Home राजकारण तुरुंगात असणारा कैदी निवडणूक लढवू शकतो पण मतदान करू शकत नाही? काय सांगतो नियम जाणून घ्या
राजकारण

तुरुंगात असणारा कैदी निवडणूक लढवू शकतो पण मतदान करू शकत नाही? काय सांगतो नियम जाणून घ्या

18
National Voters Day
National Voters Day

Voting Rules : देशात सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत. पण तुम्हाला माहितेय का, तुरुंगात असणारा कैदी किंवा अंडरट्रायल कैदी मतदान करू शकतो का? खरंतर, तुरुंगातील कैद्याला निवडणूक लढवता येतेय. पण मतदान करता येते का? याबद्दलच जाणून घेणार आहोत सविस्तर….

तुरुंगात बंद असणाऱ्या कैद्यांना निवडणूक लढवता येते. पण मतदान करता येत नाही असा संविधानात नियम आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीवेळी मतदान करता येत नाही. सुप्रीम कोर्टाने देखील या संबंधित एक जनहित याचिका फेटाळून लावली होती. खरंतर, सध्याच्या कायदे आणि नियमानुसार, तुरुंगात शिक्षा पूर्ण करत असलेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार नसतो. याशिवाय अंडरट्रायल कैद्याला किंवा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या कैद्यालाही मतदान करण्याची परवानगी नसते.

अंडरट्रायल कैद्यालाही मतदानाचा अधिकार नाही
लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 62(1) अंतर्गत तुरुंगात बंद असणाऱ्या कैद्याला मतदान करण्याचा अधिकार नसतो. कारण मतदान करण्याचा अधिकार कायदेशीर असतो. कायद्याचे उल्लंघन केलेल्या व्यक्तींना मतदान करता येत नाही. याशिवाय आरोपी ज्या कोर्टाद्वारे पोलिसांच्या ताब्यात किंवा न्यायालयीन कोठडीत असतो त्यांना निवडणुकीत मतदान करता येत नाही.

तुरुंगातील कैद्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार
तुरुंगात बंद असणाऱ्या कैद्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. खरंतर, ज्या व्यक्तीला निवडणूक लढवायची आहे त्याने पीठासीन अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज द्यायचा असतो. याशिवाय एक शपथही घ्यावी लागते. पण तुरुंगातील कैद्याला उमेदवारी अर्ज कसा करावा लागतो आणि तुरुंगाबाहेर जाण्याची त्याला परवानगी मिळते का? (Voting Rules)

तुरुंगातील कैदी निवडणूक लढवत असल्यास त्यांना आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागतो. याशिवाय प्रतिनिधी कोण असेल याचेही नियम आहेत. बहुतांश प्रकरणात परिवारातील एखादा सदस्य प्रतिनिधी असू शकतो. एका नव्या नियमानुसार, तुरुंगात बंद असलेल्या अंडरट्रायल कैद्याला निवडणूक लढवता येते. शिक्षा झालेल्या कैद्यांना निवडणूक लढवण्यास पूर्ण बंदी आहे.


आणखी वाचा :
पक्ष की उमेदवार…? स्टार प्रचारकाचा खर्च कोण उचलतात? जाणून घ्या सविस्तर…
डीडी न्यूजचा नवा भगवा लोगो पाहून विरोधक म्हणाले, “हे तर प्रचार भारती…”
EVM मशीन ठेवल्या जाणाऱ्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम का म्हणतात

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...