Home मनोरंजन Viral Video: आराध्याला कॅमेरासमोर भरभरून पोझ देताना पाहून ऐश्वर्या भारावली
मनोरंजन

Viral Video: आराध्याला कॅमेरासमोर भरभरून पोझ देताना पाहून ऐश्वर्या भारावली

8
Aishwarya rai
Aishwarya rai

बॉलिवूडमधील स्टार किड्स हा खूपच मोठा आणि कधीही न संपणारा असा विषय आहे. सध्याच्या काळात स्टारकिड्सला कलाकारांपेक्षा अधिक लाईमलाइट मिळते. त्यांना असणारी फॅन फॉलोविंग देखील अमाप आहे. या स्टारकिड्सच्या गर्दीत अनेक एक नाव प्रामुख्याने घेतलेच जाते आणि ते म्हणजे आराध्या बच्चन. अभिनेत्री ऐश्वर्या राय ( Aishwarya rai ) आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या आतापासूनच मीडिया सेन्सेशन बनली आहे. सर्वच सुपरस्टार असणाऱ्या बच्चन कुटुंबातील एक मुख्य सदस्य असलेल्या आराध्याबद्दल अगदी सुरुवातीपासूनच मीडियामध्ये आणि सामान्य लोकांमध्ये कुतूहल आहे. तिचा प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. शिवाय तिला मीडिया, पापराझी देखील नेहमीच स्पॉट करताना दिसतात. कधी कधी तर मीडिया ऐश्वर्यापेक्षा जास्त आराध्यालाच कव्हर करते असे देखील नेटकरी सोशल मीडियावर म्हणताना दिसतात. 

सध्या मनोरंजनविश्वात कान्स फिल्म फेस्टिवलचे वारे वाहत आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावताना दिसत असून, अनेक भारतीय चित्रपटांनी देखील या फेस्टिवलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या फेस्टिवलमध्ये हजेरी लावण्यासाठी नुकतीच ऐश्वर्या राय ( Aishwarya rai ) निघाली. यावेळी एयरपोर्टवर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना स्पॉट करण्यात आले. सध्या यांचे एयरपोर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, या सर्व व्हिडिओंमध्ये एक व्हिडिओ कमालीचा गाजत आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या बच्चन मीडियाच्या लोकांना एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.

=====

हे देखील वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडणार तारक मेहता ? घ्या जाणून काय आहे प्रकरण

=====

तसे पाहिले तर आराध्याला मीडिया अनेकदा त्यांच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद करताना दिसते. मात्र आराध्या जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यांना बघते तेव्हा ती जरा अवघडलेली दिसते. ती पोज द्यायला अजिबात कम्फरटेबल नसते. मात्र यावेळेस जरा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. जेव्हा मीडियाचे लोकं अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याला त्यांच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद करत होते तेव्हा आराध्या अतिशय आत्मविश्वासाने आणि अतिशय उत्साहाने त्यांना वेगवेगळ्या पोज देताना दिसली. तिचे हे वेगळे रूप पाहून सर्वच पापाराजीना अधिकच उत्साह आला आणि ते जोमाने तिचे फोटो काढू लागले. आराध्याला असे पाहून ऐश्वर्या ( Aishwarya rai ) देखील आश्चर्यचकित झाली आणि तिला कौतुकाने निहाळताना दिसली. 

यावेळी आराध्याने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता तर ऐश्वर्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट, जॅकेट आणि पँट घातली होती. ऐश्वर्या आणि आराध्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजताना दिसत असून, त्यावर नेटकऱ्यांचा भरभरपूर कमेंट्स देखील येत आहे. तसे पाहिले तर याआधी देखील ऐश्वर्याने ( Aishwarya rai ) आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिवलला उपस्थिती लावली आहे. किंबहुना ऐश्वर्या जेव्हा जेव्हा परदेशात कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने जाते तेव्हा ती आराध्याला सोबत घेऊनच जाते. ऐश्वर्या अतिशय चांगली आई असून, ती नेहमीच आराध्याला सर्वच बाबींमध्ये कुशल करण्याचा प्रयत्न करताना दिसते. सध्या ऐश्वर्या ( Aishwarya rai ) चित्रपटांमध्ये जरी कमी दिसत असली तरी ती विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सतत चर्चेत असते. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...