Home प्रेस रिलीझ ‘लायगर’ चित्रपटातील विजय देवरकोंडाचा जबरदस्त लूक, पाहा पोस्टर
प्रेस रिलीझ

‘लायगर’ चित्रपटातील विजय देवरकोंडाचा जबरदस्त लूक, पाहा पोस्टर

8
Vijay Deverakonda

‘लायगर’ (Liger) चित्रपटातील विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) जबरदस्त लूक समोर आला आहे. होय, अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून त्याच्या पात्राची झलक दिली आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत आहे. एकीकडे विजय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर दुसरीकडे अनन्या पांडेही ‘लायगर’मधून साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.

विजयने शेअर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या चित्रात अभिनेता कपड्यांशिवाय पोज देताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत विजयने चित्रपटात काम करतानाचा अनुभव थोडक्यात शेअर केला. विजय लिहितो, “एक चित्रपट ज्याने माझे सर्व काही घेतले. ही माझी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. त्यासाठी मी माझे सर्वस्व दिले आहे! लवकरच येत आहे.”

हा चित्रपट पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केला आहे आणि धर्मा प्रॉडक्शनच्या अंतर्गत करण जोहर निर्मित आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. विजय आणि अनन्या व्यतिरिक्त या चित्रपटात रम्या कृष्णा, रोनित रॉय, अली, मकरंद देशपांडे आणि विष्णू रेड्डी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 25 ऑगस्ट 2022 रोजी लायगर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

====

हे देखील वाचा: Ek Villain Returnsचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

====

लायगरमध्ये विजय देवरकोंडा हा मार्शल आर्ट्स फायटरच्या भूमिकेत आहे, तर दिग्गज बॉक्सर माईक टायसन हा चित्रपटात त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट खूप चर्चेत आहे. तेलुगु चित्रपटसृष्टीतील अनन्या पांडे आणि माईक टायसन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...