दिवाळीची रोषणाई सर्वत्र झाली आहे. यासोबत नव्या वर्षाची ओढही लागली आहे. अवघ्या काही दिवसांनी नववर्ष, म्हणजे, 2025 सुरु होणार आहे. अलिकडे नवं वर्ष लागलं की हे वर्ष कसं जाणार याच्या अनेक भविष्यवाणी व्हायला सुरुवात होते. मात्र या सर्वांत एका नावाबद्दल मोठी उत्सुकता असते, ते नाव म्हणजे, बाबा वेंगा. बल्गेरियन भविष्यवेत्ता असलेल्या बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी सत्य ठरल्या आहेत. प्रत्येक वर्ष सुरु होण्याआधी वेंगा बाबा यांनी या वर्षाबद्दल काय सांगितले आहे, याची उत्सुकता असते. अर्थात येणा-या 2025 या वर्षाबद्दल वेंगा बाबा यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यामध्ये युरोपमध्ये विनाशकारी युद्ध आणि परग्रहींसोबत संपर्क अशा भविष्याचा समावेश आहे. वेंगा बाबा यांनी सांगितलेल्या अनेक घटना वर्तमानकाळात ख-या ठरल्या आहेत. त्यामध्ये अमेरिकेवर झालेला 9-11 चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू यांचा समावेश आहे. (Vangelia Pandeva Gushteroba)

प्रसिद्ध भविष्यवक्त्या वेंगा बाबा यांनी काही वर्षापूर्वी जागतिक भविष्यातील घटनांची नोंद करुन ठेवली आहे. जगभरात पुढच्या काळात काय घटना घडतील या त्यांच्या नोंदी नववर्ष येतांना जाहीर केल्या जातात. त्यानुसार आता 2025 चे भविष्य काय आहे, याची उत्सुकता होती. मात्र वेंगा बाबांची 2025 ची भविष्यवाणी जाहीर झाली, आणि एकच खळबळ उडाली आहे. कारण 2025 या वर्षात पुन्हा एका नव्या रोगाच्या साथीचा फैलाव होणार असल्याची भविष्यवाणी वेंगा बाबा यांनी केली आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या कोरोना साथीबद्दलही वेंगा बाबा यांनी आधीच आपले भविष्य जाहीर केले होते. 2025 वर्ष हे खास असणार असल्याचेही वेंगा बाबा यांनी सांगितले. कारण याच वर्षात परग्रही आणि मानव यांच्यामध्ये नव्यानं संपर्क प्रस्थापित होणार आहे. सर्वात भयंकर म्हणजे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यात युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्यांची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यातही ब्रिटनचा राजा चार्ल्स याच्या कारकिर्दीला उतरण लागेल, अशीही भविष्यवाणी वेंगा बाबा यांनी केली आहे. राजा चार्ल्स तिसरा याची सत्ता अनेकजण नाकारतील, त्यातून ब्रिटीश राजेशाही संपूष्ठात येण्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घडतील, असेही वेंगा बाबा यांच्या भविष्यवाणीत नमूद करण्यात आले आहे. (International News)
मुख्य म्हणजे, गेल्या आठवड्यात राजा चार्ल्स हे ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांच्या दौ-यावर होते. या दौ-यात त्यांना खूनी, चोर म्हणून संबोधण्यात आले, शिवाय कॉमनवेल्थ देशांच्या शिखर परिषदेतही काही देशांनी चार्ल्स यांना ब्रिटीश राजघराण्यानं आमच्या वस्तू चोरुन स्वतःचे महल सजवले आहेत, असा आरोप लावला होता. राजे चार्ल्स यांना या संपूर्ण दौ-यात ब्रिटीश राजेशाहीवर टिका करणारी वाक्य ऐकेवी लागली आहेत. यावरुनच वेंगा बाबा यांची भविष्यवाणी खरी ठरणार असे काहींचे मत आहे. बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये युरोपमध्ये विनाशकारी युद्ध होईल, अशीही भविष्यवाणी केली आहे. (Vangelia Pandeva Gushteroba)

या युद्धात मोठी वित्त आणि जीवीत हानी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. युक्रेन आणि रशिया युद्ध मात्र पुढच्या वर्षी संपुष्ठात येईल, कारण या दोन्ही देशांमध्ये सैनिकांची कमतरता जाणवू लागले. त्यासोबत शस्त्रास्त्र खरेदीसाठीही पैसे मिळणार नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे. 2025 हे वर्ष युरोपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. तर तर 2043 पर्यंत युरोप मुस्लिमांच्या अधिपत्याखाली येईल अशी धक्कादायक भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. 2076 पर्यंत जगभरात कम्युनिस्ट राजवट येण्याची भविष्यवाणी केली होती. याशिवाय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला होण्याची भविष्यवाणीही वेंगाबाबा यांनी केली आहे. वेंगा बाबा यांची भविष्यवाणी अचूक म्हणून ओळखली जाते. 9-11 चा अमेरिकेवरील हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हियाचे विघटन, चेरनोबिल अणुदुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख वेंगा बाबा यांनी अचूक सांगितली होती. (International News)
======
हे देखील वाचा : मंजिरींना सुद्धा गुप्तहेर म्हणून वापरतात ?
====
बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोबा होते. ज्यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी वादळात अडकल्यामुळे त्यांची दृष्टी गेली. या घटनेनंतर, त्यांनी भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली आणि त्या प्रसिद्ध झाल्या. बल्गेरियामध्ये त्यांना “बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस” म्हणून ओळखल्या गेल्या. बाबा वेंगा यांनी स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती. 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचा मृत्यू होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते आणि त्यांच्या अंदाजानुसार 11 ऑगस्ट रोजी बाबा वेंगा यांचे निधन झाले. तेव्हापासून वेंगा बाबा यांच्या भविष्यवाणीला महत्त्व आले. (Vangelia Pandeva Gushteroba)
सई बने
- Australia
- Bulgaria
- india
- information
- International news
- King Charles
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Nnostradamus of the Balkans
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Russia
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- ukraine
- Vangelia Pandeva Gushteroba
- vidhansabha election
- राजकारण