Home गाजावाजा स्पेशल Veto Power म्हणजे काय?
गाजावाजा स्पेशल

Veto Power म्हणजे काय?

8
Veto Power
Veto Power

पाकिस्तानने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा हाफिज तलहा सईद याचा जागतिक दहशतवादीच्या सूचीतून बचाव करण्यासाठई चीनने पुन्हा एकदा नवे पाऊल उचलले आहे. चीनने संयुक्त राष्ट्रा वीटो पॉवरचा वापर करुन पाकिस्तानातील दहशतवादी शाहिद महमूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर स्थगिती दिली आहे. दरम्यान, दोन दिवसात चीनचे हे दुसरे पाऊल आहे. यापूर्वी चीनने लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शाहिद याला जागतिक दहशतवादाच्या सूचीत सहभागी करण्यासाठी भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात फेटाळून लावला. अखेर वीटो पॉवर (Veto Power) म्हणजे काय आमि कोणत्या देशांकडे ही ताकद असते त्याचबद्दल अधिक जाणून घेऊयात.

वीटो पॉवर म्हणजे काय?
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UN Security Council) च्या पाच स्थायी सदस्यांना वीटोची पॉवर दिली गेली आहे. या देशांमध्ये चीन, फ्रांन्स, रशिया, युनाइडेट किंगडम आि संयुक्त राज्य अमेरिकेचा समावेश आहे. वीटोला निगेटिव्ह वोट असे म्हटले जाते. यामध्ये युएन सिक्युरिटी काउंसिलचे स्थायी सदस्य आपल्या एका वोटाच्या माध्यमातून कोणताही प्रस्ताव पारित करु शकतात किंवा फेटाळून लावू शकतात. खरंतर युएन सिक्युरिटी काउंसिलमध्य १५ सदस्य असतात. तर अन्य १० नॉन-स्थायी सदस्यांमध्ये एस्टोनिया,भारत, आयर्लंज, केन्या, मेक्सिको, नाइजर, नॉर्वे, सेंट विंसेंट आणि ग्रेनेडाइंस, ट्युनीशिया आणि वियतनामचा समावेश आहे.

Veto Power
Veto Power

सर्वाधिक रशियाकडून वापर
वीटो पॉवरचा सर्वाधिक वापर रशियाकडून करण्यात आला आहे. रशियाने १४३ वेळा याचा वापर केला. तर २०११ मध्ये रशियाने १९ वीटो टाकले, ज्यापैकी १४ सीरियावर होते. अमेरिकेने आपल्या ८३ वीटो मध्ये पहिला वीटो १७ मार्च १९७० मध्ये वापरला होता. त्यावेळी सोवियत संघाने १०७ वीटोचा वापर केला होता. ब्रिटेनने ३२ वेळा वीटोचा वापर केला. त्यांनी सर्वात प्रथम ३० ऑक्टोंबर १९५६ मध्ये स्वेज संकटच्या दरम्यान याचा वापर केला होता. या व्यतिरिक्त फ्रांन्सने पहिल्यांदा २६ जून १९४६ मध्ये स्पॅनिश प्रश्नासंबंधित वीटोचा उपयोग केला आणि तेव्हापर्यंत फ्रांन्सने १८ वीटोचा वापर केला होता. चीनने १९ वेळा वीटोचा वापर केला आहे.

हे देखील वाचा- रशिया VS युक्रेन ; युद्धामुळे सुरक्षेसाठी बंकर खरेदीची घाई

पहिल्यांदा कोणी वीटोचा वापर केला होता?
वीटो पॉवरचा सर्वाधिक प्रथम वापर १६ फेब्रुवारी १९४६ वेळी सोवित संघ (वर्तमानात रशिया) ने लेबनान आणि सीरियाकडून परदेशी सैनिकाच्या वापसीसंदर्भात एक ड्राफ्ट ब्लॉक केला होता. जर एखादा स्थायी म्हणजेच वीटो पॉवर असणारा देश कोणत्याही प्रस्तावाशी पूर्णपणे सहमत नसेल, वीटो सुद्धा टाकायचा नाही तर तो वेगळा राहण्याचा ऑप्शन निवडू शकतो. अशाप्रकारे जर प्रस्तावावर ९ मतं ही पक्षात पडली तर त्याचा स्विकार केला जातो. (Veto Power)

भारताच्या समर्थनार्थ रशियाचे वीटो
रशियाने भारताच्या बाजूने काही वेळा वीटो पॉवरचा वापर केला आहे. यामध्ये पहिल्यांदा १९५७ मध्ये कश्मीरच्या मुद्द्यावर भारतासाठी वीटो पॉवरचा वापर केला होता. १९६१ मध्ये पोर्तुगालने गोव्यासंबंधित युएनएससीला एक पत्र पाठवले होते. गोवा त्यावेळी पोर्तुगालच्या हातात होता आणि भारताला या क्षेत्राला मुक्त करायचे होते. जेणेकरुन त्याला आपल्या राष्ट्राचा हिस्सा बनवू शकतो. युएनमध्ये पोर्तुगालच्या प्रस्तावाला अमेरिका, युनाइटेड किंगडम आणि फ्रांन्सद्वारे समर्थन मिळाले होते. मात्र रशियाने भारताची साथ दिली होती आणि वीटो पॉवरचा वापर करत प्रस्ताव स्थगित केला होता. यानंतर १९ डिसेंबर १९६१ मध्ये गोवा अखेर पोर्तुगाल शासनाच्या तावडीतून मुक्त झाला. त्यानंतर पुन्हा १९६२ मध्ये कश्मीरच्या मुद्द्यावर रशियाने भारताच्या पक्षात वीटोचा वापर केला. १९७१ मध्ये ही रशियाने भारताची साथ दिली आणि कश्मीरच्या मुद्द्यावरुन वीटोचा वापर करत भारताचे समर्थन केले होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....