Home प्रेस रिलीझ विशाल फाले, शुभांगी गायकवाड ‘हवीशी वाटे’ या म्युझिक अल्बममध्ये
प्रेस रिलीझ

विशाल फाले, शुभांगी गायकवाड ‘हवीशी वाटे’ या म्युझिक अल्बममध्ये

8
Havishi Vate

‘चिंब झालं आज उधाण वारं, हवीशी वाटे तू मला’ असे शब्द असलेला ‘हवीशी वाटे’ (Havishi Vate)  हा नवाकोरा म्युझिक अल्बम सप्तसूर म्युझिकने लाँच केला आहे. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि अभिनेता विशाल फाले या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकला आहे. या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. 

सुशील बनसोडे प्रॉडक्शनच्या सुशील बनसोडे यांनी ‘हवीशी वाटे’ या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी हा म्युझिक अल्बम प्रस्तुत केला आहे.

राहुल काळे यांनी लिहिलेलं ‘हवीशी वाटे’ हे गीत विजय भाटे यांनी संगीतबद्ध केलं आहे. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलं आहे. सचिन कांबळे म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक आहेत. विशाल फाले आणि शुभांगी गायकवाड ही जोडी म्युझिक अल्बममध्ये आहे. 

विशाल फालेने आतापर्यंत त्याच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी व्हिडिएजच्या माध्यमातून लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. हवीशी वाटे या म्युझिक अल्बमद्वारे एक प्रेमकथा मांडण्यात आली आहे.

====

हे देखील वाचा: पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना ‘हर हर महादेव’

====

हळूवार शब्द, मनात सहजच रुंजी घालणारी चाल, केवल वाळंज, सोनाली सोनावणे यांचा श्रवणीय आवाज आणि उत्तम छायांकन हे या म्युझिक व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विशालच्या इतर व्हिडिओजप्रमाणेच चाहत्यांकडून ‘हवीशी वाटे’ या म्युझिक व्हिडिओलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...