Home गाजावाजा स्पेशल घराच्या तिजोरित पारिजातकाचे फुल ठेवल्याने होतात हे लाभ
गाजावाजा स्पेशल

घराच्या तिजोरित पारिजातकाचे फुल ठेवल्याने होतात हे लाभ

11
Vastu Tips for Wealth
Vastu Tips for Wealth

Vastu Tips for Wealth : पारिजातकाचे फुल अत्यंत पवित्र मानले जाते. वास्तुशास्रात पारिजातकाच्या झाडाजवळ देवांचा वास असल्याचे मानले जाते. यामुळे त्यांचे अधिक महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा 14 रत्न निघाले होते. त्यापैकी एक म्हणजे पारिजातकाचे झाड होते. या झाडामुळे सुख-समृद्धी मिळते आणि काही आरोग्यासंबंधित लाभही होतात. या फुलांचा वापर पूजा-प्रार्थनेसाठी वापरणे शुभ मानले जाते.

वास्तुशास्रात म्हटले आहे की, हे एक महत्त्वपूर्ण झाड ज्या घरात असते तेथे स्वयं देवी लक्ष्मीचा वास असतो. अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही. पारिजातकाचे फुलांची जी लोक पूजा करतात त्यांना देवी प्रसन्न होते असे मानले जाते.

धन-वृद्धिसाठी पारिजातकाचे फुल शुभ
एखाद्याच्या घरात पैशांची चणचण सातत्याने भासत असल्यास तर मंगळवारी पारिजातकाची पाच फुल सुकवून ती पिवळ्या रंगातील कापडात बांधून तिजोरित ठेवा. असे केल्याने पैशासंबंधित समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय अनावश्यक पैसे खर्च करण्याची सवयही कमी हेईल.

नोकरीसाठी पारिजातकाचे फुल
तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी पारिजातकाची 21 फुल लाल रंगाच्या कापडात बांधून व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात देवी लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवा. याशिवाय विनाकारण पैसे खर्च होत असतील तरीही पारिजातकाची फुल तुम्ही घराच्या तिजोरित ठेवू शकता.

देवी लक्ष्मी होईल प्रसन्न
शास्रानुसार, पारिजातकाची फुल देवी लक्ष्मीला फार आवडतात. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तिजोरित किंवा पैसे ज्या ठिकाणी ठेवता तेथे पारिजातकाची फुल ठेवू शकता. अथवा तुमच्या पर्समध्येही ही फुल ठेवू शकता.

घरात वाढेल सुख-समृद्धी
सुख-समृद्धी आणि घरात आनंदाचे वातावरण रहावे म्हणून तुम्ही तिजोरित पारिजातकाची फुल ठेवा. असे केल्याने ज्या लोकांच्या घरात सातत्याने वाद होत असतील हे कमी होण्यास मदत होईल. (Vastu Tips for Wealth)

कर्जमुक्त व्हाल
तुम्ही पारिजातकाची फुल तिजोरित ठेवल्यास आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही आर्थिक सक्षम होऊ पाहात असाल तर पारिजातकाची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण करा.

(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘newsite.gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
राम मंदिर आंदोलनातील दीदी मॉं
‘या’ मंदिरात श्रीकृष्णाचा आहे वास…
कंबरेला काळा धागा बांधण्यामागे हे आहे कारण

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....