लागेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्र परिवाराच्या सहकार्याने रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. नोकरी व्यवसायात स्त्री सहकाऱ्यांकडून मदत होईल. षष्ठस्थानातील गुरु, शुक्रामुळे मधुमेह तसेच पोटाच्या विकारांचा त्रास उद्भवण्याची शक्यता राहते. योग्य आहार विहार ठेवल्यास प्रकृती उत्तम राहण्यास मदत होईल.

शुभ दिनांक – 20 ते 22

वृश्चिक – सुखस्थानातील रवि, शनिवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. वाद टाळावेत. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपले छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. कवी, कलाकारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. वैयक्तिक उत्कर्ष साधता येईल. शैक्षणिक क्षेत्रातील एखाद्या पुरस्काराचे मानकरी ठराल. कामानिमित्त अपेक्षित प्रवास योग घडतील. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

शुभ दिनांक – 26

धनु – राशीच्या पराक्रमस्थानातून रवी, शनी आणि चंद्राचे भ्रमण होत आहे. स्वतंत्र वृत्तीने आणि आत्मविश्वासाने आपले ध्येय पार पाडता येईल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. नवीन वाहन वस्तू खरेदी केली जाईल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन होईल. कुटुंबातील सदस्यांसंबंधी सुवार्ता कानी येतील. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने खरेदी कराल. पाहुण्यांची वर्दळ राहील. मातृसंख्य लाभेल. वैयक्तिक उत्कर्ष साधता येईल‌.

शुभ दिनांक – 24, 25

मकर – आपल्या राशीतून बुधाचे तर राशीच्या धनस्थानातील रवी आणि शनि वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा येईल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. भावंड सौख्य लाभेल. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. दर्जेदार पुस्तक वाचनात येईल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. उत्तरार्धात मातृचिंता जाणवेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विचित्र वागणुकीमुळे मनस्ताप होईल.

शुभ दिनांक – 22, 23

कुंभ – आपल्या राशीतील रवी आणि शनि वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर आपले ध्येय गाठता येईल. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने आपणास अनुकूल ग्रहमान लाभले आहे. धनस्थानातील गुरु, शुक्र आपली आर्थिक बाजू भक्कम करणारे राहतील. कुटुंबात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गोड बोलून आपली कामे करून घ्याल. कामानिमित्त प्रवास घडतील. परदेशस्थ भावंडांची सुसंवाद साधाल.

शुभ दिनांक – 20 ते 22

मीन – आठवड्याच्या सुरुवातीला व्यय स्थानातील रवी आणि शनि वरून चंद्राचे भ्रमण होत आहे तर आपल्या राशीतून गुरु शुक्राचे भ्रमण होत आहे. प्रतिकूल वातावरणातून आपले ध्येय गाठण्यात यश लाभेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरी व्यवसायाच्या चांगल्या संधी चालून येतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. कामानिमित्त प्रवास कराल. आपली मते कुटुंबीयांवर लादू नका नाहीतर वादंग होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल.

शुभ दिनांक – 22 ते 24

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Navpancham Yoga
राशीभविष्यलाईफ स्टाईल

Navpancham Yoga : नवपंचम राजयोगाच्या निमित्ताने ‘या’ राशींना मिळणार मोठा लाभ

अतिशय जुन्या काळापासून भारतामध्ये ज्योतिषशास्त्र (Astrology) प्रचलित आहे. आकाशात असणारे ग्रह, तारे...

Weekly Horoscope
राशीभविष्य

‘या’ राशींना राजकारणात मिळेल अनपेक्षितपणे संधी

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....

Weekly Horoscope
राशीभविष्य

जुलै महिन्याचा पहिला आठवडा ‘या’ राशीसाठी असेल खास

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....

Weekly Horoscope
राशीभविष्य

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....