Home मनोरंजन हरहुन्नरी कलाकार: सचिन खेडेकर
मनोरंजनव्यक्ती विशेष

हरहुन्नरी कलाकार: सचिन खेडेकर

9
Sachin Khedekar | K Facts

‘गर्व आहे मला मी मराठी असल्याचा’ असं म्हणत जो अभिनेता प्रत्येक मराठी मनात शिरला त्याचं नाव सचिन खेडेकर. सचिन खेडेकर यांनी खऱ्या अर्थाने आपल्या अभिनय क्षेत्राला सुरुवात केली ती 1985 साली. विधिलिखित हे त्यांनी अभिनय केलेलं पाहिलं नाटक. त्यांनतरही श्याम रंग, तुझ्या माझ्यात अशा काही नाटकात त्यांनी अभिनय केला.

नाटकाबरोबरच त्यांनी टेलिव्हिजनवरही खूप काम केलं. त्यांनी अभिनय कलेली पहिली हिंदी सिरीयल इम्तहान तसेच त्यांनी सैलाब, संविधान याही हिंदी सिरीयल केल्या. हिंदी बरोबरच त्यांनी चाळ नावाची वाचाळ वस्ती, आभाळमाया अशा मराठी मालिकाही केल्या.

सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी अभिनय केलेल्या चित्रपटाची यादीही खूप मोठी आहे. जिवासखा, चिमणी पाखरं, आपली माणसं हे सचिनजींचे सुरुवातीच्या काळातले काही चित्रपट. काकस्पर्श हा एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट त्याचबरोबर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हा चित्रपट ज्यासाठी त्यांना झी चं बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालं आहे.

Renowned actor Sachin Khedekar is host Kon Honaar Crorepati
Renowned actor Sachin Khedekar is host Kon Honaar Crorepati

हिंदीतही जिद्दी, बादशहा, जंग, तेरे नाम, सिंघम हे चित्रपट त्यांनी केले. हिंदीतील एक विशेष चित्रपट सचिन खेडेकर यांच्या वाट्याला आला तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ज्यात त्यांनी सुभाषचंद्र यांची मध्यवर्ती भूमिका केली या चित्रपटासाठीही सचिनजींना बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.

सचिनजी नेहमी सांगतात, त्यांचे अभिनयतले गुरू विनय आपटे. स्टेजवर उभं राहण्यापासून ते भाषेपर्यंत सगळ्यात विनय आपटे यांनी कायम मार्गदर्शन केलं. आपल्या अंगातली कला जर फुलवायची असेल तर गुरुचं बळ लागतं, शिकवण लागते. त्यामुळे आयुष्यात गुरू आणि त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे.

फक्त नाटक, सिनेमा यात अभिनय नाही तर सचिन खेडेकर म्हटलं की सूत्रसंचालन हे ही एक समीकरण आहे. मग नक्षत्रांचे देणे सारखा एखादा मोठा कार्यक्रम असो किंवा कोण होईल मराठी करोडपती असेल सचिनजींची सूत्रसंचालन करण्याची शैली खुप छान आहे. यामागचं कारण म्हणजे सचिनजींना कविता खूप आवडतात. ते कविता सादरीकरणही उत्तम करतात.

 Sachin Khedekar
Happy Birthday Sachin Khedekar

सचिन खेडेकर यांना त्यांच्या अनेक भूमिकांसाठी वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. सैलाब या त्यांच्या हिंदी सिरिअल साठी त्यांना बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला तसेच मृगजळ या सिनेमासाठी झी गौरव बेस्ट ऍक्टर पुरस्कार मिळाला. घराबाहेरसाठी सचिन यांना राज्य पुरस्कार मिळाला आहे तसेच त्यांना दोन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. सचिन खेडेकर यांनी नुसतं हिंदी मराठीच नाही तर तेलगू, तामिळ, गुजराथी, मल्याळम या भाषांतल्या चित्रपटांतही उत्तम काम केले आहे.

आज सचिन खेडेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अभिनय क्षेत्रातला त्यांचा आलेख कायम चढत राहो ही प्रार्थना.

– सई मराठे

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...