Home गाजावाजा स्पेशल घरात पैसा टिकत नाही? करा हे उपाय
गाजावाजा स्पेशल

घरात पैसा टिकत नाही? करा हे उपाय

8
Vastu Tips

Vastu Tips : पैसे अशी एक गोष्ट आहे ज्याची प्रत्येकजण बचत करू पाहतो. सर्वांना आयुष्यात मोठे होण्यासाठी पैशांची गरज भासते. पण बहुतांश जणांची अशी समस्या असते की, कितीही प्रयत्न केले तरीही हातात पैसे टिकत नाहीत. घरात पैसे आल्यानंतर ते लगेच खर्च होतात. यामागे नक्की काय कारण असू शकते याबद्दलही फारसे काही कळत नाही.

घरात पैसे न टिकाण्यामागील कारण घरातील वास्तुदोष असू शकतो. घरात वास्तुदोष असल्यास भले कितीही पैसे घरात आले तरीही ते टिकणार नाहीत. पैसे पाण्यासारखे वाहून जातील. वास्तुनुसार, दक्षिण, उत्तर-पश्चिम किंवा उत्तर-पूर्व दिशा पैशांसंबंधित असल्याचे मानले जाते. या दिशेला काही गडबड असल्यास घरात आर्थिक समस्या येऊ लागतात. घरात पैसे टिकून राहण्यासाठी वास्तुनुसार तुम्ही काय केले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया अधिक…..

उत्तर पूर्व दिशा स्वच्छ ठेवा 
वास्तुनुसार, घरातील उत्तर पूर्व दिशा पैशासंबंधित असल्याचे मानले जाते. लक्षात ठेवा या दिशेला नेहमीच स्वच्छता ठेवा. कोणत्याही प्रकारचे फुटलेले सामाना या दिशेला ठेवून नका. घरातील उत्तरपूर्व दिशेला अस्वच्छता असल्यास पैसे टिकत नाहीत.

उत्तर-पूर्व दिशेला अंधार 
वास्तुनुसार उत्तर-पूर्व दिशेला धनाची देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते. यासाठी उत्तर-पूर्व दिषेला कधीही अंधार ठेवू नये. नेहमी या दिशेला पुरेसा उजेड येईल याची काळजी घ्यावी.

दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नका 
वास्तुनुसार, घरातील दक्षिण दिशाल यमाची दिशा मानला जाते. यामुळे घरात या दिशेला चुकूनही तिजोरी ठेवू नका.

उत्तर-पूर्व दिशेला किचन 
घराचे बांधकाम करताना नेहमीच लक्षात ठेवा, घरातील किचन उत्तर-पूर्व दिशेला नसावे. अन्यथा घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. (Vastu Tips)

घराच्या मध्यभागी या गोष्टी असू नयेत 
वास्तुशास्रानुसार, घराच्या मध्यभागी टॉयलेट, पायऱ्या किंवा वजनदार सामान नसावे. असे असल्यास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पायऱ्यांसाठी उत्तर-पश्चिम दिशा योग्य असल्याचे मानले जाते.

(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)


आणखी वाचा :

घरात अशाप्रकारे ठेवा शंख, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

जगातील मोठी हिंदू मंदिरे, जाणून घ्या खास गोष्टी

घरात शनी देवांची मूर्ती न ठेवण्यामागे हे आहे कारण

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....