Home गाजावाजा स्पेशल गुगलच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची आपण केवळ कल्पनाच करू शकतो!
गाजावाजा स्पेशल

गुगलच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची आपण केवळ कल्पनाच करू शकतो!

8
Google Vacancy | KFacts

गुगलमध्ये असं होतं काम

गुगल मधील कामाचा दिवस आपण अनुभवला तर आपल्या सगळ्यांनाच तिथे काम करण्याची संधी मिळावी असं आपल्याला वाटून जाईल. आपल्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण विचार गुगलमध्ये केला जातो. त्यांना कामाचा मोबदला तर उत्तम मिळतोच पण याशिवाय त्यांना अनेक सोयीसुविधा गुगलमध्ये मिळतात ज्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

विनामूल्य भोजन, तरणतलाव, ट्रॅकिंग वॉल, पूल टेबल, कामाच्या जागीच (विनामूल्य डिटर्जन्टसह) कपडे धुण्याची सुविधा. गुगल आपल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञापासून ते मदतनीसांपर्यंत ६५०० कर्मचाऱ्यांना देत असलेल्या लाभांची ही केवळ सुरुवात आहे. कामाच्या ठिकाणीच ब्युटी सलून, डॉक्टरांची वैद्यकीय सेवा, स्पा हे सर्वही उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्कसुद्धा गुगलच्या कर्मचाऱ्यांना भरावे लागत नाही. काम करणारे पालक त्यांच्या मुलांनाही संस्थेच्या माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया इथे असलेल्या विनामूल्य चाईल्ड केअर सेंटरमध्ये ठेवू शकतात. कुत्र्यांचेही इथे स्वागत आहे. अशी सेवा क्वचितच एखाद्या कंपनीमध्ये मिळत असेल.

विस्तीर्ण पसरलेल्या गुगल फ्लेक्स च्या प्रांगणात वावरण्यासाठी कर्मचारी स्कूटर चा वापर करू शकतात आणि बरेचदा इथे पाजामा डे ही असतो. सहसंस्थापक लॅरी पेज व सर्जी ब्रिन यांनी कर्मचाऱ्यांच्या आनंदाकरता इतके काही केले आहे की, त्यांच्या संस्थेचा नामनिर्देश २००७ साली फॉर्च्यून मॅगझिनने काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी असा केला होता.

एका लेखामध्ये याबद्दल लिहिताना म्हटले होते की, कामाची जागा इतकी आरामदायी आहे की, गुगलच्या कर्मचाऱ्याला कार्यालय सोडणे जिवावर येत असेल. आणि नेमक्या याच कारणास्तव संस्थेचा हा खर्च समर्थनीय होतो.

असं ऑफिस आणि या दर्जाच्या सेवा दिल्यामुळे आज अनेक लोक गुगलशी जोडलेली आहेत. याचा फायदा त्यांना नवनवीन प्रॉडक्ट्ससाठी होतो आणि त्यातूनच गुगलचा यशाचा प्रवास अविरत सुरू आहे.

क फॅक्टस टीम

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....