Home गाजावाजा स्पेशल कामात मन लागत नाही, वास्तूमध्ये करा हे बदल…
गाजावाजा स्पेशल

कामात मन लागत नाही, वास्तूमध्ये करा हे बदल…

11
Tips for Working Women
Tips for Working Women

Vatu Tips : कोणतेही काम उत्तम पद्धतीने करण्यासाठी सर्वाधिक गरजेचे आहे की, त्यामध्ये मन लागणे अत्यावश्यक आहे. काही लोकांची अशी तक्रार असते की, कामान मन लागत नाही. याशिवाय एखादे काम करण्यास घेतल्यानंतर मन स्थिर राहत नाही. मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात. यामुळे कामात पूर्ण लक्षही लागले जात नाही. यामागे काही कारणे असू शकतात. पण घरात काही वास्तूदोष असल्यासही अशा समस्या उद्भवू शकतात.

खरंतर, आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे आपले लक्ष एका गोष्टीवर केंद्रित राहत नाही. अथवा कामात मन लागत नाही. जाणून घेऊया वास्तूमध्ये कोणते बदल करावेत याबद्दल अधिक….

घराचे दरवाजे-खिडक्यांकडे लक्ष द्या
जर तुम्हाला काम करताना उदास अथवा त्यामध्ये मन लागत नसेल तर घराचे दरवाजे-खिडक्यांकडे लक्ष द्या. घराचे दरवाजे- खिडकक्या सतत बंद नसावेत. खिडक्या खुल्या राहिल्याने घरातील नकारात्मक उर्जा बाहेर जाण्यास मदत होईल. याशिवाय खिडक्या-दरवाजे वेळोवेळी रिपेअरिंग करुन घ्यावेत.

घरात तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करून बसता हे देखील फार महत्वाचे असते. काम करतना अथवा घरात उठताना-बसताना तुमचे तोंड दक्षिण-पश्चिम दिशेला असल्यास कामात मन लागत नाही. अशातच व्यक्ती उगाचच तणावाखाली जातो अथवा व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो.

ऑक्सिजनचा प्रवाह
घरातील एखादा सदस्य तणावाखाली असेल अथवा त्याचे कामात मन लागत नसेल तर तुमच्या घरात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाहीये. काहीजणांच्या घराच्या खिडक्या नेहमीच बंद असतात. यामुळे घरात व्यवस्थितीत ऑक्सिजन खेळते राहत नाही. याशिवाय घरात सकारात्मक उर्जाही येत नाही. याव्यतिरिक्त घरातील दरवाजे योग्य दिशेला असणेही फार महत्वाचे आहे. (Vastu Tips)

कामकाजाच्या वस्तू ठेवण्याचे ठिकाण
तुमचे कामात मन लागत नसेल तर घर अथवा ऑफिसमध्ये कामकाजाच्या वस्तू ठेवण्याच्या ठिकाणाकडे लक्ष द्यावे. कामाच्य फाइल्स अथवा महत्वाचे कागदपत्र अस्थावस्थ पडलेले असल्यास अथवा त्यावर धूळ साचली असेल तर तेथे नकारात्मक उर्जा अधिक असते हे लक्षात घ्या. यामुळेच तुमचे कामात मन लागत नाही. यामुळे फाइल्स अथवा कागदपत्रे योग्य पद्धतीने ठेवाव्यात.


आणखी वाचा :
Vastu Tips : बाथरुमचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा?
गुजराती लग्नसोहळ्यातील मामेरु परंपरा नक्की काय आहे?

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....