Home मनोरंजन विशाखा सुभेदार यांची ‘पॅडी’साठी भन्नाट पोस्ट
मनोरंजन

विशाखा सुभेदार यांची ‘पॅडी’साठी भन्नाट पोस्ट

12
BB Marathi

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन आता चांगलाच रंगात येऊ लागला आहे. बिग बॉसच्या या पर्वामध्ये अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरे सहभागी झालेले दिसून येत आहे. यातलाच एक चेहरा म्हणजे विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे. जेव्हा ते या घरात जाणार हे सगळ्यांना समजले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या विनोदाने आणि अभिनयाने सर्वांना हसवणाऱ्या पॅडी यांना सुरुवातीला हा खेळ समजलाच नाही. त्यामुळे पहिला आठवडा त्यांनी घरात जास्त रस घेतला नाही.

मात्र विकेंडला भाऊंच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पॅडी यांना ते घरात अजिबात सक्रिय नसल्याचे त्यांना बोलून दाखवले. सोबतच त्यांनी घरात खुलावे आणि प्रत्येक काम पुढाकार घ्यावा जेणेकरून प्रेक्षक देखील त्यांना नोटीस करतील असे सांगितले. त्यानंतर पॅडी यांनी स्वतःमध्ये बदल करत दुसऱ्या आठवड्यापासून घरात सहभाग घेण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्यात बाहुल्यांच्या रूपातील दोन बाळ आले. याच्याशी संबंधित एक नवीन टास्क घरात झाला. या टास्कमध्ये निक्कीच्या टीमने बाजी मारली. पण टास्कदरम्यान घरातील सदस्यांमध्ये बरेच वादविवाद झाले आणि काही स्पर्धकांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन कमेंट्स केल्या. सोशल मीडियावरून याबाबत अनेक पोस्ट केल्या गेल्या. असे असूनही घरातील काही खेळाडू कोणताही वाद न घालता खूप सुंदर पद्धतीने आपला खेळ खेळत होते. त्यातले एक नाव होते पंढरीनाथ कांबळे. हे पाहूनच त्यांची जवळची मैत्रीण असलेल्या विशाखा सुभेदार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

विशाखा यांनी पोस्टमध्ये लिहिले, “तुझ्यातला माणूस… त्याला दिसला असावा… म्हणूनच मैत्रीचं पाऊल त्याने उचललं… फुल्ल सपोर्ट तुला, आता एकदा आपलं गाणं होऊन जाऊ दे.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा…!

१)अरे बाबा भांडणात सुद्धा तू एकदाही चुकीचा नव्हतास… तुझे मुद्दे फंडे Clear होते… एक अख्खा दिवस तू तुझा खेळत होतास. कुठेही चुकीचं पाऊल, वक्तव्य नाही, कोणालाही लागेल असं स्टेटमेंट नाही.

२) त्या पुढारीला तू कोण? असं त्याला विचारलंस तेव्हाचं टायमिंग इतकं कमाल होतं… की मरणाची हसले मी.

३) निक्कीला नडणं हे Perfect होतं कारण ही रास्त. तिच्यावर आवाज… मजा आली. तू तुझं काम करत नव्हतीस आणि घूस त्या ड्रॉवरमध्ये सूर मार Was एपिक.

४) काल वर्षा ताईंची नाजूक मुद्द्यावर बाजू घेतली. ताईंनी तुझा खांदा थोपटला… #PaddyKambleGoodHuman.

५) डीपीची साथ सुद्धा मजा, मस्करी, पिकनिक Spot वर तू धमाल करीत असणार जे एक तासाच्या एपिसोड मध्ये पहायला मिळत नाही… पिकनिक बास्केट सुद्धा गाजव हक्काने.

६) दोन आठवडे थंड होतास, उमजत नव्हतं कोण कायं कसं याचा अंदाज घेत होतास..! प्रेक्षक आणि पिकनिकचे अध्यक्ष म्हटलं रितेशभाऊ पण, आता नाही बोलणार.. आता तर तू स्वार झाला आहेस.. मांड आता तर ठोकली आहेस…सुरु झालाय game तुझा.

7) जरी तू शांत तरी नसे तू थंड… आग हैं… आम्हाला माहीत आहे जिगरा हैं..!”

विशाखा यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना पूर्ण सहमत दर्शवले असून, पॅडी उत्तम गेम खेळत असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी तर ते असेच खेळात राहिले तर नक्कीच अंतिम भागापर्यंत जातील असे सांगितले.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...