Home गाजावाजा स्पेशल Valentine’s Day : ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताय, मात्र त्याचा इतिहास माहिती आहे का?
गाजावाजा स्पेशल

Valentine’s Day : ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताय, मात्र त्याचा इतिहास माहिती आहे का?

15
Valentine's Day

‘प्रेम’ काय बोलणार या विषयावर आणि किती बोलणार. हा असा शब्द आहे, ज्याची व्याख्या, ज्याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा आणि तिला वाटेल तसा आहे. प्रत्येकासाठी प्रेम हे नेहमीच खास असते. मात्र कधी कधी असे वाटते की, जेव्हा प्रेमाबद्दल बोलले जाते तेव्हा खास दिवशी, खास जागी, सुंदर, आकर्षक, विशिष्ट, भारी भक्कम उपमा देऊन, शब्द वापरूनच का प्रेमाला व्यक्त करावे लागते? उलट सध्या शब्दांमधून व्यक्त होणारे प्रेम अधिक खरे आणि समोरच्याला पटकन पटणारे, त्याच्या मनाला भिडणारे असते. प्रेम तुम्ही कलात्मक पद्धतीने व्यक्त करा किंवा साध्या शब्दात शेवटी प्रेम व्यक्त करणे महत्वाचे असते. (Valentine’s Day)

प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. जेव्हा आपल्याला वाटेल तोच दिवस आणि तीच जागा खास समजून प्रेम व्यक्त करता येते. मात्र तरीही आजच्या आधुनिक जगात आपण अनेक महत्वाचे दिवस साजरे करतो मग प्रेमासाठी एखादा खास दिवस का नसावा? आधीच्या काळात कदाचित हे चालले असते. मात्र आजच्या आधुनिक काळात जिथे आपण सर्वच ‘डे’ जल्लोषात साजरे करतो तिथे प्रेमासाठी एक दिवस तर असलाच पाहिजे…हो ना…? (Valentine’s Day 2025)

Valentine's Day

तर अशा या प्रेमासाठी, प्रेमाला समर्पित असणारा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day) साजरा केला जातो. या दिवशी सर्वच लोकं आपले प्रेम समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करताना दिसतात. आता आपण किती म्हटले की प्रेम हे फक्त प्रियकर, प्रियसीचेच नसते ते सर्वांचे असते. मात्र हा दिवस खासकरून, बहुतकरून प्रियकर प्रियसीसाठीच असतो. (Top Stories)

आजच्या तरुणाईसाठी प्रेम व्यक्त करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस म्हणून वॅलेंटाइन डे ला ओळखले जाते. संपूर्ण जग १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरे करते म्हणून आपणही करतो. मात्र हा दिवस साजरा का केला जातो? या दिवसाची सुरुवात कशी, कुठे आणि कधी झाली? याची माहिती खूपच कमी लोकांना असेल. आज आपण या लेखातून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत. (Latest News)

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील १४ तारखेला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात येतो. मात्र मधल्या काही वर्षापासून ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा संपूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन विक म्हणून साजरा होतो. ७ फेब्रुवारीला रोझ डे ने या आठवड्याची सुरुवात होऊन १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे ने या आठवड्याची समाप्ती होते. या संपूर्ण आठवड्यात प्रेमाशी संबंधित विविध दिवस साजरे केले जातात आणि १४ फेब्रुवारीला आपल्या प्रेमाला व्यक्त केले जाते.(Valentine’s Day Information)

Valentine's Day

व्हॅलेंटाईन डे हा भारतीय डे नाही. इतर अनेक ‘डे’ सारखा हा दिवस देखील पाश्चात्य संस्कृतीशी जोडला गेलेला आहे. व्हॅलेंटाईन नावाचे रोममध्ये खूप मोठे संत होऊन गेले. त्यांच्या नावावर हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र एक सर्वात जास्त प्रचलित आणि प्रसिद्ध असलेली कथा आहे. (Valentine’s Day History)

असे सांगितले जाते की रोमन राजा क्लॉडियस प्रेमाच्या कट्टर विरोधात होता. त्याला प्रेम या शब्दाची खूपच चीड होती. यामागचे कारण म्हणजे त्याची अशी धारणा होती की जर सैनिक प्रेमात पडले तर त्यांचे मन त्यांच्या कामापासून विचलित होईल आणि यामुळे रोमन सैन्य कमकुवत होईल. यामुळेच त्याने सैनिकांना लग्न करण्यास बंदी घातली होती. तर दुसरीकडे, संत व्हॅलेंटाईनने लोकांना प्रेमाचा उपदेश दिला. प्रेम किती सुंदर भावना आहे याबद्दल लोकांना सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी क्लॉडियस राजाविरोधात जाऊन अनेक लोकांचे लग्नही लावून दिले. (Social News)

============

हे देखील वाचा : Premanand : स्थानिकांच्या विरोधामुळे प्रेमानंद महाराजांची लोकप्रिय पदयात्रा बंद!

============

संत व्हॅलेंटाईन यांनी लोकांचे लग्न लावून दिले, त्यांना प्रेमाबद्दल सांगत त्यांचे मत परिवर्तन केले. व्हॅलेंटाइन यांनी राजा क्लॉडियसचे विचार चुकीचे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे रोमच्या राजाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. १४ फेब्रुवारी रोजी संत व्हॅलेंटाईन यांना फाशी देण्यात आली आणि म्हणूनच त्या दिवसापासून १४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिन अर्थात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून, रोमसह जगभरात १४ फेब्रुवारी रोजी प्रेम दिन अर्थात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरु झालेली परंपरा आजतागायत कायम आहे.

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....